अपात्रतेच्या दोन्ही याचिका फेटाळा : बंडखोर आमदार

0
10

गोवा विधानसभेच्या सभापतींसमोर अपात्रतेच्या याचिकेचा सामना करत असलेल्या आठ आमदारांनी दोन्ही याचिका फेटाळण्याची मागणी करून नवीन पाऊल उचलले आहे. दोन्ही अपात्रता याचिका विधानसभेच्या सदस्यांनी (आमदार) दाखल केल्या नाहीत. त्यामुळे त्या फेटाळून लावा. केवळ आमदारच अपात्रतेची याचिका दाखल करू शकतात, असा दावा या बंडखोर आमदारांनी केला आहे. डॉम्निक नोरोन्हा यांनी 8 आमदारांविरुद्ध, तर अमित पाटकर यांनी दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर काल सभापतींनी सुनावणी घेतली. डॉम्निक नोरोन्हा यांच्या वकिलांनी आणखी वेळेची विनंती केली आहे. पुढील सुनावणी 29 मे रोजी ठेवण्यात आली आहे. अमित पाटकर यांच्या याचिकेवर 26 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.