अतिरिक्त पाण्यासाठी कर्नाटकची म्हादई लवादाकडे मागणी

0
93

कर्नाटक सरकारने राज्यातील उत्तर जिल्ह्यांमधील कोरडवाहू जमिनीच्या सिंचनासाठी अतिरिक्त ७ टीएमसी फूट पाण्याची मागणी म्हादई जलतंटा लवादाकडे केली आहे. बेळगावात चालू असलेल्या कर्नाटक विधानमंडळाच्या अधिवेशनात जलसिंचन मंत्री एम. बी. पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली. या अनुषंगाने राज्य सरकारने लवादासमोर याचिका सादर केली असून त्यावर ११ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.