अग्नी-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

0
99

पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नी-५ या क्षेपणास्त्राची काल ओडिशाजवळील व्हीलर बेटावरून पुन्हा यशस्वी चाचणी घेण्यात आली. एका वर्षात हे क्षेपणास्त्र भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार आहे. या क्षेपणास्त्रामुळे आता भारताला पाच बलाढ्य देशांमध्ये स्थान मिळाले आहे. अशी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे सध्या फक्त अमेरिका, रशिया, चीन व फ्रान्स या चारच देशांकडे आहेत. एक टन वजनाची अण्वस्त्रे वाहून नेण्याची या क्षेपणास्त्रात क्षमता आहे. त्यात गायरोस्कोप व ऍक्सिलरोमीटर यांचा वापर करण्यात आल्याने हे क्षेपणास्त्र निश्‍चित दिशेने लक्ष्यभेद करण्याइतपत सक्षम आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेचा अपवाद सोडल्यास जगातील अनेक महत्त्वाचे देश त्याच्या टप्प्यात येऊ शकतात. चीनलाही तोडीस तोड उत्तर देण्यासंदर्भात भारताची ताकद यामुळे वाढली आहे.