Home बातम्या अंगावर वीज पडून झरेबांबरमधील महिला ठार

अंगावर वीज पडून झरेबांबरमधील महिला ठार

0

बोडदेत तीन महिला जखमी

बुधवारी दुपारी ३ वा. ढगांचा गडगडाट चालू असताना अंगावर वीजेचा लोळ पडल्यामुळे झरेबांबर येथील पाट्ये गावातील सुनिता गुंडू गवस ही महिला जागीच ठार झाली. तसेच बोडदे गावातही घरावर वीज पडल्याने तीन महिला जखमी झाल्या आहेत.

ऐन गणेशोत्सवात या वरील महिला ठार झाल्यामुळे पाट्ये गावात हळहळ व्यक्त होत आहे. दोडामार्ग तालुक्याला काल दुपारी जोरदार पावसाने झोडपून काढले.

सुनिता गवस या महिलेवर वीज कोसळल्याची माहिती मिळाल्यांनतर स्थानिक नायब तहसिलदार तसेच पोलीस तेथे दाखल झाले. सदर महिला आपल्या घरामागे काम करीत असताना ही घटना घडली. यावेळी कानठळ्या बसवणारा आवाज झाला व माडावरून वीजेचा लोळ थेट तिच्या अंगावर कोसळला.

बोडदे येथील अशाच घटनेत स्वाती फटी नार्वेकर, सुनिता फटी नार्वेकर व सावित्री मोरजकर या महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर भेडशी आरोग्य केंद्रात उपचार करून घरी पाठवण्यात आले. विजेचा पहिला बळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर आयी-किटवाडी येथे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तर विजेचा लोळ पडून महिलेचा मृत्यू होण्याची दोडामार्ग तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणून महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी होत आहे.