Home बातम्या अबकारी निरीक्षकास लाच घेताना अटक

अबकारी निरीक्षकास लाच घेताना अटक

0

केंद्रीय अबकारी निरीक्षक नीलेश ठाकूर याना सीबीआयने २७०० रु. लाच घेताना रंगेहाथ अटक केली. स्वान सन्स इंडिया प्लास्टिक या आस्थापनाचे व्यवस्थापक नीलेश परब यांच्याकडे त्यांनी लाच मागितली होती.

आपले नातेवाईक गोव्यात येत असून त्यांना सिनेमाला नेण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यास ठाकूर यांनी सांगितले होते, ते जमत नसेल तर रु. २७०० द्यावे अशी मागणी केली होती. याबाबत परब यांनी सीबीआयकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, ठाकूर यांना दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.