Home Featured अनंतनागमध्ये कार दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू

अनंतनागमध्ये कार दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू

0

जम्मू – काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या अपघातात संपूर्ण कुटुंब मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. खोल दरीत कार कोसळून झालेल्या अपघातात आठजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनंतनाग जिल्ह्यातील सिंथन – कोकरनाग रस्त्यावर शनिवारी एक कार दरीत कोसळून 5 लहान मुलांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक पोलीस कर्मचारी, दोन महिला आणि 16 वर्षांपर्यंतच्या पाच लहान मुलांचा समावेश आहे. कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. कारमधील सर्वांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल नेले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी आठ लोकांना मृत घोषित केले.