28 C
Panjim
Tuesday, September 22, 2020

अज्ञातवास

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा अज्ञातवास लांबल्याचे दिसते. गेल्या महिन्यात २३ तारखेला संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले, त्या दिवसापासून राहुल गांधी सुटीवर गेलेले आहेत. एकीकडे आपला पक्ष केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याची जय्यत तयारी करीत असताना पक्षाचे भावी उत्तराधिकारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, ते राहुलच सुटीवर निघून गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावणे साहजिक होते. ते दोन आठवड्यांत परत येतील असेही तेव्हा पक्षातर्फे सांगण्यात आले होते, परंतु राहुल यांचा अज्ञातवास आणखी लांबला आहे. ते विदेशात आहेत अशी वार्ता आहे, परंतु तेथे ते विपश्यनेसाठी गेले आहेत, पर्यटनासाठी गेले आहेत की पक्षासंबंधीच्या चिंतनासाठी हे काही स्पष्ट झालेले नाही. परंतु मोदी सरकारला सर्वांत अडचणीचा ठरणार्‍या भूसंपादन विधेयकावर पक्षाला देशभरात शेतकर्‍यांमध्ये रान पेटवण्याची नामी संधी चालून आलेली असताना राहुल यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने एक मोठी संधी गमावली आहे हे मात्र खरे. कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी मसरत आलमपासून भूसंपादन विधेयकापर्यंत पक्षाचा किल्ला लढवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु देशाचे लक्ष स्वतःकडे वेधून घेण्याची आणि आपले नेतृत्व सिद्ध करण्याची जी संधी राहुल यांना या दोन्ही विषयांत मिळाली असती, ती त्यांच्या हातून निसटली आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना न्यायालयाने कोळसा घोटाळ्यात वॉरंट बजावताच त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह २४, अकबर रोडवरील कॉंग्रेस मुख्यालयापासून माजी पंतप्रधानांच्या मोतीलाल नेहरू मार्गावरील बंगल्यापर्यंत जी पायी पदयात्रा काढली, त्यामध्येही राहुल अर्थातच नव्हते. सुटीवरून ते परत आल्यानंतर पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व त्यांच्या हाती सोपवले जाणार असल्याची अटकळ सातत्याने व्यक्त होते आहे. देशातील सर्वांत जुन्या राजकीय पक्षाची धुरा हाती घेण्यासाठी मानसिक तयारी करण्यासाठीच ते दीर्घ सुटीवर गेलेले आहेत असे त्यांचे काही निकटवर्तीय माध्यमांना अनौपचारिकरीत्या सांगत आहेत, परंतु पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्याची क्षमता राहुल यांच्यात आलेली आहे का हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. राहुल यांना राजकारण कितपत समजते त्याबाबतही गंभीर प्रश्नचिन्हे आहेत. युवक कॉंग्रेस आणि एनएसयूआयचे नेतृत्व जेव्हा त्यांच्याकडे सोपवले गेले होते, तेव्हा त्यांनी त्या संघटनांमध्ये लोकशाही आणण्याचा प्रयत्न केला. नियुक्तीपेक्षा निवडणुकीला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी अनेकांची नाराजीही ओढवून घेतली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी जयपूरच्या चिंतन शिबिरात जोरदार मागणी होऊन त्यांना कॉंग्रेस उपाध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांनी उमेदवार निवडीवेळी अमेरिकी धर्तीच्या ‘प्रायमरीज्’ चा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे उमेदवार निवडले जाताना शिफारशींच्या आधारे नव्हे, तर गुणवत्तेच्या आधारेच निवडले जावेत आणि त्यासाठी पारदर्शक निवडणूक प्रक्रिया घेण्यात यावी असा आग्रह राहुल यांनी धरला, त्यामुळे त्यांच्या त्या प्रयोगासाठी अकरा मतदारसंघांची उमेदवार निवड प्रक्रिया त्यांच्या हाती सोपवण्यात आली होती. त्यांनी आपल्या पद्धतीने जे अकरा उमेदवार लोकसभेसाठी त्या मतदारसंघांमध्ये निवडले, ते सर्वच्या सर्व त्या निवडणुकीत पडले. त्यामुळे काही कल्पना कागदोपत्री कितीही आकर्षक जरी वाटत असल्या, तरी प्रत्यक्ष राजकारणाच्या रणमैदानात त्या कुचकामी ठरू शकतात हा धडा राहुल यांना मिळाला आहे. आजवर जेथे जेथे राहुल यांनी पक्षाचा किल्ला लढवला, तेथे तेथे अपयशच त्यांच्या पदरी आले आहे. दमदार नेतृत्वशैलीचा त्यांच्या ठायी पूर्ण अभाव दिसतो. त्यांचा लहरीपणा, अपुरी राजकीय समज यामुळे ते पक्षाला पुनर्वैभव कितपत प्राप्त करून देऊ शकतील याबाबत पक्षाच्या जुन्याजाणत्या नेत्यांनाच संभ्रम आहे. अशा परिस्थितीत येत्या ११ एप्रिलला अ. भा. कॉंग्रेस महासमितीचे अधिवेशन होऊ घातले आहे. तेथे राहुल यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याची जोरदार मागणी होऊ शकते. परंतु पक्षाची घसरण रोखू न शकलेले आणि पक्षाच्या इतिहासात खासदारांचा नीचांक प्रस्थापित करणारे राहुल यांचे ‘नेतृत्व’ त्यांच्या दीर्घ सुटीतील आत्मचिंतनानंतरही पक्षाला पूरक ठरेल की मारक हा प्रश्नच आहे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अल्झायमरला दूर ठेवण्यासाठी….

डॉ. गजानन पाणंदीकर(न्युरॉलॉजिस्ट- हेल्थवे हॉस्पिटल) २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर या रोगाचा...

कोरोना विरोधात रसायन द्रव्ये

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) २०२० वर्ष फक्त जगायचे, आरोग्य सांभाळायचे. बस्स..! कोणतीच चिंता नको, कसे होईल ही...

भाजणे : लक्षणे, कारणे, उपचार भाग – २

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) कित्येक लोकांचा असा गैरसमज असतो की भाजलेल्या जखमेवर टूथपेस्ट, क्रीम, बटर इत्यादी...

गायीचे दूध आणि त्याचे स्वरूप भाग – ३

वैद्य स्वाती हे. अणवेकरम्हापसा आपल्या देशी गाईंचे संगोपन अगदी कमी खर्चात होते. म्हणून त्यांना बेवारशासारख्या रस्त्यावर न सोडता...

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

ALSO IN THIS SECTION

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

मेहेरबानी का?

गोव्यातील खासगी इस्पितळांवर राज्य सरकार आणि विशेषतः आरोग्य खाते फारच मेहेरबान दिसते. देशातील बहुतेक सर्व राज्यांनी खासगी इस्पितळांतील कोरोना रुग्णांवरील उपचाराचे दर...

असंतोषाचे ‘बादल’

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिनीच त्यांच्या मंत्रिमंडळातील विश्‍वासू मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलाच्या एकुलत्या एक मंत्री हरसिम्रतकौर बादल यांनी सरकारच्या ‘शेतकरीविरोधी...

चौकशी करा

राज्यातील बांधकाम मजूर घोटाळाप्रकरणी निवृत्तीच्या उंबरठ्यावरून लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी दिलेला निवाडा सरकारची अब्रू वेशीवर टांगणारा आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये बांधकाम...

दिलासा आणि भरवसा

कोरोनाने मानवाची सर्वश्रेष्ठत्वाची अहंता उद्ध्वस्त केली. डोळ्यांना न दिसणारा, संवेदनांना न जाणवणारा एखादा अतिसूक्ष्म विषाणू देखील ह्या अब्जावधी माणसांना एवढे हतबल करू...