Home बातम्या अतिरिक्त मामलेदारांची भरती करणार : डिसोझा

अतिरिक्त मामलेदारांची भरती करणार : डिसोझा

0

विविध प्रशासकीय कामे, निवडणूक विषयक कामे व न्यायालयीन कामे हे हाताळण्यासाठी आतापर्यंत स्वतंत्र असे मामलेदार नव्हते. पण आता स्वतंत्र मामलेदारांची नियुक्ती करणार असल्याचे डिसोझा यांनी सांगितले.

तसेच काणकोण, सांगे, केपे व धारबांदोडा या तालुक्यातील कुमेरी शेतकर्‍यांचा प्रश्‍न येत्या डिसेंबरपर्यंत सोडविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नगरविकास खात्यावरील मागण्यांवर बोलताना ते म्हणाले, नगरपालिका कायदा १९६८ मध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येतील. या कायद्यात दुरुस्त्या केल्यानंतर नगरपालिकांना भेडसावणार्‍या वेगवेगळ्या समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

‘सुडा’मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. नगरपालिकांसाठी समान केडर लागू करण्याचाही विचार असल्याचे त्यांनी सांगितले.