अखेर 36 दिवसांनी अमृतपालला अटक

0
10

>> पंजाब पोलिसांनी ठोकल्या मोगा येथे बेड्या

खलिस्तानी समर्थक तसेच ङ्गवारिस पंजाब देफ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला अखेर 36 दिवसांनी काल रविवारी सकाळी पंजाब पोलिसांनी मोगा येथून अटक केली. पोलिसांनी त्याला मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेत अटक केली आहे. अजनाळा घटनेनंतर तो फरार झाला होता. अमृतपालच्या इतर साथीदारांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यापूर्वी अमृतपाल गुरुद्वारामध्ये प्रवचन देत होता. पंजाब पोलीस आणि गुप्तचर अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली.
अटक केल्यानंतर अमृतपालला भटिंडा विमानतळावरून विमानाने आसाममधील दिब्रुगड तुरुंगात नेण्यात आले आहे.

36 दिवसांपासून फरार
अमृतपाल गेल्या 36 दिवसांपासून फरार होता. आपल्या एका समर्थकाच्या सुटकेसाठी अमृतपालने 23 फेब्रुवारीला पंजाबमधील अजनाळा पोलीस स्थानकावर हल्ला केला होता. या घटनेनंतर पोलीस त्याचा शोध घेत होते.
मोगाच्या रोडे गावात तणावाचे वातावरण असल्यामुळे पोलिसांनी तेथे ध्वजसंचलन केले.
अमृतसरचे एसएसपी सतिंदर सिंह आणि पंजाब पोलीस इंटेलिजन्सचे आयजी रविवारी सकाळीच सदर गुरुद्वारात पोहोचले. पोलीस साध्या गणवेशात आले आणि सकाळीच त्यांनी अमृतपालला अटक केली.

भिंद्रनवालाच्या गावातून अटक
अमृतपाल सिंगला ज्या गावातून पकडण्यात आले. ते गाव पंजाबचे रोडे गावात जर्नेलसिंग भिंद्रनवाला यांचे जन्मगाव आहे. एवढेच नाही तर वारिस पंजाब देचा प्रमुख होण्यासाठी अमृतपाल सिंग याने येथे दस्तरबंदी सोहळा केला होता.

पत्नीला विमानतळावर अडवले…
अमृतपालची पत्नी किरणदीप कौर हिला अमृतसर विमानतळावर अडवत पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले होते. किरणदीप ही लंडनला पळून जाण्याच्या प्रयत्नात होती, मात्र विमानात बसण्यापूर्वीच पोलिसांना माहिती मिळाल्याने तिला ताब्यात घेण्यात आले होते. लूक आऊट नोटीस जारी असल्यामुळे किरणदीप कौरला प्रवास करू दिला नाही आणि तिला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले होते.