अधिक व्याजाचे आमीष दाखवून महिलेची फसवणूक

0
49

जादा व्याजाचे आमिष दाखवून दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील एका महिलेची सुमारे १२ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा शाखेने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात व्यक्तीने वॉट्‌सअपच्या माध्यमातून जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून तिच्या पैशांचे ऑनलाइन पद्धतीने हस्तांतरण करून फसवणूक केली आहे.