भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितिन गडकरी यांनी आपण प्राप्ती कर खात्याच्या अधिकार्यांना धमकावल्याचा इन्कार केला आहे.
मात्र आपल्या पूर्ती समूहाशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर घातलेले छापे हे आपली व आपल्या पक्षाची प्रतिमा डागळण्याचे कारस्थान असल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्राप्ती कर खात्यावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

