डोंगरी-तिसवाडी येथे काल गणपत वेंगुर्लेकर या इसमाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार चालू असताना गोळीबार करण्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारातून मृत इसमाचे बंधू दैव बलवत्तर होते म्हणून वाचल्याचे अंत्यसंस्काराला हजर असलेल्या लोकांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी पीटर वाझ नामक व्यक्तीला अटक केली असून, त्याच्याकडून पिस्तूल हस्तगत केले आहे. ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येत होते, तेथे ते करण्यास पीटर वाझ याचा विरोध होता व त्यावरुन त्यांच्यात भांडण झाले.