Home बातम्या अभिजात पत्रकारितेकडे परत जाण्याची वेळ

अभिजात पत्रकारितेकडे परत जाण्याची वेळ

0

स्व. नारायण आठवले स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार श्री. अरुण टिकेकर नुकतेच गोव्यात येऊन गेले. त्यानिमित्ताने त्यांची घेतलेली विशेष मुलाखत मुलाखतकार : अजय बुवा

* आजच्या पत्रकारितेविषयीचे आपले निरीक्षण काय?

आजची पत्रकारिता ही प्रशिक्षित पत्रकारिता आहे. हा व्यवसाय आता फॅशनेबल झालेला आहे. विशेषतः चॅनलवर काम करण्यासाठी प्रशिक्षित पत्रकार महत्त्वाचा मानला जातो. ‘विषय कमी करा, पण अनुभवांचा भरणा जास्त असला पाहिजेअसे सल्ले मी पत्रकारितेचे शिक्षण देणार्‍या संस्थांना देत आलो आहे. शिक्षित पत्रकार आलाय असे समजून कुणीही त्याला लगेच अग्रलेख लिहायला देणार नाही. आजच्या घडीच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. सध्या पत्रकारितेचे शिक्षण देणारे एक तर व्यावसायिक आहेत. दुसरे आहेत ते प्रॉफेसर. त्यामुळे अनुभवी, म्हणजे पत्रकारितेत काम करणारे प्रॉफेसर ज्यावेळी मिळतील त्यावेळी खरेखुरे शिक्षण मिळेल व पत्रकारितेच्या क्षेत्रातसुद्धा आमूलाग्र बदल घडलेला आम्हाला पाहायला मिळेल.

* एक व्यवसाय म्हणून पत्रकारितेला भवितव्य आहे का?

आता चॅनल्समुळे या क्षेत्रात संधीची कवाडे पूर्णपणे खुलली आहेत. खूप लोकांनी घडवली ना आपली करिअर! परंतु एक प्रकारची अनिश्‍चितता या क्षेत्रातसुद्धा आहे. कारण मालकाचा संपादकावर विश्‍वास नाही व संपादकाचा मालकावर विश्‍वास नाही. कॉन्ट्रॅक्ट जॉब मोठ्या प्रमाणात उपलब्ध केले जात आहेत. त्यामुळे आजचा पत्रकार अनिश्‍चिततेच्या वलयात सापडलेला आहे.

* वर्तमानपत्राची विश्‍वासार्हता ढासळते असे आपण का म्हणता?

छापील शब्दाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. कारणे अनेक आहेत. कुणाच्या तरी बाजूने लिहिणे, कुणाची तरी तळी उचलून धरणे, यामुळे आपणच आपल्या शब्दाचे महत्त्व कमी करून ठेवले आहे. विरोधी मतांना प्राधान्य देणे हे वर्तमानपत्राचे कर्तव्य आहे. हा विश्‍वासार्हता मिळवण्याचा एक भाग आहे. उदाहरण देतो. समजा एका वर्तमानपत्राच्या वक्त्याला जर कार्यक्रमाला भाषणाला बोलावलं तर आज फक्त त्याचेच वर्तमानपत्र त्याची बातमी करते. पूर्वी असे होत नव्हते. हे विश्‍वासार्हता गमावण्याचे लक्षण आहे. वर्षानुवर्षे खपवून मिळवलेली विश्‍वासार्हता आजची वर्तमानपत्रे निव्वळ काही बातम्यांमुळे घालवून बसत आहेत. याला सर्वच जबाबदार आहेत. या व्यवसायाशी निगडीत सर्व घटक याला जबाबदार आहेत. जाहिरातीकरणामुळे जाहिरातदाराची मर्जी सांभाळणे महत्त्वाचे ठरले आहे.

* वृत्तपत्र स्वातंत्र्याचा प्रश्‍न आज ऐरणीवर आहे….

वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या व्याख्याही बदलत चालल्या आहेत. मालक म्हणतोय मी एवढा पैसा गुंतवलाय, माझं स्वातंत्र्य जपा. सरकार म्हणतंय आम्ही जाहिराती देतोय, वाचक म्हणतोय मी दोन रुपये देऊन पेपर विकत घेतोय, जाहिरातदार म्हणतोय आमच्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळतंय. या सगळ्यांचे स्वातंत्र्य जपताना जे राहते ते सध्या वृत्तपत्र झालेलं आहे. संपादकावर आज या सर्व घटकांचे दडपण असते. वाचकही आता पूर्वीसारखा राहिला नाही. सरळ धमकी देतोपेपर बंद करतो! आता ही चौकट कशी भेदायची हे संपादकाच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून आहे. एखादी जाहिरात संपादकांनी नाकारली तर ते योग्य कसे काय हे पटवून देण्याची क्षमता संपादकामध्ये असणे आवश्यक आहे.

आजची काही वर्तमानपत्रे मालक चालवतात; संपादक नव्हे. पूर्वी मालक पडद्यामागे राहायचे. आताच्या मालकांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढत चालली आहे. त्यामुळे ते आपल्या वर्तमानपत्राचा स्वतःला हवा तसा वापर करू लागले आहेत. अभिजात पत्रकारितेकडे परत जाणे ही सध्या काळाची गरज बनली आहे. तरच विश्‍वासार्हता परत मिळेल व शब्दांना किंमत मिळेल. वृत्तपत्रे कशासाठी काढतात याची परिभाषा पुन्हा समजून घेणे गरजेचे आहे. वर्तमानपत्राच्या जडणघडणीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय या सगळ्या विभागांचा ताळमेळ महत्त्वाचा आहे.

* वर्तमानपत्रे नेहमी राजकारणाला प्राधान्य का देतात?

भारतात आज प्रत्येकाला राजकारणामध्ये रस आहे, म्हणून हे होते. आणि समजा आम्ही ठरवले की राजकारणाला जास्त महत्त्व द्यायचे नाही. पण हे एका वर्तमानपत्राने ठरवून चालणार नाही. सर्व वर्तमानपत्रांची भूमिका तशी असली पाहिजे. ते होणे शक्य नाही. प्रत्येक वर्तमानपत्र नफ्यात चालण्यासाठी धडपडत आहे. पूर्वी एक व्रत म्हणून वर्तमानपत्रे चालायची.

* राष्ट्रीय स्तरावरच्या मोठ्या वर्तमानपत्राच्या प्रादेशिक आवृत्त्यांमुळे स्थानिक वर्तमानपत्राच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो का?

प्रत्येक वर्तमानपत्राने बदल करताना आपली विशेषतः टिकवून ठेवणे गरजेचे आहे. खूप वर्तमानपत्रे बंद पडली आहेत. निव्वळ मॅट्रीमोनीयल व डेव्हलपर्सच्या जाहिरातींवरसुद्धा पेपर चालवता येतो हे पाश्‍चात्त्यांनीसुद्धा भारताकडे पाहून मान्य केले आहे. छोट्या जाहिराती तुम्हाला खप देतात. ‘न्यूज यू कॅन युजअशी क्लासीफाईडची व्याख्या करता येते. मुद्दाम बघा, ज्या वर्तमानपत्राच्या छोट्या जाहिराती जास्त त्याचा खप आज अधिक आहे. त्याचबरोबर वाचकांची पत्रे छापताना कंजुषी दाखवता कामा नये. पत्रे ही समाजाचा आरसा आहे. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायला जागा पाहिजे, तरच वाचकांना वृत्तपत्राबद्दल आत्मीयता वाटेल. पूर्वी संपादक द्यायचे तेच लोक वाचायचे, आता लोकांनाही वाटते. पूर्वी थहरीं ींहश ीशरवशीी ुरपीं ींे ीशरव, ुहरीं ींहश रर्वींशीींळीशीी ुरपीं शिेश्रिश ींे ीशरव च्यावर भर असायचा. परंतु आज थहरीं ींहश शवळींेीी ुरपीं शिेश्रिश ींे ीशरव याच्यावरसुद्धा भर दिला गेला पाहिजे.

* वाचकाची आज वर्तमानपत्रावरची निष्ठा बदलत चाललीय का?

आजचा जमाना हा अनुकरणशीलतेचा आहे. वर्तमानपत्रे आज सारखी बदलली पाहिजेत, नवीन नवीन प्रयोग केले पाहिजेत. वाचकांची अभिरुची बदलत चालली आहे, याचाही विचार व्हायला हवा. वेगवेगळ्या स्तरांवरच्या वाचकांची अभिरुची वेगवेगळी आहे. आज सगळ्यांची मर्जी सांभाळली पाहिजे. हे ज्या वर्तमानपत्राला जमत नाही ते मग दुसर्‍या वर्तमानपत्राकडे वळतात. दुसर्‍यांनी केलेला बदल यशस्वी झाला की इतर वर्तमानपत्रे त्याच्यावर विचार करायला लागतात. अधिक आकर्षक, अधिक सोपा पेपर विकत घेण्याकडे वाचकांचा कल असतो हे बदल करताना ध्यानात घेतले पाहिजे. वाचकाची अभिरुची सांभाळताना वाचकाची निष्ठा बदलू नये म्हणून वर्तमानपत्रे आकर्षक होत आहेत व यामुळे चांगली चांगली नियतकालिके मारली जात आहेत. आज रविवारची पुरवणी ही मासिकाचे काम करायला लागली आहे. आजचा वाचक अवघड, आव्हानात्मक वाचायला तयार नाही. त्याला सोपे ते हवे आहे. याचाही फटका मासिकांना बसला आहे. कारण वर्तमानपत्रे वाचकाची निष्ठा संभाळत आहेत.

पूर्वी मॅगझिनमध्ये दिसणारी उत्तान फोटोग्राफी आज वर्तमानपत्रात सर्रास दिसते. एकेकाळी असले उघडे अंग दाखवणारी चित्रे फक्त संध्याकाळच्या वर्तमानपत्रांत दिसायची. याचे कारण म्हणजे, त्या वृत्तपत्राचा वाचक हा फक्त प्रौढांचा होता. परंतु ज्या वेळी वर्तमानपत्रांमध्ये अत्याधिक स्पर्धा सुरू झाली आणि नैतिकता बाजूला सारली गेली, आणि एक मानसिकता निर्माण झाली की आम्ही हे छापणार, लोकांना आवडते आम्ही तेच छापणार, नैतिकतेच्या गोष्टी करणार्‍यांनी भले पेपर बदलला तरी चालेल.

* आज वर्गणीवर मोफत भेटवस्तू दिल्या जातात. हे योग्य आहे?

प्रश्‍न टिकून राहण्याचा आहे. कालपरवा आलेले दैनिक जर वाचकांना भेटवस्तू देत असेल तर जुन्या निष्ठावंत वाचकांच्या भुवया उंचावणे साहजिकच आहे. अस्तित्वाच्या लढाईपुढे नैतिकतेची लढाई नेहमी फकी पडते.

* पूर्वी वर्तमानपत्रे मोठी मोठी आंदोलने चालवायची. आज सोशल मीडिया यासंदर्भात वेगाने पुढे येत आहे, हे का?

प्रश्‍न विश्‍वासार्हतेचा आहे. आणि त्याचा बागुलबुवा क्षणिक आहे. वृत्तपत्र रजिस्टर्ड असतात, त्यांना धोरणे असतात, बंधने आहेत. परंतु सोशल मीडियांवर काही बंधने नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रभाव वर्तमानपत्राचे साम्राज्य हलवू शकणार नाही.

* आजच्या वृत्तवाहिन्यांच्या बालिशपणाबद्दल तुम्हाला काय वाटते?

चोवीस तास न्यूज ऐकायला सोपे वाटते, पण घडायला अवघड वाटते. आमच्याकडे एवढ्या बातम्या घडतात का? त्यात पुन्हा स्पर्धा, आणि मग ब्रेकिंग न्यूजचा पोरखेळ. ब्रेकिंग न्यूजचा अर्थ मोठा आहे हे त्यांना कळतच नाही. या मीडियाचे मूळ नियम अजून ठरायचे आहेत. प्रिंट मिडियाला इतिहास आहे. त्याचे नियम ठरलेले आहेत. तुम्ही जेवायला बसता आणि तुमच्यासमोर टीव्हीवर बॉम्बस्फोटाच्या डेड बॉडीज किळसवाण्या स्वरूपात दाखवल्या जातात. तिकडे अमेरिकेत ९/११ च्या वेळी एक तरी मृतदेह तुम्ही बघितला का? दोन हजार लोक मेले होते. बाहेरून त्याच्यावर निर्बंध येणे त्यांना खपणार नाही म्हणून या मीडियाने स्वतःचे स्वतःकरिता काही नियम करणे आवश्यक आहे. परंतु अस्तित्वासाठी त्याची लढाई चालू आहे, त्यामुळे संपूर्ण मीडिया एकत्र येणे अशक्यच आहे. अजूनही ते बाल्यावस्थेतच आहे. जो सगळ्यांत जास्त ओरडू शकतो त्याचं म्हणावं खरं असे त्यांना चर्चेच्या कार्यक्रमात वाटते. त्यामुळे चर्चेचे कार्यक्रम रटाळ वाटतात.

* अण्णा हजारेंचे आंदोलन यावेळी फसले आणि त्यांनी ते खापर मीडियावर फोडले. तुम्हाला याबाबत काय वाटते?

चशवळर लरप ारज्ञश ेी वशीींीेू. यावेळी त्यांना मीडियाशी जुळवून घ्यायला जमले नाही. अण्णा काय किंवा रामदेव काय, आता राजकारणात उतरतील, परंतु ते यशस्वी होणार नाहीत. रामदेवनी अजून राजकारणात उतरण्याची भाषा केली नाही. राजकारण हे पैशांवर अवलंबून आहे; सज्जनतेवर नाही. केवळ प्रतिमेवर निवडणूक जिंकता येत नाही. * अण्णांच्या आंदोलनाला उपस्थिती कमी, पण रामदेवांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद लाभला

जनसमुदाय तोच होता. त्यावेळी तिकडे होता, यावेळी इकडे आला. या लोकांना लोकशाहीची जबाबदारी काय असते हे अजून माहीत नाही किंवा ते माहीत नसल्याचे सोंग करत असतील. लोकपाल विधेयक संमत करायला वेळ लागणे स्वाभाविक आहे. परंतु ही लोकं वस्तुस्थिती समजून घ्यायला तयार नाहीत. मनमोहन कुणाला फसवतील असे मला तरी वाटत नाही. टीम अण्णाला समजा उद्या लोकांनी निवडून दिले तर हेच लोक लोकपाल विधेयक संमत करायला अडचणी आणतील. कालावधी लागेल असे सांगायला लागतील. नुसत्या शिक्षणाने परिपक्वता येत नाही हे या लोकांनी समजून घ्यायला हवे. सत्ताधार्‍यांनीही शिकले पाहिजे. जनतेमधील असंतोष आहे तो आता व्यक्त होऊ लागला आहे.

* २०१४ च्या निवडणुकांसंदर्भात आपले भाकीत काय?

कॉंग्रेसला पर्याय दिसत नाही. विरोधी पक्ष आपल्या अंतर्गत कलहामुळे आपली प्रतिमा खराब करून बसला आहे. कदाचित पूर्ण बहुमत मिळणार नाही. कदाचित आघाडी सरकार येईल. त्यामुळे परत दोन समांतर सरकारे अस्तित्वात येतील. लोकांनी या आघाडी व युतीच्या भानगडीत न पडता एका पक्षाला बहुमत द्यावे.

* भारत महासत्ता बनू शकेल?

सद्यःस्थितीत तरी शक्य नाही. परंतु देशासमोर एक ध्येय निर्माण करणे गरजेचे आहे. स्वप्न दाखवणे गरजेचे आहे. निव्वळ कायदा करून महासत्ता होणे जमणार नाही. राष्ट्रीय चारित्र्यापासून आम्हाला सुरुवात करावी लागणार. भ्रष्टाचार नाहीसा होणे आवश्यक आहे. खालच्या लोकांना त्याचा त्रास होता कामा नये. शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा आवश्यक आहेत. विचार ही शक्ती आहे. माणसाच्या विचारांना आम्ही मानले नाही. एक जीवनशैली बनवली पाहिजे. प्रगत विचार झाला पाहिजे. हे सगळ्या देशांनी मान्य केले आहे, पण आपण नवीन आव्हाने स्वीकारायलाच तयार नाही. आपला संपूर्ण समाज हा करमणुकीच्या अधीन झालेला आहे. नोकरी मिळवणे हे शिक्षणाचे ध्येय झालेले आहे, ते बदलले पाहिजे. महासत्ता वैचारिक बळाच्या जिवावर बनवायची असते.