18 दिवस होते अंतराळात
23 तासांच्या प्रवासानंतर यान उतरले कॅलिफोर्नियात
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला 4 अंतराळवीरांसह पृथ्वीवर परतले आहेत. त्यांचे ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरले आहे. शुभांशू हे सुमारे 18 दिवस अवकाशात होते, या काळात त्यांनी अनेक प्रयोगही केले. शुभांशू शुक्ला हे 25 जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून फाल्कन 9 रॉकेटने अंतराळात गेले होते.
शुभांशू शुक्ला 25 जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून फाल्कन 9 रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात गेले होते. ते अमेरिका, पोलंड आणि हंगेरीमधील तीन सहकारी अंतराळवीरांसोबत 14 जुलै रोजी दुपारी 4.45 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीकडे रवाना झाले. अखेरीस, हे सर्व अंतराळवीर काल 15 जुलै रोजी सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत.
10 दिवस देखरेखीखाली
शुभांशू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आणि अंतराळातील त्यांच्या शरीरावर झालेल्या परिणामांतून बरे होण्यासाठी 10 दिवस देखरेखीखाली ठेवले जाणार आहेत. त्यानंतर ते भारतात परतण्याची शक्यता आहे. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे.
अनेक प्रयोगांमध्ये भाग
शुभांशू शुक्ला हे भारतीय हवाई दलात स्क्वाड्रन कमांडर आहे. त्यांना 2000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. शुभांशू यांनी आपल्या 18 दिवसांच्या अंतराळातील कार्यकाळात 60 हून अधिक प्रयोगांमध्ये भाग घेतला आहे. ज्यात भारताच्या 7 प्रयोगांचा समावेश आहे. शुभांशू यांनी अंतराळात मेथी आणि मूगाचे बीजचा अभ्यास केला.
41 वर्षांनंतर भारतीय
अंतराळवीर अंतराळात
अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय संस्था इस्रो यांच्यातील करारानुसार भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची ॲक्सिओम-4 या मोहिमेसाठी निवड झाली होती. 41 वर्षांपूर्वी 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून भारताचे राकेश शर्मा यांनी अंतराळात प्रवास केला होता. यानंतर शुभांशू यांचा हा अनुभव भारताच्या गगनयान मोहिमेत उपयुक्त ठरणार आहे. ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे, ज्याचा उद्देश भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे आहे. हे 2027 मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. भारतात अंतराळवीरांना गगनयात्री म्हणतात.
मोदींनी केले स्वागत
अंतराळवीर शुभांशू यांच्या परतल्यानतंर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संपूर्ण देशासह, मी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे त्यांच्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासातून पृथ्वीवर परतल्याबद्दल स्वागत करतो असे म्हटले आहे. शुभांशू यांनी आपल्या समर्पणाने, धाडसाने अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली आहे. आपल्या स्वतःच्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेच्या दिशेने हा आणखी एक मैलाचा दगड आहे – गगनयान असे त्यांनी पुढ म्हटले आहे.
अंतराळात काय केले?
अंतराळवीर शुशांशू यांनी 18 दिवस अंतराळात 60 वैज्ञानिक प्रयोग केले. शुभांशू यांनी मोहिमेदरम्यान 60 हून अधिक वैज्ञानिक प्रयोगांमध्ये भाग घेतला. यामध्ये भारतातील सात प्रयोगांचा समावेश होता. त्यांनी अंतराळात मेथी आणि मूगाचे दाणे वाढवले. त्यांनी ‘स्पेस मायक्रोअल्गी’ प्रयोगातही भाग घेतला. त्यांनी अंतराळात हाडांच्या आरोग्यावरही प्रयोग केले.
28 जून रोजी शुभांशू यांनी आयएसएसवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केले. यादरम्यान त्यांनी सांगितले की भारत अंतराळातून खूप भव्य दिसतो.
विद्यार्थ्यांशी संवाद : 3, 4 आणि 8 जुलै रोजी त्यांनी तिरुअनंतपुरम, बंगळुरू आणि लखनऊ येथील 500 हून अधिक विद्यार्थ्यांशी हॅम रेडिओद्वारे संवाद साधला. तसेच 6 जुलै रोजी त्यांनी इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रयोगांबद्दल आणि भारताच्या गगनयान मोहिमेतील त्यांच्या योगदानाबद्दल चर्चा केली.
ख् पृथ्वीचे छायाचित्र : शुभांशू यांनी आयएसएसच्या क्युपोला मॉड्यूलमधून पृथ्वीचे अद्भुत फोटो काढले, सात खिडक्या असलेला हा एक खास भाग आहे.

