अनावश्यक व वादग्रस्त विधाने टाळा

0
7

रालोआच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा सल्ला

काल रविवारी नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ)च्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या बैठकीत नेत्यांनी आपल्या बोलण्यावर संयम ठेवतानाच अनावश्यक व वादग्रस्त विधाने टाळावीत असा कडक शब्दांत सल्ला दिला. विशेषतः ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने करून भाजपची प्रतिमा मलिन करणाऱ्या नेत्यांना पंतप्रधान मोदींनी हा सल्ला दिला. बैठकीत सशस्त्र दलांच्या शौर्याचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी नेतृत्वाचे कौतुक करणारा ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीत 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अलिकडेच मध्य प्रदेश आणि हरियाणातील भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची बदनामी झाली. हरियाणातील भाजप खासदार रामचंद्र जांगरा, विजय शाह आणि मध्य प्रदेशातील जगदीश देवडा यांनी या मुद्द्यावर निषेधार्ह टिप्पणी केली होती. बैठकीला भाजप आणि एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील उपस्थित होते.