उपासनगर महामार्गावर झालेल्या अपघातात सांतान फर्नांडिस (४२) ठार झाला. नुवे – मडगाव येथील सांतान आपल्या इटर्नो स्कूटरने मंगळवारी पहाटे ६ वा. वेर्ण्याहून वास्कोला निघाला होता. उपासगर येथे महामार्गावर बसलेल्या म्हशी त्याला धुक्यामुळे दिसू शकल्या नाहीत व त्याच्या स्कूटरची धडक म्हशींना बसून तो उसळून पडला व जखमी झाला. त्याला इस्पितळात नेताना वाटेत त्याचे निधन झाले.