म्हापसा पोलिसांत तक्रार नोंद
साळगांव येथील एका २५ वर्षीय मूकबधीर मुलीचे गोमेकॉ इस्पितळात उपचार चालू असताना काल निधन झाले असून ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी तिच्या आईने म्हापसा पोलिसांत तक्रार नोंदवली असून मुलगी मूकबधीर असल्याचा फायदा घेत जवळपास एका बांधकामावर असलेल्या कामगारांनी तिच्यावर अतिप्रसंग केल्याची तक्रार तिच्या आईने म्हापसा पोलिसांत दाखल केली आहे.
तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला म्हापसा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परवा तिला तेथून बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता तिचे शनिवारी पहाटे निधन झाले.
डॉक्टरांनी तपासणीअंती ती गरोदर असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले होते. तिच्या नातेवाईकांनी तिला एका सामाजिक संस्थेमध्ये तिची पहाणी करण्यासाठी दाखल केले होते. काल पुन्हा तिच्या पोटात दुखू लागल्याने बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल केले होते.
आईने तक्रारी नमूद केले आहे की, घराच्या जवळपास एका बंगल्याचे काम चालू होते. त्या कामावर असलेल्या कामगारांनी आपली मुलगी मूकबधीर असल्याचे पाहून ती एकटी असताना तिच्यावर अतिप्रसंग केला असावा.
म्हापसा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक विश्वजीत चोडणकर हे पुढील तपास करीत असून याप्रकरणी अजूनपर्यंत कुणालाही याप्रकरणी अटक करण्यात आली नसल्याची माहिती उपनिरीक्षक चोडणकर यांनी दिली.