संशयितांसमवेत अधीक्षक वामन तारी, उपअधीक्षक पंढरीनाथ मापारी, निरीक्षक संतोष देसाई आणि पोलीस पथक व जप्त केलेला ऐवज. (छाया : शेखर)
January 2012
कॉंग्रेस उमेदवार निश्चित; मात्र घोषणा लांबणीवर
सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत झालेल्या कॉंग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत दि. ३ मार्च रोजी होणार्या गोवा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली. परंतु पक्षात बंडखोरी होईल या भीतीपोटी ती जाहीर करणे लांबणीवर टाकल्याचे कळते.
प्रदेश अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता, उमेदवारांच्या यादीस अद्याप अंतिम मान्यता मिळाली नसल्याचे सांगून पुढील दोन दिवसांत यासंबंधीचा निर्णय होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेसच्या महाघोटाळ्यांनी देशाची बदनामी
व्यंकय्या नायडू यांची पत्रकार परिषदेत टीका
कॉंग्रेस नेतृत्वाखालील यूपीए सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून त्यांनी कधी नव्हे एवढे महाघोटाळे करून समृद्ध परंपरा असलेल्या भारतदेशाचे नाव बदनाम करून देशवासीयांना शरमेने मान खाली घालायला लावल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला.
१ लाख १७ हजार कोटी रु. चा टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, एक लाख कोटी रु. चा राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा घोटाळा, एक लाख कोटी रु. चा आयात-निर्यात घोटाळा, एक लाख कोटी रु. चा ऍन्थ्रेक्स करार घोटाळा असे महाघोटाळे केंद्रातील सरकारने केल्याचे ते म्हणाले.
कळंगुट चोरीतील १९ लाखांचा ऐवज हस्तगत
ब्रिटीश नागरिकांसह दोघांना अटक
कळंगुट येथे सुपरमार्केटमध्ये झालेल्या चोरीप्रकरणाच्या तपासात पोलिसांना यश आले असून चोरीस गेलेल्या १९ लाखांच्या ऐवजासह दोघांना अटक करण्यात कळंगुट पोलिसांना यश आले आहे.
कळंगुट येथील दिगंबर सांगोडकर यांच्या कळंगुट येथील कळंगुट सुपरमार्केट ऍण्ड ज्युवेलर्स दुकानात दि. २७-२८ डिसेंबरच्या मध्यरात्री चोरी होऊन अंदाजे १९ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज चोरांनी लुटला होता.कळंगुट पोलीस स्थानकातील निरीक्षक संतोष देसाई आणि त्यांच्या सहकार्यांनी पाठपुरावा करून काल सकाळी १०.३० वा. दोन अट्टल चोरांना जेरबंद केले. त्यातील एक ब्रिटीश नागरिक असून त्याचे नाव मॅकलेन लॉयड असून दुसर्याचे नाव साथीदार अँथनी मास्कारेन्हास (२१) रा. नाईकवाडो कळंगुट असे आहे.
राष्ट्रवादीला आणखी २ जागा : भोसले
कॉंग्रेसला हव्या असलेल्या उमेदवारांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणखी दोन मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे.
यतिन पारेख यांना दिल्लीला बोलावले
पणजी मतदारसंघाची कॉंग्रेसची उमेदवारी महापौर यतीन पारेख यांना देण्याचा कॉंग्रेसने विचार चालविला असून त्यासाठी पारेख यांना काल तातडीने दिल्लीला बोलावून घेतले आहे.
राज्यातील १० उद्योजकांवर आयकर विभागाचे छापे
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील कारवाईने खळबळ
राज्यातील दहा उद्योजकांवर काल आयकर खात्याने छापा मारून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. आयकर अधिकार्यांनी मिरामार, वास्को, पर्वरी आदी एकुण १८ ठिकाणी छापे टाकल्याचे कळते. रात्री उशीरापर्यंत कारवाई चालू होती.
‘अनुसूचित लोकसंख्येनुसार राखीवता का नाही?’
अनुसूचित जमातींना विधानसभेत १२ टक्के आरक्षण या तत्त्वानुसार त्यांच्यासाठी ५ मतदारसंघ आरक्षित करण्यात यायला हवे होते, असे विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मोरजीत घराला आग
अग्नीशामन दलाचे बंब उशिरा पोचल्याने बांदेकरवाडा मोरजी येथील शशिकला आस्कांवकर यांची खोली भस्मसात होऊन दीड लाख रुपयांचे नुकसान झाले, शेवटी स्थानिक लोकांनीच आग विझवली.
‘बनावट’ मतदारांची माहिती उघड करण्यास टाळाटाळ
निर्मला सावंत यांचा आरोप
कुंभारजुवे मतदारसंघातील धुळापी, जुने गोवे या परिसरात मिळून सुमारे हजारांवर ‘बनावट’ मतदारांची नोंदणी झालेली असून या प्रकरणाची माहिती हक्क कायद्याखाली अर्ज करूनही माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे माजी वीजमंत्री तथा कुंभारजुवे मतदारसंघातील इच्छुक उमेदवार निर्मला सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
पंतप्रधान कार्यालयावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
पंतप्रधान मनमोहनसिंग पुन्हा एकदा पेचात सापडले आहेत. तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यावर २ जी प्रकरणी कारवाई करण्याची मागणी जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली असता पंतप्रधानांना त्यांच्या कार्यालयातील अधिकार्यांनी यथायोग्य सल्ला दिला नाही, असे ताशेरे काल सुप्रीम कोर्टाने ओढले.
पुण्यात येऊन वस्त्रहरण करू
नारायण राणेंचा अजित पवारना इशारा
महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील संबंधात बिघाड तीव्र होत चालला आहे. काल कॉंग्रेसचे आमदार व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथील जाहीर सभेत राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री आर. आर. पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले.
आश्वासनांची खैरात की उमेदवारांची वरात?
- दिलीप बोरकर
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार न्युट गिंग्रिच यांनी एक भन्नाट आश्वासन आपल्या मतदारांना दिलेले आहे. आपणास निवडून दिल्यास चंद्रावर अमेरिकेची वसाहत स्थापन करू असे ते आश्वासन आहे. न्युट यांनी अलिकडेच साऊथ कॅरोलिनामधून प्राथमिक निवडणूक जिंकलेली आहे, असे गृहीत धरल्यास अमेरिकेच्या मतदारांचे कौतुकच करायला हवे. सत्यसृष्टीत उतरू न शकणार्या आश्वासनाने हुरळून जाऊन मतदान करणारे मतदार अमेरिकेत भलेही असतील, पण गोव्यातील सरकारने पूर्व प्राथमिक शाळांचे माध्यम इंग्रजी केले असले तरी, अमेरिकन मतदारांचे हात गोमंतकीय मतदारांच्या डोक्यावर येतील असे काही वाटत नाही, कारण अमेरिकन उमेदवारांची आश्वासने आणि गोमंतकीय उमेदवारांची आश्वासने यात जमीन - अस्मानाचा फरक आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवाराचा अमेरिकेच्या भौतिक विकासावर आणि तंत्रज्ञानावर विश्वास आहे. एक दिवस अमेरिका नक्कीच चंद्रावर वसाहत स्थापन करेल असा तो आश्वासक शब्द आहे. न्युटच्या कारकिर्दीत जरी ते शक्य होणारे नसले तरी अशा प्रकारची स्वप्ने रंगविणारे उमेदवार अमेरिकेत आहेत, पण सध्याच्या निवडणूक रणधुमाळीत गोमंतकीय उमेदवार, मतदारांना जी काही आश्वासने देत आहेत, त्याला ‘आगापिछा’ असल्याचे दिसत नाही.
मगोची दिशा कोणती?
कॉंग्रेसशी जवळजवळ साडे चार वर्षे शय्यासोबत करून झाल्यानंतर आता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला कॉंग्रेसच्या पांघरुणाखालून बाजूला होण्याची पश्चात्बुद्धी सुचली आहे. तत्त्व, भूमिका, धोरण अशा गोष्टींशी या पक्षाचा आणि त्याच्या नेत्यांचा सुतराम संबंध नसावा अशा प्रकारे मगोची एकंदर वाटचाल चालली आहे. त्यामुळे या पक्षाच्या जनमानसातील आजवरच्या प्रतिमेला आणि पक्षाप्रतीच्या बहुजनसमाजाच्या श्रद्धेला तडा जातो आहे याचे भानही पक्षनेतृत्वाला असल्याचे दिसत नाही. आताही एक सुस्पष्ट भूमिका घेण्याऐवजी पक्षाचे दोन आमदार बंधू असूनही परस्परविरोधी भूमिका सोयिस्कररीत्या स्वीकारून सहा मार्चनंतरच्या घटनाक्रमातील स्वतःचे स्थान अबाधित राखण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. वास्तविक राज्यात शैक्षणिक माध्यमाचा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हाच मगो पक्षाने मराठी - कोकणी भाषांच्या बाजूने राहणे हे स्वाभाविक ठरले असते, कारण पक्षाची स्थापनेपासूनची भूमिका आणि परंपरा यांच्याशी ते सुसंगत होते. दीपक ढवळीकरांनी तेव्हा आपण व आपला पक्ष माध्यमप्रश्नावर देशी भाषांच्या बाजूने असल्याचे घोषितही केले होते. परंतु सत्तेच्या हव्यासामुळे म्हणा वा अन्य कारणांनी म्हणा, मगो नेतृत्व माध्यम प्रश्नावर या बोटावरची थुंकी त्या बोटांवर करीत तटस्थ राहिले.
योगमार्ग - रोजयोग (सत्य - ३९)
- डॉ. सीताकांत घाणेकर
जगात हरतर्हेच्या व्यक्ती आहेत. त्यात काही सज्जन तर काही दुर्जन. बहुतांशी असे दिसते की कोणत्याही कारणास्तव दुर्जन लगेच एकत्र येतात. एकमेकांना सहकार्य करतात. पण सज्जन एकत्र येतीलच याची सहसा खात्री नसते. त्याला कारणे अनेक असतात. सज्जन सत्यमार्गाने जाऊन धर्माचे पालन वेळोवेळी करण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी सत्य, धर्म ह्या तत्त्वांचा अतिरेक होतो. त्यामुळे अनेक वाईट घटना घडत असताना सुद्धा तथाकथित सज्जन त्या घटनेविरुद्ध आवाज उठवीत नाहीत. तेव्हा दुर्जनांचे बळ वाढते. ते आणखी अत्याचार करतात. म्हणूनच सत्य, धर्म ह्यांसारखी तत्त्वे अंगीकारीत असताना आपल्या ‘‘भ्रांत धर्माचा’’ इतरांना त्रास होत नाही ना, आपल्या तत्त्वांमुळे काही विपरीत घडत नाही ना ह्याचा विचार प्रत्येक सज्जनाने करायला हवा. पण सहसा असे घडलेले दिसत नाही.
निशिगंधा : निशा ते उषा ...
- प्रा. रमेश सप्रे
‘अरे, जरा सोडव रे हिच्या हाताची ही पकड!’ असं म्हणताना आश्चर्य वाटायचं.. एवढासा हा जीव, पण कुठून शक्ती येते एवढी? एक नवी आलेली पाचवीची छोटीशी मुलगी इतका घट्ट हात पकडायची की कधी कधी शिपायाची मदत घेऊन तिची पकड सोडवावी लागे. गंमत म्हणजे ही पोर रडायची.. पण केव्हा? शाळेत येताना नव्हे, तर शाळेतून जाताना!
कॉंग्रेसकडून भ्रष्टाचार वाढवण्याचे काम : व्यंकय्या
भाजपच्या जनसंपर्क यात्रेचा म्हापशात समारोप
कॉंग्रेसने एका मागोमाग एक असे घोटाळे करून देशात भ्रष्टाचार वाढविण्याचे काम केले असा आरोप करून गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त करून झाले आता कॉंग्रेसपासून मुक्त करण्याची गरज असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.
गेले १५ दिवस चालू असलेल्या भाजपच्या जनसंपर्क यात्रेचा समारोप काल नायडू यांच्या उपस्थितीत झाला. गोव्यात स्थीर आणि स्वच्छ प्रशासनासाठी सभ्य लोकांना निवडून देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
सुदिननी कॉंग्रेस सरकारमधूनतात्काळ बाहेर पडावे : मगो
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या काल झालेल्या केंद्रीय समितीच्या बैठकीत वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांना सरकारातून ताबडतोब बाहेर पडण्यास सांगण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे मगो पक्षाचे कार्याध्यक्ष ऍड. नारायण सावंत व खजिनदार ए. के. तेली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजप बरोबर युती होणार की ‘एकला चलो’ याबाबतीत काय होणार हे आताच सांगणे शक्य नाही. पुढील दोन तीन दिवसांत त्यावर निर्णय होईल, असे सावंत म्हणाले.
बहुजनांतून आलेल्या नेतृत्वाला भाजप डोके वर काढू देत नाही
शांताराम नाईक यांची टीका
गेल्या चार वर्षांच्या काळात भाजप नेत्यांनी गृहमंत्री रवी नाईक यांना अनेक विषयावर लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांना राज्याच्या राजकारणात प्रवेश करण्यापासून रोखणे हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे, परंतु एकंदर परिस्थितीचा अभ्यास केल्यास भाजप बहुजन समाजाच्या नेतृत्वाला डोके वर काढू देत नसल्याचे दिसून येत असल्याची टीका राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
गोमंतकीय जनता भाजप नेत्यांचा आक्रमक स्वभाव सहन करू शकत नाही. याच पक्षाच्या लोकांनी कर्नाटक व मध्यप्रदेशात अल्पसंख्यकांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले केले. त्यामुळे गोव्यातील अल्पसंख्यकांत त्यांच्यावर विश्वास ठेवणे शक्य नसल्याचे नाईक यांनी सांगितले. नोकरशहांचे सहकार्य नसताना राज्याचा विकास करणे शक्य नाही. भाजप राजवटीत दहशतीचे वातावरण तयार केले गेले होते.
रेमो फर्नांडिस ‘निवडणूक आयकॉन’
मुख्य निवडणूक आयुक्त १ रोजी गोव्यात
३ मार्च रोजी होणार्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ‘निवडणूक आयकॉन’ म्हणून निवडणूक आयोगाने प्रख्यात पॉप गायक रेमो फर्नांडिस यांची नियुक्ती केली आहे. ते वेगवेगळ्या माध्यमांतून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करतील, अशी माहिती संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी काल पत्रकारांना दिली.
पंजाबात ७७% तर उत्तराखंडमध्ये ७०%
विधानसभा निवडणुकीत पंजाबात ७७% तर उत्तराखंडमध्ये ७०% मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकार्यांनी दिली. पंजाबात भाजप-अकाली दल संयुक्तपणे निवडणुका लढवत आहे. या दोन्ही राज्यांत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता आहे. तुरळक घटना वगळता दोन्ही राज्यांत शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले. पंजाबात एकेठिकाणी झालेल्या भांडणात पिस्तुलाने गोळी झाडून एकाचा खून केल्याचे वृत्त होते.
बार्जची रेतीउपसा बोटीस धडक
बुडालेले ६ जण सुखरूप
आमोणा येथील मांडवी नदीच्या पात्रात रेती उपसा करणार्या फायबर बोटीला एका मालवाहू बार्जची धडक बसल्याने बोट उलटून सहाजण मांडवी नदीन बुडाले मात्र सर्वांनाच पोहता येत असल्याने त्यांनी लागलीच नदीतून वर येऊन बाजूच्या बोटींचा आसरा घेतला. हा प्रकार घडल्यानंतर कोणत्याही प्रकारची तक्रार न नोंदवता हे प्रकरण सामजंस्याने मिटवण्यात आले.
ख्रिश्चन वस्तूसंग्रहालयातील चोरी;तपास पथक मुंबई, ओरिसाकडे
जुने गोवे येथे गेल्या बुधवारी ख्रिश्चन वस्तूसंग्रहालयातील लाखो रु. किमतीच्या पुरातन वस्तूंची लूट व तेथील सुरक्षा रक्षकाचा खून करण्याची जी घटना घडली होती त्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी गोवा पोलिसांचे एक पथक मुंबईला तर आणखी एक पथक ओरिसा येथील सुंदरगडला रवाना झाले असल्याचे येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन प्रभुदेसाई यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
भांडणातून सुरा खुपसला
माडकोवाडो, कळंगुट येथील एका शॅकवर काम करणार्या दोघा युवकांमध्ये कामावरून शाब्दिक चकमक उडाल्याने त्याचे पर्यावसन भांडणात होऊन एकाने दुसर्याच्या पोटात सुरा खुपसण्याची घटना रविवारी २९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता घडली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
आतापर्यंत २३ लाखांचे मद्य जप्त
अबकारी खात्याने काल दिवसभरात गोव्यातील ११ ठिकाणी छापे मारले. मात्र, फक्त बार्देश व पेडणे येथेच मद्य हाती लागल्याचे खात्यातील सूत्रांनी सांगितले.
पेडण्यातील सरकारी कार्यालये : एक समस्या
- विजय प्रभू पार्सेकर देसाई, पेडणे.
पेडण्यात एक सरकारी कार्यालय संकुल आहे. येथे पूर्वी आदमिनिस्त्रादोर सिव्हील दी कोंसेल्यु दे पेरनेमची कचेरी आणि निवासस्थान होते. येथेच माटा (ङ्गॉरेस्ट) कोमुनिदादी आणि देवालय विभागाची कार्यालये होती. या सर्वांचा प्रमुख आदमिनिस्त्रादोर असे. तोच नगरपालिकेचा अध्यक्ष असे. रेजिदोरी आणि ‘जुंता लोकाल’ पण त्याच्याच अधिकाराखाली होते. रेपारतीसांव दे ङ्गाझेंदा (महसूल खाते) स्वतंत्र इमारतीत होते. आज ही इमारत अस्तित्वात आहे. आदमिनिस्त्रादोर हा डिरेक्टोर दे आदमिनिस्त्रासांव सिव्हीलच्या अधिकारक्षेत्राखाली, तर ङ्गाझेंद डिरेक्टोर दे ङ्गाझेंदाच्या अधिकारक्षेत्राखाली असे.
परिस्थितीशरण पक्ष
भाजपाची पर्वरीची उमेदवारी नाकारली गेलेल्या श्रीपाद नाईकांनी पुन्हा एकदा दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. ते गेल्या काही महिन्यांतील घडामोडींनी नाराज आहेत आणि पक्षशिस्तीचा भंग होऊ न देता व आपल्या पक्षातली धुणी चव्हाट्यावर न धुता, पक्षाच्याच व्यासपीठावर ती वेळोवेळी मांडत आले आहेत. ही त्यांची दिल्ली भेटही त्याच संदर्भात होती यात शंका नाही. ‘पक्षात गोव्यात काय चालले आहे, त्यावर लक्ष असू द्या’ अशी विनंती त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला केली. अर्थात, त्यांच्या या भेटीतून विशेष काही निष्पन्न होईल असे नाही, पण प्रदेश भाजपात ‘ऑल इज नॉट वेल’ असा संदेश मात्र त्यातून जनतेपर्यंत जातो आहे. श्रीपाद यांचे गोव्यातील पक्ष उभारणीतील स्थान कोणालाही हिरावून घेता येणार नाही. त्यांच्या स्वभावानुरुप त्यांना आक्रमकता दाखवता आली नसेल आणि त्यामुळे पक्षकार्यही तेव्हा विस्तारू शकले नसेल, परंतु त्याचा दोष सर्वस्वी त्यांच्या माथी मारता येणार नाही, कारण तत्कालीन राजकीय परिस्थिती व समिकरणेही आजच्यापेक्षा फार वेगळी होती.
भारतीय लढाऊ दलांच्या वाद्यपथकांची ‘बिटींग रिट्रीट सेरिमनी’
नवी दिल्लीच्या विजय चौकात काल भारतीय लढाऊ दलांच्या वाद्यपथकांची ‘बिटींग रिट्रीट सेरिमनी’ पार पडली. त्यावेळी पार्श्वभूमीवर विद्युत रोषणाई केलेले केंद्रीय सचिवालय व संसदीय इमारती. प्रजासत्ताक दिन समारंभाचा समारोप दरवर्षी या सोहळ्याने केला जातो. सूर्यास्तावेळी युद्धबंदी करण्याची परंपराही या शिष्टाचारातून प्रदर्शित केली जाते.
तिकीट नाकारल्याबद्दल श्रीपाद यांची केंद्रीय नेत्यांकडे नाराजी
उत्तर गोव्याचे भाजप खासदार श्रीपाद नाईक यांनी काल दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, लालकृष्ण अडवाणी व अन्य नेत्यांची भेट घेऊन पर्वरी मतदारसंघाची तिकीट नाकारल्याप्रकरणी आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी नाईक यांच्या उमेदवारीच्या प्रश्नावर फेरविचार सुरू केल्याचे कळते.
आपण पक्षाध्यक्ष गडकरी व अडवाणी तसेच अन्य केंद्रीय नेत्यांची भेट घेऊन पक्षाच्या सध्याच्या कारभाराविषयी त्यांना माहिती दिल्याचे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
राष्ट्रीय नेते नाईक यांना न्याय देतील, अशी त्यांच्या येथील समर्थकांना विश्वास वाटतो.
अपघातग्रस्त युवकाच्या मृतदेहासह पेडणे पोलीस स्थानकावर मोर्चा
खनिज ट्रकामुळे तोरसे-पेडणे येथे मोटरसायकल अपघातात विठ्ठल पांडुरंग च्यारी (२९ ) हा युवक ठार झाल्याने संतप्त झालेल्या तोरसेवासीयांनी त्या मृतदेहासमवेत पेडणे पोलीस स्थानकावर धडक मोर्चा नेला व या प्रकरणी संबंधितांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी व अपघाताला कारणीभूत ठरलेला चालक व ट्रकच्या मालकाला अटक करावी अशी जोरदार मागणी केली.
पोलीस निरीक्षकांचे आश्वासन
पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक चेतन पाटील यांनी सांगितले की या भागातील खनिज वाहतूक मार्ग बदलला जाईल. संतप्त नागरिकांनी नुकसान भरपाई मागितलेली आहे, त्या बाबत खनिज ट्रक वाहतुकीशी संबंधित असलेल्यांना बोलावून लोकांच्या मागण्या समोर ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेस उमेदवार निवडीची बैठक पुन्हा लांबणीवर
उमेदवार निवडीसाठीची छाननी समितीची दिल्लीतील बैठकही लांबणीवर पडत असून ती दि. १ किंवा २ फेब्रुवारी रोजी होऊ शकेल, असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
बैठक लांबणीवर पडल्याने दि. ५ पर्यंत उमेदवार जाहीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या प्रकारामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी दि. ३० रोजी बैठक घेण्याचे ठरले होते. सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच चालू असून प्रचंड बंडाळी माजण्याची भीती सर्वच पक्षांना आहे.
राष्ट्रवादी उमेदवार निवड प्रफुल्ल पटेल २ रोजी गोव्यात
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री व राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल दि. २ फेब्रुवारी रोजी गोव्यात येत आहेत.
लष्कर प्रमुखांचा वाद आता कोर्टातच सोडवू
संरक्षण मंत्रालयाने केले स्पष्ट
लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांच्याशी प्रशासकीय तडजोड करण्यात येणार नसून हा प्रश्न सरकार सुप्रीम कोर्टातच सोडवेल असे संरक्षण मंत्रालयाने काल स्पष्ट केले. या प्रकरणी दि. ३ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
लष्कर प्रमुखांच्या जन्मवर्षाबाबत दुरुस्ती करण्याचे लष्कराच्या ऍडजुटंट जनरलना सांगिल्याचा त्यांनी नकार दिला.
पेडण्यात दारू जप्त
पेडणे अबकारी खात्याच्या अधिकार्यांनी सुकेकुळण येथे आज सायंकाळी उशीरा देशी बनावटीची सुफारे २० हजार किफतीची दारु जप्त केली. सुकेकुळण येथील बसशेडच्या मागे ही दारू ठेवण्यात आली होती.
नैपुण्यासाठी भारतीय लष्कराचा यंदा २० देशांशी युद्धसराव
यंदा भारतीय लष्कर सुमारे २० मित्र राष्ट्रांच्या लष्कराशी युद्ध सराव करणार आहे. यात अमेरिका, रशिया, फ्रांस व ब्रिटन यांच्याबरोबरच बांगलादेश, म्यानमार, नेपाळ या शेजारी राष्ट्रांचाही समावेश असेल. उभय राष्ट्रांत तंत्राच्या देवाण घेवाणीतून युद्धसज्जता वाढवणे हा या सरावांचा हेतू आहे.
भाजपची तिकीट नसल्यास थिवीतून अपक्ष लढणार : किरण कांदोळकर
थिवी मतदारसंघातून भाजप उमेदवारी न मिळाल्यास आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे भाजपचे इच्छुक उमेदवार किरण कांदोळकर यांनी सांगितले.
दुचाकीस्वार अपघातात ठार
कुडतरी येथील राजू सोनार (४०) हे काल सायंकाळी दुचाकी अपघात ठार झाले. मयत राजू काल दुपारी जीए ०८ पी ०१६६ या मोटरसायकल वरून चांदर येथून कुडतरी येथे घरी निघाले होते.
पर्वरी दरोडाप्रकरणी संशयित १२ तासांत जेरबंद
गुन्हेगार मायकलचे यापूर्वी दोनवेळा पलायन
काल शुक्रवार दि. २७ रोजी पर्वरीत दिवसाढवळ्या घातल्या गेलेल्या दरोड्यासंदर्भात त्वरित तपास करीत पर्वरी पोलिसांनी बारा तासांंच्या आत सराईत गुन्हेगार मायकल फर्नांडिस आणि त्याच्या अनिल यादव व विजय स्वामी या दोन साथीदारांना कुंभारजुवे येथून अटक केली. संशयितांना पर्वरी पोलीस स्थानकात कोठडीत ठेवण्यात आले आहे.
विष्णुदास (शेखर) भिसे यांच्या बंगल्यात दि. २७ रोजी सायंकाळी ७ वा. तीन बंधूकधार्यांनी धाडसी दरोडा घालून पिस्तुल व चॉपरचा धाक दाखवून लूट करून पोलिसांना आव्हान दिले होते. चोरांपैकी एकाने आपले नाव मायकल असल्याचे दरोडा घालतानाच सांगितले होते.
मणिपूरमध्ये ८२ टक्के मतदान
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पहिल्याच टप्प्यात काल मणिपूर विधानसभेसाठी ८२ टक्के मतदान झाले. दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीत १७ लाख ४० हजार मतदारांनी मतदान केले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी पी. सी. लॉमकुंगा यांनी दिली.
निवडणुकीशी संबंधित हिंसाचाराच्या घटनांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान मारले गेले. मणिपूरमध्ये काही ठिकाणी जिवंत बॉम्बही आढळून आले. मतदानावेळी झालेल्या विविध हिंसक घटनांत पाचजण मारले गेल्याचे वृत्त आहे. दांपी मतदानकेंद्रावर एक मतदार, एक सुरक्षा रक्षक व आणखी एक व्यक्ती गोळीबारात ठार झाली.
राममंदिर व अल्पसंख्यक आरक्षणसंबंधी भूमिकेमुळे भाजपापुढे गोव्यात पेच
उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यास अयोध्येत राममंदिर उभारणारच आणि अल्पसंख्यकांना केंद्र सरकारने जाहीर केलेले धर्माधारित आरक्षण रद्द करणार अशा प्रमुख घोषणा भाजपाच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्यात करण्यात आल्या असल्याने गोव्यातील भाजपा नेतृत्व पेचात सापडले आहे.
गोव्यात सत्तेची स्वप्ने पाहायची असतील तर राममंदिर किंवा धर्माधारित आरक्षणासारखे मुद्दे बाजूला ठेवून इतर मुद्दे प्रामुख्याने मतदारांच्या मनावर ठसवणे आवश्यक असल्याचे भाजपा नेतृत्वाला वाटते. त्यामुळे गोव्याच्या निवडणुकीसाठी तयार केल्या जात असलेल्या जाहीरनाम्यामध्येही रोजच्या जगण्याशी संबंधित मुद्द्यांवर भर देण्याचे भाजपाने ठरवले होते.
प्रत्येक समाजघटकासाठी काय काय घोषणा करायच्या त्याची जंत्रीही पक्षाच्या जाहीरनामा समितीने तयार केलेली असून लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असलेल्या जाहीरनाम्यात प्रत्येक समाजघटकाला डोळ्यांपुढे ठेवून पक्ष आपला कृतिकार्यक्रम मांडणार आहे. मात्र, उत्तर प्रदेशसाठी पक्षाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात मात्र राममंदिर आणि अल्पसंख्यक आरक्षणासारखे स्फोटक विषय ऐरणीवर आणल्याने गोव्यात यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेणे पक्षासाठी आवश्यक ठरले आहे.
गोमंतकीयत्व जपण्यासाठी गोविपा-युगोडेपा युती : मिकी
गोमंतकीयत्व, गोव्याची संस्कृती व निसर्ग संपदा तसेच गोव्यातील लोकांचे हित सांभाळण्याचे काम कॉंग्रेस सरकारने या ५० वर्षांत केलेले नाही. ते हित व गोमंतकीयत्व जपण्यासाठी गोवा विकास पार्टी व यूजीडीपी या दोन पक्षांनी युती घडविली असून गोव्यातील ४० ही मतदारसंघांत उमेदवार उभे करणार असून जनता खात्रीने या युतीचे सरकार सत्तेवर आणील असा विश्वास गोवा विकास पार्टीचे सर्वेसर्वा मिकी पाशेको यांनी युतीचे सात उमेदवार जाहीर केल्यानंतर काल पत्रकार परिषदेत सांगितले.
तिकिटाच्या अनिश्चिततेमुळे उमेदवार संभ्रमात
कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढणार हेच सांगणे अवघड
कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मगो या चारही प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर न झाल्याने गेल्या बर्याच दिवसांपासून प्रचारकार्यास सुरुवात केलेल्या इच्छुक उमेदवारांना आपण कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणार आहोत हेच ठामपणे सांगणे शक्य होत नसल्याने त्यांची मतदारांसमोर गेल्यानंतर तारांबळ उडत आहे.
जनता दल युनायटेड १५ जागा लढवणार
जनता दल युनायटेडच्या गोवा शाखेने दि. ३ मार्च रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीत १५ उमेदवार उभे करण्याचे ठरविले असून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जावेद रझा यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत पणजी, वास्को व केपे या तीन मतदारसंघांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली.
मडगाव येथे दिवसाढवळ्या १ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास
पाजीफोंड येथे चोरट्यांनी घरात घुसून सुमारे १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पळवल्याची तक्रार हरीश मकवाना यांनी मडगाव शहर पोलिस स्थानकात केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी घरात घुसून सोन्याच्या बांगड्या तसेच मंगळसूत्र मिळून सुमारे १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे दागिने पळवल्याची माहिती पोलिस अधिकार्यांनी दिली.
बुडणार्या ७ पर्यटकांना वाचवले
कळंगुट, बागा व सिकेरी समुद्रकिनार्यावरील दृष्टीच्या जीवरक्षकांनी सात महाराष्ट्रीय अधिकार्यांना समुद्रात बुडण्यापासून वाचवले. यातील नागपूरच्या पराग कवळे (३९) याला तर दृष्टीचे अधिकारी शिंदे यांनी मृत्यूच्या दाढेतून प्राणवायूचे डोस देत बाहेर काढले. बागा येथे समुद्रात बुडताना सर्वण कुमार, पुणे (३८), याला जीवरक्षक संतोष पाटील याने, रुपेश पाटील (२३), रोहन रेपाळ (२३), विवेक फडके (२४) सर्व मुंबई यांना जीवरक्षक रुपेश गावस व पर्यवेक्षक विठ्ठल च्यारी यांनी वाचवले.
कळंगुट येथे सुपरमार्केटचे टाळे तोडून ६ लाखांची चोरी
कळंगुट येथील बाजारातील ‘कळंगुट सुपर मार्केट’च्या शटरचे टाळे तोडून शुक्रवारी रात्री काही अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू मिळून अंदाजे सहा लाख रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली.
एकाच व्यक्तीस दोनदा पद्मश्री
चाळीस वर्षांपूर्वी ‘पद्मश्री’ किताब दिलेल्यालाच पुन्हा यंदा ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित करण्याचा अजब प्रकार ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राने उघडकीस आणला आहे. नेहरूंच्या काळातील एक जुनेजाणते छायाचित्रकार सुनील जनाह यांना यंदा ‘पद्मश्री’ जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी त्यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित केले गेलेले आहेच. तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांना ‘पद्मश्री’ किताब देण्यात आला होता. तेव्हा त्यांच्या आडनावाचे स्पेलिंग ‘जनथ’ असे केले गेले होते व त्यांचे वास्तव्याचे ठिकाण दिल्ली दाखवले गेले होते. मात्र ते मूळचे आसामचे आहेत, अशी माहितीही या संदर्भातील बातमीत देण्यात आली आहे.
खानावळींवरील निर्बंध हटले; बारवर कायम
निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोलीस, अबकारी खाते व वाणिज्य खात्याचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत खानावळीवरील वेळेची मर्यादा मागे घेण्याचा तर बार दहा वाजेपर्यंतच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सत्व - तत्व निष्ठा ढासळली, ‘स्व’निष्ठा मात्र बोकाळली!
- रमेश सावईकर
लोकशाही शासनप्रणालीत तीच्या योग्यतेनुसार सरकार प्राप्त होते असे म्हटले जाते.(द पीपल गेट द गव्हर्न्मेंट, दे डिझर्व) राज्यशास्त्रातील एक प्रमेय म्हणून हे खरे असले तरी, बदलत्या काळानुरूप त्यातील तथ्य कमी होत आहे, असे म्हणण्यासारखी परिस्थिती आज आपल्या भारत देशात निर्माण झाली आहे. आपले गोवा राज्यही याच प्रवाहात सामील झाले आहे, असे खेदाने म्हणावे लागते.
‘आधार’ वाचले, पण...
‘आधार’ ओळखपत्र आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या केंद्र सरकारच्याच दोन महत्त्वाकांक्षी योजनांमधील पुनरुक्तीसंदर्भात अखेर सरकारने मध्यममार्ग काढला. त्यामुळे ‘आधार’ योजना बारगळण्यापासून वाचली. नागरिकापाशी जर ‘आधार’ चा क्रमांक असेल, तर त्याला लोकसंख्या नोंदणी करताना पुन्हा आपली ‘बायोमेट्रिक’ माहिती देण्याची गरज नसेल, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, संसदेच्या स्थायी समितीने व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेकसिंग अहलुवालिया यांनी घेतलेले आक्षेप यामुळे सरकारने हा मध्यममार्ग काढीपर्यंत या दोन्ही योजनांखाली एकाच प्रकारची माहिती गोळा करून कोट्यवधी रुपये वाया घालवले गेले त्याचे काय? या उधळपट्टीचे साधे गणित मांडायचे तर प्रत्येक ‘आधार’ कार्डामागे साधारणतः दीडशे रुपये खर्च येतो. त्यापैकी केवळ बायोमेट्रिक माहिती गोळा करण्यामागील खर्च ३० ते ३५ रुपये आहे. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसाठी हीच बायामेट्रिक माहिती गोळा करण्याचा खर्च मात्र त्याहून कमी म्हणजे २५ ते २८ रुपये आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान पद्मभूषण डॉ. जुझे परेरा
- अनिल पै
गोमंतपुत्रांनी कला, साहित्य, शिक्षण, उद्योग, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच अनेक क्षेत्रांत आपल्या ज्ञानाने व विद्वत्तेने जगात कीर्ती मिळवलेली आहे व गोव्याबरोबर भारताचे नाव जगात उज्ज्वल केलेले आहे. त्यांतीलच एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान पद्मभूषण डॉ. जुझे परेरा. प्रकांड पंडित, विद्वान, इतिहास संशोधक, धर्म-संस्कृती व कलेचे अभ्यासक, कोंकणीचे निष्ठावंत भक्त असलेल्या डॉ. जुझे परेरा यांना भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा जो गौरव केलेला आहे तो यथोचितच आहे. तसे पाहू गेल्यास त्यांना हा पुरस्कार यापूर्वीच मिळायला हवा होता.
स्वातंत्र्य चळवळ आणि भाषा आंदोलनातील लखलखता तारा निखळला
- कॅजिटन परेरा
सत्तरी तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक जयसिंगराव व्यंकटराव राणे यांना अखेरचा सलाम करण्यासाठी आम्ही काही समाजवादी मित्रमंडळी गेल्या मंगळवारी त्यांच्या अंत्यदर्शनाला जाऊन आलो. त्यावेळी झटकन त्यांचा जीवनपट नजरेसमोर येऊन गेला.
महानाट्य ‘रवींद्रनाथ टागोर’
- रामकृष्ण कामत
भारतीय शिक्षण मूल्यांनी युक्त आदर्श संस्कार व स्वाभिमानी नागरिक घडविणे हे भारतीय शिक्षण प्रणालीचा मूल मंत्र होय. भारतीय संस्कृती जपणारे पारंपरिक संस्कार मुलांवर बिंबविण्यासाठी शिक्षकांबरोबर पालकांचीही भूमिका महत्त्वाची आहे, हे प्रयोगसिद्ध आहे. अगदी हेच महत्त्वाचे तंत्र विकसित व्हावे यासाठी पणजी येथील डॉ. केशव बळीराम हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था क्रियाशील आहे. १९९० हे वर्ष या संस्थेचे प्रारंभी वर्ष. पूर्व प्राथमिक शाळा इथपासून १० वी पर्यंत विद्यालय असे आज या संस्थेचे स्वरूप आहे. गेल्या ६ वर्षांपासून १० वीचा निकाल १०० % लागत आहे. शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा मुलांचा सर्वांगीण विकास साधणार्या क्षेत्रात या संस्थेने नेहमीच राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे.
रामेश्वराची सिंधुदुर्ग किल्ला भेट!
- लाडोजी परब
मालवण (जि. सिंधुदुर्ग) पासून अवघ्या आठ कि. मी. अंतरावर असलेले कांदळगाव! गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. कांदळगावचे रामेश्वर हे ग्रामदैवत. दर तीन वर्षांनी हा रामेश्वर आपल्या पंचायतनासह सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीला जातो. हा सोहळा अविस्मरणीय असतो. या सोहळ्याचा इतिहास जाणून घेताना अनेक गोष्टींचा उलगडा होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्चस्व आणि त्यांचे सामर्थ्य वाढत असतानाच सागरी मार्ग मजबूत केल्यावर आपले राष्ट्र अधिक सुरक्षित होईल, या विचाराने छत्रपतींनी जंजिरा किल्ला काबीज करण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. मात्र शिवाजीराजांना अपेक्षित यश मिळाले नाही. १६व्या शतकात मालवण समुद्रातून प्रवास करताना चारही बाजूने पाणी असलेले कुरटे बेट महाराजांच्या दृष्टीस पडले.
पर्वरीत पिस्तुलाचा धाक दाखवून भरदिवसा दरोडा
बंगल्यातील दोघा महिलांचे दागिने व रोकड लुटली : तिघा जणांचे कृत्य
येथील विद्युत खात्याजवळील विष्णूदास भिसे यांच्या बंगल्यात काल सायं. ७ वा. घुसून तीन अज्ञात इसमानी चॉपर व पिस्तुलाचा धाक दाखवून अंदाजे ७०००० रुपयांचा ऐवज लुटून नेला. पोलिसानी ३९४ कलमाखाली गुन्हा नोंदविला असून तपास चालू आहे.
सविस्तर वृत्त असे की काल दि. २७ रोजी सायंकाळी ७ वाजता तीन अज्ञात इसम भिसे यांच्या बंगल्यावर आले. त्यावेळी भिसे यांच्या पत्नी सौ. वर्षा, सासू श्रीमती रुक्मीणी दिवकर आणि मुलगा वेद घरात होते. त्यानी दरवाजावर थाप मारली. छोट्या वेदने दरवाजा उघडला असता तिघे एकदम आत घुसले आणि चॉपर आणि पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने व पैशांची मागणी केली. पत्नी, मुलगा आणि सासूला बेडरूममध्ये बसवून त्यांनी कपाट धुंडाळले. परंतु त्यांच्या हाती ८००० रुपये लागले. नंतर त्यानी सासूच्या बांगड्या हिसकावून घेतल्या, पत्नीच्या बांगड्या त्यानी स्वत: दिल्या, पती विष्णूदास भिसे कामानिमित्त बाहेर होते. सुमारे पाउण तास हे भय नाट्य चालू होते.
भाजपा-मगो युतीत जागावाटपावरून अडथळा
आगामी विधानसभा निवडणुकीत मगो-भाजप युतीचा प्रस्ताव तत्वत: मान्य झालेला असून जागावाटपाच्या प्रश्नावर अंतिम निर्णय न झाल्यामुळेच युती अडल्याचे भाजप प्रवक्ते विष्णू सूर्या वाघ यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
मगोने दहा जागांसाठी मागणी केली आहे. ठराविक जागांच्या बाबतीत भाजपची वेगळी भूमिका आहे. मगोच्या क्षमतेनुसार त्यांना जागा दिल्या जाणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.
अयोध्येत राममंदिर बांधू; अल्पसंख्यकांचे आरक्षण रद्द करू
भाजपच्या उत्तर प्रदेशसाठीच्या जाहीरनाम्यात घोषणा
उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यास अयोध्येत भव्य राममंदिर बांधले जाईल, अशी घोषणा भाजपाने उत्तर प्रदेशसाठी जारी केलेल्या आपल्या जाहीरनाम्यात केली आहे.
लखनौमध्ये हा जाहीरनामा काल प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी भाजपाचे राज्य अध्यक्ष सूर्यप्रताप शाही, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती, मुख्तार अब्बास नक्वी व इतर नेते उपस्थित होते. अयोध्येत राममंदिर बांधण्यास भाजपा वचनबद्ध असल्याचे वक्त्यांनी यावेळी सांगितले. इतर मागासवर्गीय अल्पसंख्यकांना केंद्र सरकारने देऊ केलेले ४.५ टक्के आरक्षण रद्दबातल केले जाईल असेही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
पेडण्याच्या नगराध्यक्षांसह सहा नगरसेवक भाजपात
मोपा हरित विमानतळ घोषित करू : पर्रीकर
पेडण्याचे नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू यांच्यासह पेडणे पालिकेच्या सहा नगरसेवकांनी काल भाजपात प्रवेश केला. एकेकाळचे बाबू आजगावकर यांचे खंदे समर्थक गणले जाणारे धारगळचे माजी सरपंच प्रदीप ऊर्फ भूषण नाईक यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी त्यांचे पुष्पहार घालून पक्षात स्वागत केले. पेडणे पालिकेचे नगरसेवक उपेंद्र देशप्रभू, माधव शेणवी देसाई, गजानन सावळ देसाई, नगरसेविका नूतन आरोसकर व अमिता माशेलकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
फोंड्यात इसमाचा खून
बाबल्याखळी कुर्टी फोंडा येथे ४५ वर्षे वयाच्या इसमाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली असून आरोपी सापडलेला नाही. सुभाष ऑनवंत असे मयताचे नाव समजले आहे. पोलिसांना खबर मिळाल्यानंतर फोंडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक सिध्दांत शिरोडकर यांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे.
निवडणूक अधिकारी कॉंग्रेसचे हस्तक : मिकी
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
निवडणूक आचारसंहितेचा भंग करून कॉंग्रेसचे मंत्री व आमदार मतदारांना आमीष दाखवण्यासाठी क्रीडा साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू राजरोसपणे वाटतात, तसेच या दिवसांत औरंगाबाद येथून चाळीस ट्रक बिअरचा साठा गोव्यात पोहोचला आहे. निवडणूक अधिकारी वा भरारी पथकाकडे यासंदर्भात तक्रार करूनही ते वेळेत घटनास्थळी पोहोचत नाहीत यावरून तेही कॉंग्रेसच्या मंत्र्यांचे हस्तक असल्याचा संशय जनतेला येत आहे अशी टीका गोवा विकास पक्षाचे नेते मिकी पाशेको यांनी काल पत्रकार परिषदेत केली. निवडणूक अधिकार्यांविरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे पाशेको यांनी जाहीर केले.
सत्य सांगणे हा आचारसंहिता भंग नव्हे
विलींचे मिस्किंतास प्रत्युत्तर
भाजप व त्यांच्या मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी चर्चेस जाळल्याच्या आपण केलेल्या आरोपामुळे भाजपाचे पदाधिकारी डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांनी आपल्या विरुध्द निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. सत्य घटनांचे कथन करण्यास किंवा त्या सांगण्यास निवडणूक आचारसंहिता लागू होऊ शकत नाही, असे डॉ. विल्फ्रेड डिसौझा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हळदोणे मतदारसंघात पैसे वाटण्याचे प्रकार चालू आहेत.
बागा येथे समुद्रात बुडून दोघा पर्यटकांचा अंत
बागा समुद्रात काल दुपारी २ वाजता बंगळूर येथील सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरी करणार्या दोघा तरुणांना जलसमाधी मिळाली तर तेथील जीवरक्षकांनी एकास जीवदान दिले.
कॅसिनोंमध्ये वेळेच्या निर्बंधांचे उल्लंघन
निवडणूक आयोगांकडे तक्रार
गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या आचारसंहितेचा भंग करीत कॅसिनो तथा काही तारांकीत हॉटेल नव्याने जाहीर केलेल्या मुदतीच्या वेळापत्रकाचे उल्लंघन करीत असल्याची तक्रार राज्य मुख्य निवडणूक अधिकार्यांना सादर केली आहे. समुद्रात तथा समुद्राबाहेर असलेल्या कॅसिनोमध्ये व काही तारांकीत हॉटेलात २५ जानेवारी रोजी नव्याने जाहीर केलेल्या बंदीसंदर्भातल्या वेळापत्रकाचे उघडपणे उल्लंघन केले जात असल्याची तक्रार ऍड्. आयरिश रॉड्रिग्ज यांनी केली आहे.
भाजप मगो युतीचे घोडे कुठे अडले?
- चरणजित सप्रे, फोंडा
भाजप, म.गो. युती झाली किंवा नाही ह्याला जेवढे महत्त्व आहे तेवढे ती युती झाली नाही तरीही आहे. सुदिन ढवळीकर गेली साडेचार वर्षे कॉंग्रेस सरकारात सत्तेचा उपभोग घेत राहिले त्यावेळी जेव्हा जेव्हा त्यांना युतीविषयी प्रश्न केला जात होता तेव्हा तेव्हा ते मूग गिळून गप्प राहायचे. आजही तीच परिस्थिती आहे. सुदिन ढवळीकर ‘धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं ’ अशा स्थितीत अडकले आहेत.
अण्णा : पार्ट टू
लोकपालवरून देशात मोठे वादळ उठवल्यानंतर अण्णा हजारेंनी आता पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. ग्रामसभांना संसदेहून सर्वोच्च स्थान देणारा कायदा करा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे आणि ती मान्य केली जावी यासाठी व्यापक आंदोलनास सज्ज राहण्याचे आवाहनही आपल्या अनुयायांना केले आहे. संसद किंवा विधानसभा सदस्य हे जनतेचे केवळ सेवक आहेत व जनता मालक आहे ही भूमिका अण्णा सातत्याने मांडत आले आहेत आणि त्याच अनुषंगाने ग्रामसभांना सर्वोच्च स्थान मिळवून देणारा कायदा करा असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, ग्रामपंचायती आणि ग्रामसभा यांची आजची स्थिती पाहाता केवळ अशा प्रकारचा कायदा करून काही साध्य होईल हा निव्वळ भ्रम आहे. लोकशाहीत सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून ७३ वी घटनादुरुस्ती केली गेली आणि पंचायतीराजचे वारे देशात वाहू लागले. परंतु पंचायतीराजच्या उदात्त संकल्पनेत जे अपेक्षित होते, त्याची पूर्ती तर होऊ शकलेली नाहीच, परंतु आपण तिच्यापासून अद्याप कोसों योजने दूर आहोत हे वास्तव आहे. ग्रामसभांना पंचायतीराज व्यवस्थेमध्ये महत्त्व दिले गेले आहे.
पाळोळे येथे ४ दुकाने भस्मसात
४५ लाखांची हानी
पाळोळे किनार्यावर २५ रोजी मध्यरात्री लागलेल्या आगीत तीन तयार कपड्यांची दुकाने आणि एक वाहन साहित्याचे मिळून चार दुकाने जळून भस्मसात झाल्यामुळे अंदाजे ४५ लाख रु. ची हानी झाली. ही आग विझविण्यासाठी मडगाव, सावर्डे, काणकोण येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.
आग विझविण्यासाठी पाच टँकर इतके पाणी वापरावे लागले अशी माहिती काणकोणच्या अग्निशामक दलाचे प्रमुख काशिनाथ आमोणकर यांनी दिली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून वेळीच आग विझविल्यामुळे बाकीच्या दुकानांचा बचाव करणे शक्य झाल्याचे श्री. आमोणकर यांनी सांगितले.
केपे मतदारसंघावरून मगो-भाजप युतीचा तिढा
मगो - भाजप युतीच्या प्रस्तावावर बोलणी चालू असून केपे मतदारसंघाच्या मुद्द्यावरच युती अडकून असल्याचे भाजप सूत्रांनी सांगितले.
युतीची बोलणी चालू असल्याचे मगो नेते सांगत असतानाच बर्याच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे खासगी सचिव प्रकाश अर्जुन वेळीप यांना मगो पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय झाला त्यामुळे गोंधळ उडाला होता.
क्रिकेट साहित्य सरकारचे नव्हे, बीसीसीआयचे
नार्वेकरांचे निवडणूक आयोगाला उत्तर
मतदारांना क्रीडा साहित्याचे वितरण करून आचार संहितेचा भंग केल्याचा आरोप असलेले हळदोण्याचे आमदार दयानंद नार्वेकर यांनी राज्य निवडणूक आयोगाने वरील प्रकरणी पाठवलेल्या नोटिसेला उत्तर पाठवले असून त्यात गोवा क्रिकेट असोसिएशनला सरकारकडून एकही पैसा मिळत नसून जीसीएला सर्व निधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून मिळत असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले आहे.
जे क्रीडा साहित्य वितरित करण्यात आले होते ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून मिळाले होते व त्याचे वितरण करण्याचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला आपण हजर नव्हतो हे स्पष्ट करणारे तपशीलवार उत्तर आपण उपजिल्हाधिकार्यांना पाठवले असल्याचे नार्वेकर यांनी सदर उत्तरातून स्पष्ट केले आहे.
ख्रिश्चन वस्तूसंग्रहालयातील चोरीप्रकरणी ४ जणांना अटक
जुने गोवे येथे असलेल्या ख्रिश्चन वस्तूसंग्रहालयातील लाखो रुपये मूल्याच्या पुरातन वस्तू लुटण्याची घटना घडली होती. येथील सुरक्षा रक्षकाचाही खून झाल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी पोलिसांनी चार सुरक्षा रक्षकांना अटक करून चौकशी सुरू केली आहे, मात्र निश्चित धागेदोेरे सापडलेले नाहीत. पुरातन मूल्याच्या सोन्याच्या क्रॉससह अन्य वस्तू चोरांनी लुटून नेल्या आहेत.
सार्झोरा अपघातात दुचाकीस्वार ठार
सार्झोरा गुडी येथील क्रशरजवळ टाटा टिपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात असोल्डा येथील नेल्सन आलवेस मोर (२७) हा दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना सकाळी १० वाजता घडली.
ग्रामसभांना संसदेहून सर्वोच्च स्थान देणारा कायदा करा
अण्णा हजारे यांची मागणी
ग्रामसभांना संसदेहून सर्वोच्च स्थान देणारा कायदा सरकारने आणावा अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी काल केली. सरकार ग्रामसभांचे सशक्तीकरण करणारा कायदा आणणार नसेल तर जनलोकपालसारखेच व्यापक आंदोलन उभारण्यास सज्ज राहा, असा संदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
आचारसंहिता भंगाची मुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रार
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मडगाव शहरामध्ये रिंग रोडच्या लिंकसाठी पुनर्वसन करण्याकरिता तसेच मलःनिस्सारण प्रक्रिया आराखडा-मडगावचा विस्तार आणि बफर झोन पुरविण्यासाठी भूसंपादन अधिसूचना दि. २५ जानेवारीच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेली असल्याने आचारसंहितेचा भंग होतो. आपल्या मतदारांना भूल लावण्यासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अधिसूचना काढायला लावल्याची तक्रार मडगाव फ्रंट फॉर चेंजचे सावियो कुतिन्हो व इतरांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात महत्त्वाच्या विषयांना बगल
वादग्रस्त विषयांचा उल्लेख टाळणार
येत्या विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा तयार करताना कॉंग्रेसने बेकायदा खाण, शिक्षण माध्यम, प्रादेशिक आराखडा या वादग्रस्त विषयांना स्पर्श न करण्याचा विचार केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
पुणे थरारनाट्यातील चालकास कोठडी
एस. टी. बस अंदाधुंदपणे चालवून नऊ जणांचे प्राण घेणारा चालक संतोष माने याची तीन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
त्याला काल पुण्यातील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. बुधवारी सकाळी पुण्यातील स्वारगेट डेपोतून पुणे - सातारा बस पळवून नेऊन त्याने वाटेत येणार्या - जाणार्या वाहनांना धडक देत थैमान मांडले होते.
इंग्रजी माध्यम पुरस्कर्त्या माविनना धडा शिकवू
विष्णू वाघ यांचा इशारा
दाबोळी मतदारसंघातून उपसभापती माविन गुदिन्हो याना पराभूत करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे, असे भाजपचे प्रवक्ते विष्णू सूर्या वाघ यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
मृत्यू पांघरून नरेंद्र शेवटपर्यंत काव्य गात राहिला...
- एन. शिवदास
‘अनार्या’ चे ‘आर्यन’ नरेंद्र बोडके गेले, असा फोन दर्दभेदी आवाजात अवधूत कुडतरकरने केला तेव्हा नरेंद्र मृत्यूचे स्वागत करण्यासाठी परत पुण्यात पोचल्याचे समजले, कारण गोव्यात फ्लॅट घेऊन राहायला येतोय हे सांगण्यासाठी ‘गोवा कोंकणी अकादमीच्या कार्यक्रमात मला भेटायला येत आहे, वाटेवर आहे, तू कुठं आहेस?’ असा नरेंद्रचा फोन मला आला होता व सुदैवाने मीही फर्मागुडीहून कोकणी अकादमीच्या कार्यक्रमात जाण्यासाठी जुन्या गोव्याला पोचलो होतो. मी नरेंद्रला म्हटलं, फक्त दहा मिनिटे थांब, मी लगेच पोचतो व ड्रायव्हरला गाडीची गती वाढवायला सांगितली. गाडीतून उतरून मी थेट नरेंद्रचे स्वागत करायला धावलो. नरेंद्र व गौरीला घेऊन केबिनमध्ये आलो, सोफ्यावर बसता बसता नरेंद्र म्हणाला, ‘मला पातळ भाजी व पाव पाहिजे’. मी लगेच ड्रायव्हरला बोलावून घेतले व नरेंद्र व गौरीसाठी नाश्ता आणायला सांगितला.
मतदारांचा कानोसा
येणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात मतदारांच्या मनात सलणार्या विषयांचा कानोसा घेण्याचा एक प्रयत्न ‘नवप्रभे’चे इंग्रजी भावंड असलेल्या ‘नवहिंद टाइम्स’ने आपल्या गावोगावच्या वार्ताहरांमार्फत नुकताच केला. वाढता भ्रष्टाचार हा मुद्दा मतदारांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा आहे असा या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. जवळजवळ ६३.१५ टक्के मतदारांनी वाढत्या भ्रष्टाचाराबाबत नापसंती व्यक्त केली आहे. बेकायदेशीर खाणी, शैक्षणिक माध्यम प्रश्न हे विषयही त्या खालोखाल महत्त्वाचे आहेत, असे मत या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या मतदारांनी व्यक्त केले. आलेले निष्कर्ष खरोखर मनोज्ञ आहेत. केपे, सांगेसारख्या तालुक्यातील खाण पट्ट्यातील मतदार हे बहुतांशी तेथील खाण व्यवसायावर अवलंबून असल्याने बेकायदा खाणींविरुद्ध भूमिका घ्यायला तयार नाहीत, पण खनिज वाहतुकीने पीडित इतर भागांतील मतदार मात्र फोफावलेल्या बेकायदा खाण व्यवसायावर नाराज आहेत असे चित्र या सर्वेक्षणातून पुढे आले. शैक्षणिक माध्यमाचा प्रश्न निवडणुकीवर काहीही परिणाम करणार नाही, असे सरकार ठासून सांगत असले तरी जनता शैक्षणिक माध्यमाच्या विषयावर संतप्त आहे, हेही हे सर्वेक्षण सांगते.
मारिओ मिरांडा यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’
धर्मेंद्र, शबाना यांना ‘पद्मभूषण’
अनुप जलोटा, सतीश आळेकर यांना पद्मश्री
गोव्याचे जगविख्यात दिवंगत व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा, दिवंगत गायक भूपेन हजारिका, महाराष्ट्रातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. कांतिलाल संचेती यांच्यासह पाच जणांना ‘पद्मविभूषण’ किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. ‘पद्म’किताबांच्या एकूण १०९ मानकर्यांमध्ये २७ जणांना पद्मभूषण, तर ७७ जणांना पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले आहे.
‘पद्म’किताबांच्या मानकर्यांत यावर्षी १९ महिलांचा समावेश आहे.
‘पद्मभूषण’ किताबाने सन्मानित झालेल्यांत अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेता धर्मेंद्र, मीरा नायर, प्रख्यात ह्रदयरोगतज्ज्ञ देवी शेट्टी, ज्येष्ठ सनदी अधिकारी एन. विठ्ठल, रोनेन सेन आदींचा समावेश आहे.
मद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारवाल्यांची छळवणूक चालल्याचा दावा गोवा मद्य व्यावसायिकांनी केला असून त्याच्या निषेधार्थ आज २६ जानेवारीपासून निवडणुका संपेपर्यंत मद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद मधुकर नाईक यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. अबकारी अधिकारी व भरारी पथकांकडून छळवणूक चालू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
माडेल येथे दारूच्या गोदामाला सील ठोकले
माडेल-थिवी येथील निवडणूक भरारी पथकाच्या आदेशानुसार एका दारूच्या गोदामाला म्हापसा अबकारी खात्याने सील ठोकून वाहतूक परवाना, बॅच व बाटल्यावर किंमत लावलेली नसल्याच्या कारणास्तव १ लाख रुपयांची वाईन व काजू फेणीचे मिळून २४१ बॉक्स खात्याच्या अधिकार्यांनी जप्त केली.
मगो नेत्यांकडे युतीसाठीबोलणी चालू : पार्सेकर
मगो-भाजप युती व्हावी अशी जनतेची इच्छा असल्याने अजूनही मगो नेत्याजवळ बोलणी चालू आहे. आठवडा अखेरपर्यंत सकारात्मक निर्णय होणे शक्य आहे असे प्रदेश भाजप अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.
लोकशाहीत सुधारणा आणताना स्तंभ ढासळू देऊ नका : राष्ट्रपती
लोकशाहीमध्ये कोणत्याही सुधारणा आणताना त्यामुळे लोकशाहीचे स्तंभ असलेल्या संस्था ढासळणार नाहीत, याचीही खबरदारी घेतली गेली पाहिजे, असे सूचक वक्तव्य राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी काल ६३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात ‘लोकपाल’च्या संदर्भात केले. ‘‘झाडाला लागलेले वाईट फळ काढण्याच्या नादात झाड हलवीत असताना ते झाडच खाली येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल’’ असा इशारा त्यांनी दिला.
केप्यात आठ लाखांची घरफोडी
आमोणे-केपे येथील प्रकाश आमोणकर यांच्या बंद असलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी मागील दारातून प्रवेश करून आठ लाखांचा ऐवज लंपास केला. मागील काही दिवसांपूर्वी शिवनगर येथे घडलेल्या चोरीत व या चोरीत साम्य असल्याचा पोलीस अधिकार्यांचा कयास आहे. सदर घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली.
५ मतदारसंघांस राष्ट्रवादीची सहमती
आणखी तीन जागांवर चर्चा होणार
कॉंग्रेस - राष्ट्रवादी यांच्यात जागावाटपावरून चालू असलेल्या घडामोडींबाबत काल प्रदेश राष्ट्रवादीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समन्वयक डॉ. प्रफुल्ल हेदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली.
पुण्यात एस. टी. बसचालकाचे थैमान
बस पळवून अंदाधुंद चालवली
९ ठार, २७ जखमी
पुण्यात काल सकाळी एका एस. टी. चालकाने स्वारगेट डेपोमध्ये उभी असलेली एक एस. टी. बस पळवून नेऊन अंदाधुंद चालवून रस्त्यावरून जाणार्या किमान २५ वाहनांना आणि पादचार्यांना धडक देत नऊ जणांना ठार केले, तर २७ जणांस जखमी केले. शेवटी पोलिसांनी व नागरिकांनी बस अडवून चालकाला ताब्यात घेतले. या माथेफिरू चालकाचे नाव संतोष मारुती माने (३०) असे असून जवळजवळ तास - दीड तास त्याने पुण्यातील रस्त्यावर थैमान मांडले. त्याला अटक करण्यात आली आहे.
खलप यांना निवडणूक अधिकार्यांची नोटीस
एदुआर्द फालेरोंविरुद्धही तक्रार
यांनी आपल्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदाचा गौरवापर पक्षीय राजकारणासाठी तथा राजकीय प्रचारासाठी केल्याची ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक अधिकार्यांनी आज कायदा आयोगाचे अध्यक्ष रमाकांत खलप यांना नोटीस जारी केली आहे.
कॉंग्रेसला बंडखोरीची भीती
उमेदवार यादी पुन्हा लांबणीवर
उमेदवारीच्या प्रश्नावर काही मतदारसंघात बंडखोरी होण्याची भीती असल्याने कॉंग्रेसला उमेदवारी जाहीर करणे कठीण झाले असून त्यामुळे उमेदवारी भरण्याची मुदत सुरू होण्याच्यावेळी म्हणजे दि. ३ किंवा ४ फेब्रुवारी रोजी उमेदवारांची नावे जाहीर करण्याची कॉंग्रेसने तयारी केली आहे. वरील प्रकारामुळे काही इच्छुक उमेदवार बरेच गोंधळले असून त्यांना उमेदवारीच्या बाबतीत निर्णय घेणे कठीण झाले आहे.
भारतीय लेखकांना गौण समजणे हा वसाहतवादी न्यूनगंड
निवृत्त न्या. काटजू : रश्दींचे साहित्य सुमार दर्जाचे
भारतात राहणार्या चांगल्या लेखकांना गौण समजणे व केवळ एखादा लेखक ब्रिटन किंवा अमेरिकेत राहतो म्हणून त्याला महान समजणे हा वसाहतवादी न्यूनगंड असल्याचे प्रेस काऊंसिलचे चेअरमन व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी सांगितले.
स्वातंत्र्यसैनिक कै. नारायण नाईक : एक लढाऊ पर्व
- ऍड. सतीश सोनक
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इंडिया अगेन्स्ट करप्शनने, आज पणजीतील हॉटेल मनोशांती सभागृहात संध्याकाळी ४.३० वाजता ‘रिबिल्डींग रिपब्लीक’ म्हणजे ‘प्रजासत्ताकाची पुनर्बांधणी’ या विषयावर स्वर्गीय स्वातंत्र्यसैनिक नारायण हरी नाईक स्मृती व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक श्री. विश्राम गुप्ते हे प्रमुख वक्ते म्हणून हजर राहणार आहेत. त्यानिमित्त ः
२८ ऑक्टोबर १९२६ ते २५ जानेवारी २००९ या कालखंडात पोर्तुगीज हुकूमशाहीच्या हातातून सत्ता हिसकावून ती प्रजेच्या हातात देण्यासाठी नारायण नाईक जगले आणि तन-मन-धनाने झुंजलेही! साहजिकच प्रजासत्ताक दिनी नारायण नाईक यांची आठवण येणे अपरिहार्य आहे. महात्मा गांधी व त्यांची १९४२ च्या छोडो भारत आंदोलनातील ‘करेंगे या मरेंगे’ या रणघोषणेने, भारतात स्वातंत्र्यसंग्रामाचा जाळ पेटवला. १८ जून १९४६ रोजी राम मनोहर लोहिया ती ठिणगी घेऊन गोव्यात आल्यावर गोव्यातील तरूणांची मने कमी अधिक प्रमाणात तापू लागली. नारायण नाईक त्यावेळी विद्यार्थी दशेत होते. लोहियांसोबत मडगावला स्थानिक नेत्यांची धरपकड झाल्यावर लायसियममध्ये शिकणारे नाईक पणजीच्या विद्यार्थी निषेध मोर्चात सहभागी झाले व आयुष्यातील पहिली अटक व पहिल्या पोलीस मारहाणीचा अनुभव त्यांनी घेतला. दडपशाहीला विरोध करणार्या गोव्यातील देशभक्त विद्यार्थी चळवळीचा तो प्रारंभ होता. गोवा मुक्तीच्या सत्याग्रहाचे प्रशिक्षण देण्यासाठी बेळगाव, पेडण्याच्या हद्दीवर प्रशिक्षणवर्ग भरायचे. त्यातून स्फूर्ती घेतलेल्या तुकड्या दर महिन्याच्या आठव्या, अठराव्या आणि अठ्ठाविसाव्या दिवशी सत्याग्रह करतील असा बेत होता. नाईक यांचा पुढाकार असलेला सांगे - केपेचा सत्याग्रह महात्मा गांधी की जय या जयघोषात सुरू झाला. पोर्तुगीज सैन्याने नाईक यांना पकडून पोलीस कस्टडीत ठेऊन त्यांच्यावर आठवडाभर अमानुष अत्याचार केले. वयाच्या केवळ विशीत असलेले नारायण नाईक डगमगले नाहीत. पण त्यांच्या मनात अहिंसक सत्याग्रहाच्या उपयुक्ततेविषयी शंका येऊ लागल्या. पोर्तुगीज निर्दयी आहेत, निशस्त्र चळवळ पोर्तुगीजांचे हृदयपरिवर्तन करू शकणार नाही असे विचारचक्र नाईक आणि त्यांच्या समविचारी युवकांच्या मनात सुरू झाले. सुभाषबाबूंकडून प्रेरणा घेऊन आझाद हिंद ङ्गौजेसारखी ङ्गौज उभारणे किंवा महाराष्ट्रातील क्रांतिवीर नाना पाटील यांच्याप्रमाणे प्रतिसरकार स्थापणे असे विविध पर्याय गोव्यातील तरूणाईला खुणावू लागले.
भुलभुलैय्या
‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली...’ या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सुवचनामध्ये थोडा फेरफार करून ‘मतीविना नीती गेली, नीतीविना युती गेली, युतीविना गती गेली’ असे सध्या गोव्याच्या राजकारणाला पाहून म्हणण्याची पाळी गोमंतकीय मतदारांवर आली आहे. येणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्ये जी बेशरम सुंदोपसुंदी चालली आहे, ती पाहिली तर गोव्याचे राजकीय भवितव्य किती अंधःकारमय असेल, त्याची चाहूल मिळते. युतीच्या विषयावरून कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपा - मगो यांच्यात चाललेल्या रस्सीखेचीचा निकाल कधी एकदा लागणार आणि आपल्या मतदारसंघात कोण कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याविषयीची मतदारांची उत्सुकता आता ‘अति झाले नि हसू आले’च्या पातळीवर पोहोचली आहे. एकीकडे विशिष्ट मतदारसंघातील पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षात चाललेली चढाओढ, त्यासाठी दाखवले जाणारे स्वतःचे खरे - खोटे बळ, उमेदवारी दिली नाही तर बंडखोरी करण्याचे दिले जाणारे सूचक इशारे आणि दुसरीकडे आपल्याला हवे असलेले मतदारसंघ पदरात पाडून घेण्यासाठी लावलेली शर्थीची बोली या सार्या गढूळ वातावरणात आगामी निवडणुकीत मतदारांपुढे काय वाढून ठेवले आहे ते पुरेपूर कळून चुकते.
कॉंग्रेस - राष्ट्रवादी युतीवर शिक्कामोर्तब
राष्ट्रवादीला सात जागा सोडणार
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या युतीवर दिल्लीतील बैठकीत शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला सात जागा सोडण्याचे ठरविण्यात आले असल्याचे समजते. दिल्लीच्या बैठकीत कॉंग्रेस - राष्ट्रवादी यांच्यात युतीसंबंधी ठरले असले तरी यासंबंधी अंतिम अधिकृत निर्णय आज किंवा उद्या जाहीर होणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
सांगे, सावर्डे, थिवी, वास्को, म्हापसा, पर्वरी, साळगाव हे मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिले जाणार असल्याचे समजते. कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीसाठी जागावाटपाच्या प्रश्नावर काल रात्री उशीरा दिल्लीत बैठक सुरू झाली होती.
दारूचे गुत्ते व दुकाने रात्री ११ वाजता बंद
जिल्हाधिकार्यांचा आदेश
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांनी आज दि. २५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान बार व मद्याची सर्व दुकाने रात्री ११ वाजता तर ६ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान रात्री १० वाजता बंद करण्याचा आदेश जारी केला आहे.
मद्यप्राशन करून रात्री उशिरापर्यंत गोंधळ घालण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूनेच अबकारी कायद्यातील कलम २९ (अ) खाली वरील आदेश जारी केल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे सरकार आल्यास महिलांना दरमहा १ हजार रु.
पक्ष प्रवक्ते पर्वतकर यांची घोषणा
भाजपचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार असून पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास चलन फुगवट्यामुळे बिकट बनलेल्या महिलांना मदत करण्यासाठी महिलांना दरमहा एक हजार रुपये मदत देण्याची योजना राबविण्याचा पक्षाचा विचार असल्याचे भाजप प्रवक्ते गोविंद पर्वतकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
वरील योजना कशी असावी यासंबंधीचे निकष सरकार आल्यानंतर ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेसच्या कार्यपद्धतीला जनता विटली असून सध्या बदलाचे वारे वाहत असल्याचे ते म्हणाले. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनाही भाजप काळातच राबविण्यात आली होती.
कॉंग्रेसची मगोशी निवडणूकपूर्व युतीची चर्चा
मगोशी निवडणूकपूर्व युती करण्याच्यादृष्टीने कॉंग्रेसची बोलणी सुरू असून लवकरच त्यासंबंधी जाहीर घोषणा केली जाणार असल्याचे समजते. दरम्यान, मगो कॉंग्रेसशीही बोलणी करीत असल्याचे दुर्दैवी असल्याचे भाजपने काल म्हटले होते.
विद्यार्थ्यांना तिकीट सवलत नाकारणारी बस ताब्यात
५० टक्के सवलतीत तिकीट आकारावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणारी पणजी - फोंडा मार्गावरील जीए ०५ टी ६६४४ ही ज्योती नामक बस काल विद्यार्थ्यांनी पणजी बसस्थानकावर अडवून धरल्यानंतर वातावरण तंग बनले.
निलेश काब्राल भाजपमध्ये
गेल्या विधानसभा निवडणुकीत कुडचेडतून श्याम सातार्डेकर यांना निवडून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेले निलेश काब्राल यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. आपण खनिजच नव्हे तर अन्य अनेक व्यवसाय करीत आहोत. खाणीच्या बाबतीत आपल्याला बरेच ज्ञान असून सावर्डे, सांगे या भागातील खनिज साठ्यांची विल्हेवाट लावण्यास सरकारने मान्यता द्यावी, अशी आपली मागणी असल्याचे काब्राल यांनी पत्रकारांना सांगितले.
व्याज दरात बदल नाही
मंगळवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी या तिमाहीसाठीचे पतधोरण जाहीर केले. यात रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेले नाही. या दरात कोणतेही बदल न झाल्यामुळे होमलोन, कारलोन आदींवरील व्याजदर सध्या तरी ’जैसे थे’च राहतील.
सलमान रश्दी यांचा व्हिडियो संदेश अखेर रद्द
मुस्लिम संघटनांनी विरोध तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर सलमान रश्दी यांचा व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेला कार्यक्रम जयपूर लिटररी फेस्टिव्हलमध्ये रद्द करण्यात आला.
डॉ. विली हळदोण्यातून निवडणूक लढवणार
तृणमूल कॉंग्रेसच्या तिकीटावरून आपण हळदोणे मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केले.
१८५५ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
इशान्य भारतात आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासमोर १८५५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आसाममधील आदिवासी संथाल गटाचे तसेच कुकीस व हमर गटाचे हे नक्षलवादी आहेत.
कायदा आयोग अध्यक्षपदाच्यागैरवापराची खलपांविरुद्ध तक्रार
राज्यात आचारसंहिता लागू झालेली असताना रमाकांत खलप यांनी आपल्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदाचा गौरवापर पक्षीय राजकारणासाठी तथा राजकीय प्रचारासाठी केल्याची तक्रार ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी राज्य निवडणूक अधिकार्यांकडे केली आहे. पक्षाच्या व आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी रमाकांत खलप यांनी आपल्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदाचा उघडपणे गैरवापर केल्याचा आरोप ऍड. रॉड्रिग्ज यांनी सादर केलेल्या तक्रारीत केला आहे.
राजकारणातील नीतिमत्ता म्हणजे नेमके काय?
- दिलीप बोरकर
सध्याच्या राजकारणाचे बाजारीकरण झाले आहे. राजकीय नेत्यांना सत्तेची चटक लागलेली आहे. राजकीय पातळीवर चारित्र्य, शिक्षण, निष्ठा, लोकसेवेची आवड या गोष्टींना थारा राहिलेला नाही. थोडक्यात, आजच्या राजकारणाला कोणत्याच प्रकारची नीतिमत्ता राहिलेली नाही अशी ओरड आज समाजमुखातून सातत्याने होत असल्याचे दिसते, तरीसुद्धा प्रत्येक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर लोकांना नको असलेलेच उमेदवार निवडून आलेले दिसून येतात. तेव्हा या उमेदवारांना निवडून येण्यासाठी कोण मते देत असतो हाच प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. एखाद्याने चांगले कार्य केले तर, स्वर्गातून देव पुष्पवृष्टी करायचे असे पुराणात वाचायला मिळते,तसेच आज या नको असलेल्या राजकारण्यांना निवडून येण्यासाठी दैत्य नरकातून ‘मतवृष्टी’ तर करीत नसतील ना?
हेच का विचारस्वातंत्र्य?
काट्याचा नायटा व्हावा तसे सलमान रश्दींच्या भारतभेटीचे प्रकरण कुठल्या कुठे चिघळत गेले. ज्या जयपूर साहित्य उत्सवात रश्दी सहभागी होणार होते, तो महोत्सव या सार्या वादविवादात नाहक भरडला गेला आहे. रश्दींच्या भारतभेटीचे जे काही राजकारण झाले, तेच या सार्या प्रकाराला जबाबदार आहे. आपण भारतात आल्यास आपल्या जिवाला धोका संभवतो असे सरकारने भासवले, त्यामुुळे आपण भारतभेट टाळली असे रश्दींचे म्हणणे आहे. त्यावर खरे तर आपली भूमिका स्पष्ट करीत सरकारने त्यांच्या संरक्षणाची ग्वाही देणे अपेक्षित होते, परंतु उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रश्दींच्या भारतभेटीचे राजकारण करण्याचा प्रयत्न सत्ताधार्यांनी चालवला आहे हे स्पष्ट दिसून येते. ज्या तर्हेने रश्दींना भारतात येण्यापासून परावृत्त केले गेले आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरही निर्बंध घालण्याचा प्रयत्न झाला, ते पाहाता सरकारची या विषयात केवळ राजकीय कारणांसाठी कर्मठ शक्तींपुढे लोटांगण घालण्याची वृत्ती स्पष्ट दिसून येते. जे यापूर्वी शाहबानो प्रकरणात घडले, जे अयोध्या प्रकरणात घडले, त्याचीच ही पुनरावृत्ती आहे. रश्दींच्या ‘सॅटनिक व्हर्सेस’ वर राजीव गांधींच्या काळात १९८८ साली बंदी घातली गेली.
योगमार्ग - राजयोग (सत्य - ३८)
डॉ. सीताकांत घाणेकर
अनेकवेळा आपण सहज म्हणतो- ‘‘व्यक्ती तितक्या प्रकृती’’. पण कुणीही सहसा या म्हणींवर विचार करत नाही. पण सखोल चिंतनानंतर यातील सत्य लक्षात येते. जगातील सर्वत्र घडणार्या घटनांकडे नजर टाकली तर कळते की ही म्हण खरीच आहे. कुठल्याही एका विषयावर एकमत होणे फारच कठीण. कधी कधी अशा घटना एकदम सामान्य असतात तर इतर वेळा फार गंभीरसुद्धा असतात. कित्येकवेळा अशा वागण्याचा परिणाम भयंकर होतो.
‘अबोल आमंत्रण’ अनयचं...
- प्रा. रमेश सप्रे
‘दे कम बाय् अपॉइंटमेंट’ नावाचं एक पुस्तक आहे. डॉ. जॉर्ज साव्हा या लेखकाचं. इंग्लंडमधल्या या प्रसिद्ध शल्यविशारदाचं (सर्जनचं). त्याच्याकडे पेशंटना अपॉइंटमेंट मिळणं हे एक कठीण काम असायचं. असेही काही रुग्ण यायचे, केव्हाही-कुठेही भेटायचे, पण त्यांना पाहून त्यांच्यावर त्वरित शस्त्रक्रियाही करावी लागे. अशा ‘डिव्हाइन अपॉइंटमेंट’नं जीवनात भेटलेल्या रुग्णांच्या मांचकारी कहाण्या या पुस्तकात आहेत. अनय आमच्या जीवनात असाच आला. अगदी अनपेक्षितपणे. पण काही काळ त्यानं काही शिक्षकांचं जीवन व्यापून टाकलं. खूप काही शिकवलं. अन् जीवनाची पौर्णिमा होण्यापूर्वीच...
उमेदवार निवडीसाठी आज कॉंग्रेसची दिल्लीत बैठक
राजकारणात असलेल्या अनेक कुटुंबांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळावी म्हणून कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्यास सुरुवात केल्याने कॉंग्रेससमोर गंभीर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आज दिल्लीत होणार्या उमेदवारी अर्ज छाननी समितीच्या बैठकीत उमेदवारांची निवड कशा पद्धतीने होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आजच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर, मुख्यमंत्री दिगंबर कामत दिल्लीला दाखल झाले आहेत. उपसभापती माविन गुदिन्होही दिल्लीत गेले होते. परंतु ते काल संध्याकाळी गोव्यात परतले.
नार्वेकरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश
क्रीडा साहित्य वाटल्याच्या प्रकरणी हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांच्या विरुद्धच्या तक्रारीची दखल घेऊन बार्देशच्या उपजिल्हाधिकार्यांना नार्वेकर यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यास सांगितल्याचे संयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त नारायण नावती यांनी काल पत्रकारांना सांगितले. या प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्तांचा सल्ला घेणार असल्याचे ते म्हणाले.
वरील साहित्यासाठी आलेल्या खर्चाचा निवडणूक खर्चात समावेश केला जाईल. उमेदवाराने खर्चाचा अहवाल सादर केल्यानंतर आयोगाने निश्चित केलेल्या खर्चाची मर्यादा ओलांडल्याचे दिसून आल्यास पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. खर्चाची मर्यादा आठ लाख रुपये आहे.
स्वा. सै. जयसिंगराव राणे यांचे निधन
गोवा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व सत्तरीतील माजी आमदार जयसिंगराव व्यंकटराव राणे (८७) धावे तार सत्तरी यांचे काल सायंकाळी ४.३० वाजता गोमेकॉत दीर्घ आजाराने निधन झाले.
गोवा लिबरेशन आर्मी या भूमीगत लढ्यासाठी स्थापन झालेल्या सहा संस्थापकापैकी ते एक होते. गोवा स्वातंत्र्य लढ्याचे ज्येष्ठ नेते पीटर आल्वारिश यांच्या संपर्कात असताना ते प्रजासमाजवादी पक्षाचे सभासद झाले. गोवा स्वतंत्र्य होताच त्यांनी कुमेरी शेतकर्यांना संघटित करून त्यांनी सामाजिक व राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. १९६३ साली ते विधानसभा निवडणुकीत प्रजासमाजवादी पक्षातर्फे निवडून आले. त्यानंतर त्यांनी जनता पक्ष, जनता दल व जनता दल (सेक्युलर) असा प्रवास केला.
ताळगाव येथे ३ लाखांचा गुटखा जप्त
काल दुपारी अन्न आणि औषध प्रशासनाने शंकरवाडी ताळगाव येथे एम एच ०९ व्हीसी ९१४९ क्रमांकाच्या ट्रकवर छापा टाकून सुमारे ३ लाख रुपये किंमतीचा कोल्हापुरी गुटखा जप्त केला.
उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी नाही : खलप
पक्षासाठी काम न केलेल्यांना उमेदवारी मिळू नये, असे आपले स्पष्ट मत आहे. येत्या निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक म्हणून आपण अर्ज केलेला आहे, परंतु उमेदवारीवर आपण दावा केलेला नाही व ती न मिळाल्यास अपक्ष किंवा अन्य कोणत्याही पक्षाच्या तिकीटावर आपण निवडणूक लढविणार नसल्याचे माजी केंद्रीय कायदामंत्री तथा कॉंग्रेस प्रवक्ते ऍड. रमाकांत खलप यांनी सांगितले.
विमानाचा टायर फुटल्याने हवाई वाहतूक खोळंबली
येथील दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर टायर फुटून सी-हॅरीयर विमान अडकल्याने सुमारे एक तास हवाई वाहतूक सेवा ठप्प झाली. उपलब्ध माहितीनुसार संध्याकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
पर्वरी मतदारसंघ अन्य पक्षास दिल्यास असहकार
नार्वेकर यांचा इशारा
पर्वरी मतदारसंघातून मतदारसंघाबाहेरील उमेदवारास कॉंग्रेसने तिकीट दिली किंवा युतीच्या नावाखाली हा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यात आला तर पर्वरी गट कॉंग्रेसचे कार्यकर्ते येत्या निवडणुकीत कॉंग्रेसशी असहकार पुकारतील, असे आमदार दयानंद नार्वेकर यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मुंबईतील गतवर्षीच्या तीन स्फोटांच्या कटाचा उलगडा
बिहारमधून दोघांना अटक
गेल्या वर्षी १३ जुलै रोजी मुंबईत झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटप्रकरणाच्या कटाचा उलगडा केल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने केला असून स्फोट घडवून आणणार्या दोघांना बिहारमधून अटक करण्यात आली आहे. मुंबईतील झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर येथे हे स्फोट झाले होते व त्यात २७ ठार तर १२५ जखमी झाले होते. नकी अहमद वासी अहमद शेख (२२) आणि नदीम अख्तर अश्फाक शेख (२३) अशी आरोपींची नावे आहेत व त्यांना १२ जानेवारीस अटक झाली अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी राकेश मारिया यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. मुंबईतील या स्फोट मालिकेचा सूत्रधार यासिन भटकळ हा असून तो फरारी असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधींवर बूट फेकला
कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्यावर येथील प्रचारसभेत बोलताना एकाने बूट फेकून मारला. तो राहुल गांधींपासून दहा मिटर अंतरावर येऊन पडला. या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी टीम अण्णाच्या सदस्यांना अशाच एका प्रसंगास सामोरे जावे लागले होते.
कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतजमीन विक्रीवर बंदीची ग्वाही
तीन मार्च रोजी होणार्या गोवा विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात बिगर गोमंतकीयांना व बिगरशेतकर्यांना येथील शेतजमिनी खरेदी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचे आश्वासन देणार असल्याचे कॉंग्रेस प्रवक्ते ऍड. रमाकांत खलप यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
कोसंबी विचार महोत्सवात यंदा मेधा पाटकर, महंमद युनूस
बुद्धीला वैचारिक खाद्य देणारा गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनालयाचा ५ वा डी. डी. कोसंबी वैचारिक महोत्सव येत्या ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान कांपाल, पणजी येथील कला अकादमीच्या मा. दिनानाथ मंगेशकर सभागृहात होणार आहे. या व्याख्यान महोत्सवात जागतिक कीर्तीच्या नामांकित मान्यवरांना ऐकण्याची संधी गोमंतकीयांना मिळणार आहे.
रश्दींच्या व्हिडिओ संदेशास आक्षेप
जयपूर लिटररी फेस्टिव्हल
त्या लेखकांविरुद्ध आणखी तक्रारी
जयपूर लिटररी फेस्टिव्हलमध्ये सलमान रश्दी यांच्या प्रतिबंधित ‘सॅटेनिक व्हर्सेस’ पुस्तकाचे वाचन केलेल्या चार लेखकांविरुद्ध काल आणखी पाच तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महोत्सवस्थळी आज आयोजकांनी ठेवलेल्या रश्दी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सींग संवादास राजस्थान सरकारने आक्षेप घेतला असून पूर्वपरवानगीशिवाय हा संवाद आयोजित करू नये, असे स्पष्ट केले आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून भारताची लूट
- शेख इब्राहिम मुसा , म्हापसा
बर्याच वर्तमानपत्रांद्वारे, परदेशी कंपन्यांना भारतातील किरकोळ विक्री बाजारपेठेत कोणत्याही परिस्थितीत येऊ देऊ नये, जर या कंपन्या भारतात आल्या तर लहान व्यावसायिकांना त्या कंपन्या संपवतील अशी भूमिका मांडली जात आहे. बाहेरून कमी किमतीत माल आणून तो स्वस्त दरात विकून या कंपन्या भारतातील सर्वच उत्पादनांना कमी करत हळूहळू नष्ट करतील. शेतकर्यांना तर खतापासून इतर सर्वच वस्तूंसाठी परदेशी कंपन्यांकडे हात पसरावे लागतील. या कंपन्या आपली दुकाने उघडून येथील लोकांना आपली गिर्हाइके बनवतील आणि लहान सहान दुकानवाले आपल्या नियमित ग्राहकांना मुकतील, अशा प्रकारे या कंपन्यांविरोधात जोरदार मतप्रवाह सुरू आहेत.
उपेक्षित वारसा
आपली आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दलची उदासीनता त्याला उपेक्षेच्या खाईत लोटत असते. त्याच्या जतनासाठी आपण काही तरी करावे, निदान आवाज उठवावा एवढे सामाजिक कर्तव्य पार पाडण्यातही आम जनता कसूर करते, त्यातून कालांतराने हा वारसा मातीमोल होऊन जातो. आपल्या भरजरी भाषावैभवामुळे आजही जुन्या पिढीच्या गळ्यातील ताईत असलेले नाटककार राम गणेश गडकरी यांच्या सावनेर येथील घराची कशी वाताहत झाली आहे, त्यावर मुंबईच्या एका दैनिकाने नुकताच प्रकाश टाकला आहे. ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘पुण्यप्रभाव’, ‘प्रेमसंन्यास’ अशा अजरामर नाटकांद्वारे ज्यांनी मराठी रंगभूमी आणि साहित्य समृद्ध केले, त्या गडकर्यांच्या घराची भग्नावस्था आपल्या सांस्कृतिक वारशाच्या कल्पना किती बेगडी असतात त्याचेच दर्शन घडवते आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिणेतील ‘हिंदू’ दैनिकाने बेळगावजवळच्या सुळेभावी या गावी असलेल्या महान शास्त्रीय गायक कुमार गंधर्व यांच्या मूळ घरात उपाहारगृह चालवले जात असल्याचे वृत्त दिले होते. आपल्या बाकीबाबांच्या घरातही हाच प्रकार चालला होता हे वेगळे सांगायला नको.
पक्षासाठी सक्रियपणे प्रचार करणार : श्रीपाद
विधानसभा निवडणूक लढवण्यास पक्षाने परवानगी न दिल्याने आपण निरूत्साही झालेलो नसून पक्षासाठी सक्रियपणे राज्यात प्रचार करणार असल्याचे उत्तर गोव्याचे खासदार व ज्येष्ठ भाजप नेते श्रीपाद नाईक यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
स्थानिक राजकारणात येण्यास आपण उत्सुक होतो व पर्वरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा होती हे खरे असले तरी त्या गोष्टीकडे आता आपण एक भुतकाळ म्हणून पाहणार असून नव्या जोमाने पक्षाच्या प्रचार कार्यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कॅसिनोंतील उलाढालीवर सरकारची नजर
राज्याच्या महसुलात भर घालण्यासाठी म्हणून गोवा सरकारने मांडवी नदीत तरंगते कॅसिनो उभे केले असले, तरी अशा प्रकारच्या कॅसिनोंमधून गुन्हेगारी जगताशी आणि दहशतवाद्यांशी संबंधित पैशाची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते असे एका सरकारी अहवालातच नमूद करण्यात आले आहे.
गेल्या आर्थिक वर्षात कॅसिनोंमध्ये सात हजारांहून अधिक संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक गुप्तचर विभागाची कॅसिनोंमधील या मोठ्या उलाढालीवर बारीक नजर असून स्लॉट मशीन आणि इलेक्ट्रॉनिक गेम्सच्या आड काळा पैसा पांढरा कसा केला जातो त्याचा अभ्यासही केला जात आहे.
नार्वेकर व मुख्यमंत्र्यांविरुध्दच्या तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे
मतदारांना क्रीडा साहित्याचे वितरण करून निवडणूक आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी आमदार दयानंद नार्वेकर यांच्याविरुध्द जी राज्य निवडणूक आयोग कार्यालयात तक्रार करण्यात आली होती त्या तक्रारीचा पूर्ण अहवाल तयार करून तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आल्याचे गोव्याचे सहाय्यक मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
दरम्यान, वरील तक्रारीबरोबरच आयरीश रॉड्रीग्ज यांनी २६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी झेंडावंदन करण्याचे जे ठरवले आहे ते त्यांना करू दिल्यास तो निवडणूक आचारसंहितेचा भंग ठरणार असल्याची जी तक्रार केलेली आहे. ती तक्रारही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली असल्याचे नावती यांनी स्पष्ट केले.
पेडा सुरावली येथे वृध्दाचा खून
पेड सुरावली येथे कोस्तासियु मिनीनो डिसिल्वा (७२) या वृध्दाचा खून करून खुनी फरारी झाला. कोलवा पोलिसानी खुनाच्या गुन्ह्याची नोंद करून मृतदेह हॉस्पिसियु हॉस्पिटलातील शवागारांत शवचिकित्सेसाठी ठेवला आहे.
अबकारी खात्याचे छापे चालूच
राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात मद्याचा महापूर वाहणे चालूच असून अबकारी खात्याने परवा शनिवार दि. २१ रोजी विविध ठिकाणी मारलेल्या छाप्यात ६१६१३ रु. एवढ्या किमतीचे मद्य जप्त केले.
सरकारकडून जनतेचा विश्वासघात : अण्णा
केंद्र सरकार लोकपाल विधेयकावर जनतेच्या मागण्यांकडे कानाडोळा करीत असून देशाच्या जनतेचा व संसदेचा विश्वासघात केला आहे, अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केली आहे. ‘‘सरकारने आमचा विश्वासघात केला. संसदेत सादर झालेल्या लोकपाल विधेयकात नागरी सनद नाही. कनिष्ठ नोकरशाहीही त्यांच्या कार्यक्षेत्राखाली आणली गेलेली नाही’’ असे अण्णांनी पत्रात लिहिले आहे.
भारतापासून दूर ठेवण्याचा कट
सलमान रश्दींचा आरोप
जयपूर लिटररी फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्यास ठार केले जाईल असा फोन मुंबईतील एका अंडरवर्ल्ड डॉनकडून आल्याचे सांगून आपल्याला भारतापासून दूर ठेवण्याचा कट राजस्थान पोलिसांनी रचल्याचा आरोप काल सलमान रश्दी यांनी केला. याबाबत आपण राजस्थान पोलिसांवर नाराज असल्याचेही त्यांनी ‘ट्विटर’वर नमूद केले आहे.
वाहन जप्तीस गेलेल्या पो. उपनिरीक्षकावर हल्ला
दोन वर्षापूर्वी मुंबईच्या अमर मेढेकर याचे अपहरण करून, ज्या इनोवा गाडीने गोव्यात आणले होते ती गाडी अपहरणकर्ता कोन्सी फर्नांडीस याच्याकडून ताब्यात घ्यायला मायणा कुडतरी येथे गेले असता कोन्सी याने मायणा कुडतरी पोलीस उपनिरीक्षक सुरज सावंत यांच्यावर हल्ला केला. त्यात मुठ तोंडावर बसून ते जखमी झाला. त्यानंतर झालेल्या झटापटीत कॉन्सी जखमी झाला आहे.
विजय पै खोत भाजप यात्रेत अनुपस्थित
काणकोणचे आमदार विजय पै खोत हे भाजपाच्या जनसंपर्क यात्रेत अनुपस्थित होते. ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सध्या चालू आहे. एक दोन दिवसांत कॉंग्रेसवासी होणार असल्याचेही बोलले जात आहे.
म्हापशात आत्महत्या
ख्रिस्तोफर फ्रान्सिस झेवियर (५६) वर्षीय आंगड-म्हापसा येथील इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
मयताची पत्नी व मुलगी सायंकाळच्या वेळी घराबाहेर गेल्यावेळी ख्रिस्तोफर यांनी आपल्या बेडरूममधील फॅनला बेडशीटचा फास लावून आत्महत्या केली. सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पत्नी व मुलगी घरात आल्या असता आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.
पत्नीसह चार जणांना जीवंत गाडणार्यास अटक
आपली पत्नी तसेच घरमालकासह चार जणांना जीवंत गाडणार्या ३५ वर्षीय व्यक्तीस छत्तिसगढ पोलिसांनी काल अटक केली.
कॉंग्रेसची पहिली यादी २५ नंतरच जाहीर : सुभाष
कॉंग्रेस उमेदवारांच्या नावांची पहिली यादी २५ जानेवारीनंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
कॉंग्रेसच्या छाननी समितीची बैठक परवा मंगळवार दि. २४ रोजी नवी दिल्ली येथे होणार असून नंतर २५ रोजी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असल्याचे शिरोडकर यांनी स्पष्ट केले. या दोन्ही बैठकांनंतर उमेदवारांची नावे निश्चित होणार असून ती २५ रोजीनंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
मगो भाजप युतीबाबत बोलणी अंतिम टप्प्यात
सुदिन ढवळीकर यांचे प्रतिपादन
कॉंग्रेस पक्षाबरोबर युतीसाठीची आमची कोणतीही बोलणी चालू नसल्याचे स्पष्ट संकेत देताना काल वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर व आमदार दीपक ढवळीकर यांनी सध्या पक्षाची युतीसाठी भाजपबरोबर बोलणी चालू असून ती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली.
मगो पक्षाने आपले १२ मतदारसंघ निश्चित केलेले असून त्या मतदारसंघांतून निवडणूक लढवण्यास पक्ष इच्छुक असल्याचे ते म्हणाले. मये, पाळी, सावर्डे, पेडणे, पर्वरी, फोंडा, मडकई, प्रियोळ, केपे, सांताक्रुज, दाबोळी व थिवी हे मतदारसंघ असल्याचे ते म्हणाले. मात्र, असे असले तरी प्रत्यक्षात मगो पक्षाने १६ मतदारसंघांत यापूर्वीच आपला प्रचार सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले.
विनापरवाना नेली जाणारी साडेतीन लाखांची दारू जप्त
पोलिसांच्या कारवाईनंतर अबकारी परवाना
विधानसभा निवडणूक आचारसंहितेचा भंग करून दोन पिकअप भरून नेलेली बिअर व व्हिस्की मायणा कुडतरी पोलिसांनी मुगाळी नेसल येथे पकडली. दारू ३.५० लाख रुपयांची असून तीन तासानंतर मडगाव अबकारी कचेरीतून परवाना तयार करून आणला होता असे पोलिसांनी सांगितले.
काल सकाळी विनापरवाना दारू भरून दोन पिकअप नेत असल्याची तक्रार येताच मायणा कुडतरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक नेल्सन आल्बुकर्क, उपनिरीक्षक परेश नाईक, उपनिरीक्षक सावंत व पोलीस पथकाने जीए ०१ डी ५९२४ व जीए ०१ टी ६३०४ क्रमांकाच्या पिकअप मुगाळी येथे जप्त केला. पोलिसांनी १० वाजून १० मिनिटांनी दारू जप्त करून परवाना मागितला असता, तो त्यांच्याकडे नव्हता ही दारू रियल एजन्सीची असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यात ५३५ पेट्या किंगफिशर बिअर, २६ पेट्या रियल व्हिस्की व २६ पेक्षा रियर सेव्हन सर्च व्हिस्कीच्या पेट्या होत्या.
श्रीपाद नाईकना उमेदवारीस केंद्रीय नेत्यांचा नकार
पर्वरी मतदारसंघातून भाजप पक्षातर्फे उमेदवारीसाठी इच्छुक असलेले उत्तर गोव्याचे भाजपचे खासदार श्रीपाद नाईक यांना केंद्रीय नेत्यांनी उमेदवारीस नकार दिला आहे. खासदार नाईक यांना पर्वरीतून उमेदवारी देण्यास एका स्थानिक गटाने विरोध दर्शवला होता. गेले कित्येक दिवस पर्वरीतून भाजपसाठी श्रीपाद नाईक यांचे नाव चर्चेत होते.
मराठी नाटके सेन्सॉरशीपच्या कात्रीत का?
९२ व्या अ. भा. मराठी नाट्यसंमेलनात अमोल पालेकर यांचा सवाल
बालगंधर्वनगरी, सांगली (अजय बुवा यांजकडून)
भारतात एवढ्या कला असताना केवळ नाटक या माध्यमाला सेन्सॉरशीपच्या कात्रीत पकडून त्याची गळचेपी केली जात असून देशातील इतर कोणत्याही भाषेतील नाटकांस अशा सेन्सॉरशीपची भीती नसताना केवळ मराठी नाटकांबाबतच हा दुजाभाव का, असा सवाल ज्येष्ठ रंगकर्मी अमोल पालेकर यांनी काल सांगलीत ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात केला. सेन्सॉरशीपसारखी बंधने आपण स्वीकारणे हे आपल्या कचखाऊ वृत्तीचे दर्शन घडवीत असून सर्व नाट्यकलावंतांनी अशा प्रकारच्या गळचेपीविरुद्ध एकजुटीने लढा देऊन सेन्सॉरशीपचा नियम रद्द करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रवीण झांट्ये यांना उमेदवारी न दिल्यास बंड करू
मये गट कॉंग्रेस पदाधिकार्यांचा इशारा
मये मतदारसंघात कॉंग्रेसचे कार्य गेली साडेचार वर्षे निष्ठेने करताना युवा नेते प्रवीण हरिष झांट्ये यांनी संघटना मजबूत करताना भक्कम स्थान निर्माण केले आहे, असे असताना कॉंग्रेसची उमेदवारी हा प्रवीण झांट्ये यांचाच हक्क असून पक्षश्रेष्ठीवर आमचा पूर्ण विश्वास असून झांट्येनाच उमेदवारी मिळायला हवी मात्र यदाकदाचित पक्षश्रेष्ठींनी दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास गट समिती, सेवा दल समिती, महिला समिती बंडाचा पवित्रा घेणार असल्याची घोषणा मये कॉंग्रेस समितीच्या पदाधिकार्यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
गोव्याच्या चित्ररथावर यंदा ‘किंग मोमो’
येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने दिल्लीत होणार्या संचलनात सहभागी होण्यासाठी गोव्याचा चित्ररथ दिल्लीत तयार होत असून त्यावर यंदा ‘किंग मोमो’ची प्रतिमा असणार आहे. ‘गोवा ः अ स्पेक्टॅकल ऑफ जॉय’ ही संकल्पना असलेला यंदाचा हा चित्ररथ गोमंतकीय जनतेचे उत्सवी रूप दाखविणार आहे. कला, संस्कृती, चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य आदी क्षेत्रांतील ६० कलाकारांनी गेला महिनाभर या चित्ररथाची तयारी चालवली असून पालम विमानतळाजवळच्या कँटोनमेंट विभागात त्याची निर्मिती केली जात आहे.
विठू मोरजकर यांना उमेदवारी डावलल्यास भाजपात बंडखोरी
पेडण्यात पत्रकार परिषदेत इशारा
पेडणे मतदारसंघाची भाजपची उमेदवारी विठू मोरजकर यांना डावलल्यास त्याचे पक्षाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा पेडणे संघातील काही कार्यकर्त्यांनी पेडणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिला.
मतदारांचा हात, कोणाला देईल साथ...?
- रमेश सावईकर
राज्य विधानसभेची निवडणूक जवळ येत असल्याने राजकीय वातावरणात आणखी नवनवीन रंग भरू लागले आहेत. सत्ताधारी कॉंग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदाचे किमान पाच दावेदार असल्याने निवडणुकीनंतर आपल्याला पाठिंबा देणारे आमदार निवडून आणण्यासाठी हे दावेदार शर्थीचे प्रयत्न करतील. सत्ताधारी कॉंग्रेस पक्षांतर्गत वाढणारी संदोपसुंदी ही आपली जमेची बाजू ठरेल, अशा गोड समजूतीत विरोधी भारतीय जनता पक्षाचे नेते वावरत आहेत.
गोव्यात गुंजारली गझल...
- अजय बुवा
शनिवार १४ जानेवारी व रविवार १५ जानेवारी हे दोन्ही दिवस रसिक गोवेकरांसाठी मंतरलेले व भारलेले होते. कलारसिक ‘गोंयकार’ दोन्ही दिवस शब्दालंकारांच्या झुल्यावर तन्मयतेने डोलला. एका बाजूला निरंतर येणार्या मांडवीच्या लाटा आणि दुसर्या बाजूला शेर-शायरीच्या आस्वादक लाटा.... एका बाजूला मदमस्त डोलणारी नारळाची झाडे तर दुसर्या बाजूला गझलीच्या प्रत्येक शब्दांना दाद देण्याकरिता डोलणार्या माना... सगळेच कसे विहंगम अन् मंत्रमुग्ध करणारे.... कारण होते सहावे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन!
गोव्याच्या मातीत गझलेची पदचिन्हे...
- राजय पवार
गझल आणि कोंकणी यांचा संबंध तसा खूप जुना नाही. तरीही कोंकणी भाषेच्या ‘नवायती’ बोलीत या काव्यप्रकाराच्या पहिल्यावहिल्या पावलाचा ठसा नजरेस पडतो. या बोलीतील ‘जिव्रा बजाय’ (१८३५) (म्हणजे प्रवचनांची वही) या भक्तिकाव्य संग्रहात ही कोंकणी आणि पर्शियन शब्दांनी नटलेली गझल वाचायला मिळते. या रचनेस कोंकणीच्या बोलीतील पहिली गझल म्हणता येईल. सदर गझलेत एक बाब लक्षात घेण्याजोगी वाटते, ती म्हणजे, या गझलेतील प्रत्येक मिसर्यात गझलकाराने अर्धा मिसरा कोंकणी आणि अर्धा पर्शियन भाषेतून लिहिला आहे. जाणीवपूर्वक केलेला हा प्रयोग लक्षात घेण्याजोगा आहे.
गळचेपी
गोव्याच्या राजकारणाचे बदलते रंग गेली अनेक वर्षे जवळून पाहात आलेल्या श्रीपाद नाईकांना त्यासरशी स्वतःचे रंग बदलणे मात्र कधी जमले नाही. एक सभ्य, सज्जन असे हे व्यक्तिमत्त्व वेळोवेळी पक्षनेतृत्वाच्या आज्ञा निमूटपणे पाळत आले. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा पक्ष मोठा या विचारसरणीवर ठाम विश्वास असलेल्या श्रीपादभाऊंनी व्यक्तिगत लाभांच्या संधींना प्राधान्य न देता आपल्या महत्त्वाकांक्षेला वेळोवेळी मुरड घातली आणि त्याविषयी नाराजीचा चकार शब्दही कधी काढला नाही. परंतु त्यांच्या या अशा स्वभावामुळे त्यांना पक्षनेतृत्वाने दर वेळी गृहित धरणे योग्य नव्हे हे भाजपाच्या केंद्रीय नेत्यांना आता तरी कळायला हवे. वास्तविक गेले काही महिने श्रीपाद यांनी स्थानिक राजकारणात सक्रिय व्हावे आणि दुखावलेल्या, दूर गेलेल्यांना पुन्हा जवळ आणावे अशी मागणी भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांकडून होत होती. पक्षश्रेष्ठींनीही त्यांना स्थानिक राजकारणात उतरण्यास पूर्वी अनुकूलता दर्शविलेली होती. स्वतः श्रीपाद यांनी काही महिन्यांपूर्वी एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत पक्षश्रेष्ठींनी आपल्याला स्थानिक राजकारणात उतरण्यास हिरवा कंदील दर्शवलेला आहे, असे स्पष्टपणे सांगितले होते.
गोव्यातले पक्षीवैभव
- राजेंद्र पां. केरकर
गोव्याला पक्ष्यांची वैविध्यपूर्ण आणि समृद्ध संपदा लाभलेली आहे. रुबी थ्रोटेड येलो बुलबूल या सुंदर पक्ष्याला राज्य पक्षी होण्याचा सन्मान लाभलेला आहे. उष्णकटिबंध प्रदेशातला स्वर्ग म्हणून ओळख असलेला गोवा पर्यटकांसाठी शेकडो वर्षांपासून जसा आकर्षण ठरलेला आहे, तसाच तो देशविदेशांतील पक्ष्यांसाठीही! शरद - हेमंत ऋतूचे आगमन झाले की विदेशातल्या पक्ष्यांचे गोव्यात आगमन होते. कोकण रेल्वेमार्ग अस्तित्वात येण्यापूर्वी तिसवाडीतील करमळी गावचे तळे बारामाही नानाविविध पक्ष्यांनी गजबजलेले असायचे. आजही देशाच्या वेगवेगळ्या प्रांतांबरोबर विदेशातल्या पाहुण्यांचे इथे आगमन होते.
‘गावपळण!’
- लाडोजी परब
धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरांचा अमूल्य ठेवा गावांनी जपलाय. बर्याचदा रूढी आणि परंपरांमुळे गावांचे महत्त्व कमी झाल्याची टीका होते, पण या रूढी आणि परंपरांच्या पाठीमागे असलेल्या चांगल्या कल्पना, वागणूक, संस्कृती या महत्त्वाच्या बाबी विसरता येत नाहीत. गावाला शांतता लाभावी, सुख - समाधान लाभावे ही गावकर्यांची इच्छा त्यांच्या कृतीतून जेव्हा स्पष्ट होते तेव्हाच त्यांच्या परंपरांना एक वेगळा साज चढतो. अशीच एक धार्मिक परंपरा म्हणजे ‘गावपळण!’ कोकणात या धार्मिक परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामागे असलेल्या काही गोष्टी अचंबित आणि संशोधन करण्यास भाग पाडणार्या आहेत.
३७ वे राज्य कला प्रदर्शन
३७ व्या राज्य कला प्रदर्शनात चित्रकला, उपयोजित कला, शिल्पकला विभागात प्रथम आलेल्या कलाकृती अनुक्रमे - १) टाईम पेन (तानाजी शेट), २) लॉस्ट रॉयल्टी (विंदा कारे), ३) कपल (प्रदीप नाईक) प्रदर्शनाचे उद्घाटन काल २० रोजी कला अकादमीत झाले असून ते दि. २४ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत खुले असेल.
माध्यम प्रश्नावरील सुनावणी पूर्ण
निवाडा मात्र राखला
इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान देण्याच्या सरकारच्या निर्णयास आव्हान देणार्या शिक्षणतज्ज्ञ पांडुरंग नाडकर्णी व अन्य तीन विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अर्जावर काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सुनावणी पूर्ण करून निवाडा राखून ठेवला आहे.
या प्रश्नावर सरकारचे शेवटची लेखी बाजू मांडण्यासाठी न्यायालयाने दोन आठवड्यांची, तर त्यानंतर त्यावर लेखी उत्तर देण्यासाठी अर्जदाराला एका आठवड्याची मुदत दिली आहे. मूळ आव्हान अर्जावरील निवाड्यापूर्वी अवमान याचिकेवरील निवाडा जाहीर केला जाईल.
सत्ताधारी आमदारांकडूनसरकारी यंत्रणेचा गैरवापर
भाजप प्रवक्ते विष्णू वाघ यांचा आरोप
सत्ताधारी पक्षाच्या मतदारसंघात पोलिसी बळाचा व सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचे सांगून या प्रकरणी मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे भाजप प्रवक्ते विष्णू सूर्या वाघ यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
कॉंग्रेसमधील कार्यकर्ते व नेते भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याने कॉंग्रेस नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. भाजपच्या जनसंपर्क अभियानाला जनतेकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. विरोधी नेते मनोहर पर्रीकर परिवर्तनाचा नारा घेऊन जनतेला हाक मारीत आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत उद्योजक दीपक पावसकर, प्रदीप देसाई, भोलो गावकर, रमाकांत गावकर आदी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे.
उच्च सुरक्षा क्रमांकपट्ट्या : सर्वोच्च न्यायालयाची ३१ मार्चपर्यंत मुदत
वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकपट्ट्या लावण्याच्या आपल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता सुप्रीम कोर्टाने काल ३१ मार्चपर्यंत मुदत निर्धारित केली. त्यानंतर अवमान कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशाराही राज्यांना दिला आहे.
सरन्यायाधीश एस. एच. कापाडिया तसेच, ए. के. पटनाईक व न्या. स्वतंत्र कुमार यांच्या खंडपीठाने अनेक राज्यांनी अजून उच्च सुरक्षा क्रमांकपट्ट्यांविषयी प्रतिज्ञापत्र सादर केले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
किनारी भागांत स्मार्ट कार्ड्स देणार
गोव्याचाही समावेश
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून किनारी राज्यांसाठी बनविण्यात आलेल्या स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कार्डांचे वितरण आजपासून सरू होणार आहे. अंदमान येथे आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते वितरणाचा शुभारंभ होईल.
प्रदेश राष्ट्रवादीचे भारती चव्हाण यांच्याशी मतभेद
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोवा प्रभारी भारती चव्हाण व प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांच्यातील मतभेद पराकोटीला पोचले असून सिरसाट यांनी पक्षहित नजरेसमोर ठेऊन चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
आचारसंहितेमुळे अबकारीखात्याचा महसूल घटणार
दि. ३ मार्च रोजी होणार्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अबकारी खात्याला महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे कठीण झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महसूल बुडण्याची शक्यता आहे.
‘वोडाफोन’चे ११ हजार कोटी रु. परत करण्याचा सरकारला आदेश
आयकर खात्याने वोडाफोन कंपनीला एका सौद्याचा २.२ अब्ज डॉलर्स कर भरण्याचे आदेश दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश उचलून धरला होता मात्र सुप्रीम कोर्टाने काल हा आदेश रद्दबातल ठरवला. त्याचबरोबर अंतरिम आदेशान्वये वोडाफोनला भरावे लागलेले २,५०० कोटी रु. आयकर खात्याने व्याजासकट दोन महिन्यांत परत करावेत तसेच बँक हमी म्हणून घेतलेले रु. ८,५०० कंपनीला परत करण्यात यावेत असे सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्तानी पथक फेब्रुवारीत भारतात
२६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ला प्रकरणी पाकिस्तानचे न्यायालयीन पथक फेब्रुवारीत भारत भेटीवर जाणार असल्याची माहिती पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी दिली आहे.
सलमान रश्दीनी भारत भेट टाळली
जयपूर साहित्य महोत्सवात आपण भाग घेणार नसल्याचे ‘बूकर’ विजेते साहित्यिक सलमान रश्दी यांनी काल जाहीर केले. आपल्या लेखनाबद्दल वादग्रस्त असलेले रश्दी यांच्या भारत भेटीस दारुल उलूम देवबंदने आक्षेप घेतला होता.
विहिरीत पडलेल्या जर्मन पर्यटकास जीवदान
विहीरीत पडलेल्या एका जर्मन पर्यटकास म्हापसा अग्नीशामक दलाच्या जवानांनी जीवदान दिले.
उदंड जाहल्या कार्यशाळा
- डॉ. राजीव कामत, खोर्ली - म्हापसा.
सध्या ‘संगीत’ या पवित्र क्षेत्राचे जोरात व्यापारीकरण चालू आहे. एकीकडे बोलताना हे क्षेत्र कसे पवित्र आहे, पैशांच्या पाठीमागे न धावता या क्षेत्रात पुष्कळ दिग्गजांनी कसे योगदान दिले आहे, केवळ पैसा हाच श्रेष्ठ नसून संगीताचा योग्य प्रसार होणे कसे गरजेचे आहे, यासारखी वक्तव्ये सतत ऐकिवात येतात. संगीत शिकवणारे शिक्षक (गुरू) यांचा पण संसार आहे व संसाराचे रहाटगाडगे चालवायचे म्हणजे पैसा हा असायलाच हवा. मी असे मुळीच म्हणत नाही की, संगीताचा प्रसार करताना पैशाचा विचारच व्हायला नको, पण माझे असे म्हणणे आहे की, हे सर्व करताना थोडे तरी तारतम्य बाळगायलाच हवे. सध्या संगीत प्रसाराच्या नावावर जे काही चालले आहे ते पाहिले की मनाला उबग येतो.
बांगलादेशातील बंड
बांगलादेशातील शेख हसीना यांची राजवट उलथवून टाकण्याचे काही आजी - माजी लष्करी अधिकार्यांचे कटकारस्थान उधळले गेले हा केवळ त्या देशासाठीच नव्हे तर भारतासाठीही मोठा दिलासा आहे. बांगलादेशमध्ये स्थिरावलेली शेख हसीनांच्या अवामी लीगची राजवट भारताच्या दृष्टीने मित्रत्वाची ठरली आहे आणि दिवसेंदिवस दोन्ही देशांदरम्यानच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दिशेने भारत आणि बांगलादेश सरकार पावले टाकत आले आहे. अशा सौहार्दपूर्ण वाटचालीत मिठाचा खडा टाकणारा हा सत्तांतराचा कट उधळला गेला हे ठीकच झाले. बांगलादेशला लष्करी कटकारस्थाने काही नवी नाहीत. त्याच्या स्थापनेपासून आजतागायत सातत्याने अशी बंडाळी होत आली आहे. खुद्द शेख हसीना यांनी त्याची दाहकता अत्यंत जवळून अनुभवली आहे. त्यांचे पिता आणि बांगलादेशचे थोर नेते शेख मुजिबूर रेहमान यांची अशाच एका लष्करी कटकारस्थानाअंती कुटुंबातील सदस्यांसह निर्घृण हत्या करण्यात आली, तेव्हा त्यांच्या कन्या शेख हसीना आणि शेख रेहाना या जर्मनीत असल्यानेच वाचू शकल्या होत्या. २००८ मधील सार्वत्रिक निवडणुकीअंती शेख हसीनांच्या हाती देशाची सत्तासूत्रे आली, तरीही त्यांच्याविरुद्ध बंडाचे प्रयत्न झाले.
‘त्या’ १०५ शाळांवरमार्च अखेरपर्यंत कारवाई
सरकारचे न्यायालयास आश्वासन
शैक्षणिक माध्यम प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्या राज्यातील १०५ शाळांवर नोटिसा बजावल्या असून ३१ मार्च २०१२ पर्यंत या प्रकरणीची कारवाई पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी काल मुंबई राज्य न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला सरकारच्यावतीने दिली.
शिक्षण संचालक अनिल पवार काल स्वतः न्यायालयात हजर राहिले.
न्यायालयाच्या अवमान प्रकरणी शिक्षण संचालकांवर कारवाई करावी व त्यासाठी त्यांच्या विरुद्ध खटला चालवावा, अशी मागणी अर्जदारांचे वकील ऍड. आत्माराम नाडकर्णी यांनी केली. संबंधितांवर कारवाई न झाल्यास न्यायसंस्थेच्या बाबतीत चुकीचा संदेश जाईल, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
बंडखोरीच्या भीतीने पक्षांच्या उमेदवारी याद्या लांबणीवर
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षात बंडखोरी होईल या भीतीपोटी कॉंग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर करणे लांबणीवर टाकले असून केंद्रीय उमेदवार छाननी समितीची बैठक आता दि. २३ नंतर घेण्याचे ठरविले आहे, अशी माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली.
सांताक्रुज, फातोर्डा, काणकोण, मये या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यावी हा कॉंग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे.
मगो-भाजप युती होणार हे वृत्त दिल्लीत पोचल्याने ती होऊ नये म्हणून सध्या जोरदार प्रयत्न चालू आहेत. वरील पक्षांची युती झाल्यास राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रश्नावर कॉंग्रेसच्या काही बलाढ्य नेत्यांनी भाजपमध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणता उमेदवार कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणार हे कळणे कठीण झाले आहे.
राष्ट्रवादीला पाच जागा देण्यास कॉंग्रेस तयार
राष्ट्रवादीपुढे उमेदवारीचा पेच
कॉंग्रेस राष्ट्रवादी युतीसाठी कॉंग्रेसने राष्ट्रवादीला सध्या पाच जागा देण्याचे निश्चित केले असले तरी म्हापसा व पर्वरीसाठी राष्ट्रवादीजवळ योग्य उमेदवार नसल्याने उमेदवारी कुणाला द्यावी हा पक्षासमोर पेच निर्माण झाला आहे.
सांगे व कुठ्ठाळी मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची तयारी आहे. परंतु सांगे मतदारसंघाची उमेदवारी युरी आलेमाव यांना देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री तथा राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांचे आलेमांव कुटुंबाशी चांगले संबंध असल्याने युरींना तिकीट नाकारणे कठीण असल्याचे कळते.
सुरेश कलमाडी यांना जामीन
राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळ्यातील आरोपी व त्या स्पर्धांच्या आयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना काल जामीन मंजूर झाला. पाच लाख रुपयांच्या हमीच्या बदल्यात त्यांना जामीन मिळाला आहे. स्पर्धेच्या आयोजन समितीचे माजी महासंचालक व्ही. के. वर्मा यांनाही न्यायालयाने जामीन दिला. दोघांनाही न्यायालयाच्या पूर्वपरवानगीविना देशाबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
पेडण्यात ५० हजार रु.ची तर केप्यात ५१ हजारांची दारू जप्त
अबकारी खात्याचे ठिकठिकाणी छापे
अबकारी खात्याने काल गोव्यातील विविध भागात छापे मारून ११४९ बल्क लिटर्स एवढी दारू जप्त केली. जप्त केलेल्या दारूची किमत १०५५९० रु. एवढी असल्याचे येथील अबकारी खात्यातील सहाय्यक आयुक्त दीपाली नाईक यांनी माहिती देताना सांगितले.
उत्तर गोव्यात ५८३ बल्क लिटर एवढी दारू पकडण्यात आलेली असून त्याची किंमत ५४५९० रु. तर दक्षिण गोव्यात ५६५ बल्क लिटर एवढी दारू पकडण्यात आलेली असून ५१००० रु. असल्याची माहिती नाईक यांनी दिली.
कॉंग्रेसतर्फे बहुतेक नवे चेहरे?
कॉंग्रेस उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून यावेळी बहुतेक नव्या चेहर्यांना संधी मिळेल, असे कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख मावीन गदिन्हो यांनी सांगितले.
मुख्य निवडणूक आयुक्तांची गोवा भेट रद्द
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांच्या नेतृत्वाखालील पथकांची दि. २३ रोजीची गोवा भेट रद्द झाल्याचे वृत्त आहे.
येथील मुख्य निवडणूक अधिकारी कुमारस्वामी पत्रकारांना माहिती देण्यास टाळत असल्याने पत्रकारांनी दि. २३ रोजी कुरेशी यांच्या निदर्शनास वरील प्रकार आणून देण्याची तयारी केली होती.
बुडालेल्या जहाजावरील सहा गोमंतकीय परतले
इटलीजवळ बुडालेल्या ‘कॉस्ता कॉंकोर्डिया’ या जहाजावरील १० गोमंतकीय कर्मचार्यांपैकी सहाजण काल सुखरूप गोव्यात परतले. या जहाजावरील बारा भारतीयांची पहिली तुकडी काल मायदेशी परतली. त्यामध्ये सहाजण गोमंतकीय आहेत.
सुर्याचा धाक दाखवून महिलेस लुटले
एकास अटक
सिमेर, कांदोळी येथे एका महिलेला घरात एकटी असल्याची संधी साधून तिघा अज्ञात चोरट्यांनी सुर्याचा धाक दाखवून जवळ जवळ दीड लाख रुपयांना लुटले. याप्रकरणी एकास अटक केली आहे. कळंगुट पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना बुधवारी संध्याकाळी ४.३० वाजता घडली. सिमेर, कांदोळी येथे मिलाग्रीन ब्रागांझा (४५) ही महिला आपल्या घरात एकटीच होती, ती साधून तिघां अज्ञात चोरट्यांनी अचानक घरात प्रवेश केला.
शतकाचा इतिहास असलेली ‘कोडॅक’ दिवाळखोरीत
छायाचित्रणाच्या क्षेत्रात जगविख्यात असलेली अमेरिकी कंपनी ईस्टमन कोडॅक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी असून काल त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात आली. कंपनीचे सीईओ आंतोनियो पेरेझ यांनी यासंदर्भातील घोषणा केली. शतकाहून अधिक काळाचा इतिहास असलेल्या कोडॅक कंपनीने छायाचित्रण कला जनसामान्यांपर्यंत नेण्यात फार मोठे योगदान दिले. मात्र, आजच्या डिजिटल छायाचित्रणाच्या युगात कंपनीला तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागत असून सातत्याने तोटा सोसावा लागत आहे. सन २००३ पासून आजवर कंपनीला आपली तेरा उत्पादन केंद्रे बंद करावी लागली व ४७ हजार कर्मचार्यांना घरी पाठवणे भाग पडले.
आठवणींतला नरेंद्र... गहिवरलेला महाशद्ब!
- श्रीकांत कासकर
माणसाचे अस्तित्व त्याच्या निघून जाण्याने अधिकच गहिरे होत जाते. त्याच्या आठवणी, त्याचा सहवास, त्याचे व्यक्तीमत्व पावलोपावली खुणावत राहते. जसजसे दिवस उलटू लागतात, तसतसे दुःख आठवणींचा थेंब बनूनच राहते. नरेंद्रच्या बाबतीतही तसेच! त्याच्या जाण्याने आमच्यातील दीर्घकालीन मैत्रीचे मोरपीस गळून पडले. सेंट झेव्हियर कॉलेजमध्ये असल्यापासून त्याच्या व सावंतवाडीच्या कॉलेजमध्ये असल्यापासून माझ्या वाड्मयीन चळवळी चालू असायच्या. त्यातूनच आम्ही खूप जवळ आलो. नरेंद्र आणि अवधुत कुडतरकर यांनी म्हापशात ‘नवोदितांची कोरी पाटी’ नावाखाली पहिलेच (व शेवटचेही!) मराठी व कोंकणी कविसंमेलन भरविले होते. त्यात आजचे आघाडीचे पुंडलिक नाईक, हेमा धुमटकर, प्रकाश पाडगावकर, बा. सा. पवार, सीताराम शेट्ये आदी सहभागी झाले होते. गोव्यातील वाड्मयीन चळवळीचा हा प्रारंभ होता. गोव्यातील नंतरच्या वाड्मयीन चळवळीची, निर्मितीची बीजे या संमेलनातच रूजली होती. आज ही पाटी कोरी राहिलेली नाही, त्याचे बरेचसे श्रेय नरेंद्रकडेच जाते. स्वतः घडत जाणे आणि दुसर्याला घडवत जाणे या सततच्या प्रक्रियेत तो गुंतत गेला. संवेदनाच्या तळाशी उत्खननाला सिद्ध व्हावे तसे त्याच्या कवितेतील शब्द अस्वस्थ करून ठेवतात, तेव्हा व्याकुळता अनावर होते.
विस्मृतीतला सूर
हिंदी चित्रपटसृष्टीचे सुवर्णयुग गणल्या गेलेल्या चाळीस ते साठच्या दशकातील एकाहून एक मधुर गीतांच्या सुरावटींमध्ये ज्यांनी खरा रंग भरला, ते गोमंतकीय संगीत संयोजक अँथनी गोन्साल्वीस नुकतेच आपल्याला सोडून गेले. हिंदी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकून अमेरिकेत एका विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीवर गेलेले गोन्साल्वीस भारतात परतल्यानंतर पुन्हा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळले नाहीत आणि मतलबी चित्रसृष्टीनेही त्यांचा शोध घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. त्यामुळे उर्वरित कालखंड त्यांनी आपल्या माजोर्ड्याच्या घरामध्ये विविध व्याधींशी सामना करीत कठीण परिस्थितीत घालवला. नाही म्हणायला श्रीकांत जोशींसारख्या रसिकाने गोन्साल्वीस यांच्या कर्तृत्वाची उंची ठाऊक असल्याने ‘अँथनी गोन्साल्वीस ः दि म्यूझिक लिजंड’ या लघुपटाची निर्मिती करून त्यांची ओळख नव्या पिढीला घडवण्याचे मौलिक कार्य केले आणि त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना जमेल तेवढी साथ दिली. बाकी अँथनींच्या वाट्याला आली ती केवळ उपेक्षाच. आज नानाविध प्रगत सॉफ्टवेअरच्या जमान्यात संगीत संयोजकांची गरज चित्रपटसृष्टीला उरलेली नाही, परंतु एक काळ असा होता, जेव्हा अरेंजरविना चित्रपटसृष्टीचे पान हलत नसे.
शिक्षण संचालकांना न्यायालयातहजर राहण्याचा आदेश
माध्यमबदल प्रश्नी गंभीर दखल
इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान देण्याच्या सरकारच्या निर्णयास न्यायालयाने स्थगिती दिलेली असतानाही १०५ शाळांनी माध्यमात बदल केलेला आहे. मात्र शिक्षण खात्याने संबंधितांवर कारवाई न करता उलट या प्रकरणातील माहिती लपविल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल शिक्षण संचालक अनिल पवार यांना संपूर्ण माहितीसह आज न्यायालयासमोर हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
परवा न्यायालयात सरकारनेच १०५ शाळांनी माध्यम बदलल्याची कबुली दिली होती. त्यावर काल झालेल्या युक्तिवादाच्या वेळी अर्जदारांचे वकील ऍड. आत्माराम नाडकर्णी यांनी सरकारने न्यायालयाचा अवमान केल्याचे सांगितले. न्यायमूर्तीनीही नाडकर्णी यांचा मुद्दा उचलून धरला, हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा प्रकार असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्य निवडणूक आयुक्त२३ रोजी गोव्यात
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. व्हाय. कुरेशी यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाचे पथक २३ जानेवारी रोजी गोव्यात दाखल होणार आहेत.
३ मार्च रोजी राज्यात होऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोगाचे पथक गोव्यात येत आहे.
दरम्यान, निवडणूक रिंगणात उतरणार्या दर एका उमेदवाराने आपले वेगळे बँक खाते निवडणूक खर्चासाठी उघडण्याची गरज आहे. भारतीय निवडणूक आयोगाने तसेच निर्देश दिलेले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या किमान एका दिवसापूर्वी हे खाते उघडणे आवश्यक आहे. या अटीचे पालन न करणार्या उमेदवारांना आयोगाच्या सूचनेनुसार निर्वाचन अधिकारी नोटिसा पाठवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अँथनी गोन्साल्वीस यांचे निधन
संगीतकार अँथनी गोन्साल्विस यांचे काल दीर्घ आजारानंतर निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा किरण व मुलगी लक्ष्मी आहे. ते माजोर्डा येथे राहत होते.
हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळात त्यांनी अनेक गीतांना संगीत दिले होते. लक्ष्मीकांत प्यारेलाल या प्रसिद्ध संगीतकार जोडीपैकी प्यारेलाल यांनी अँथनी यांच्याकडूनच व्हायोलिन शिकले होते.
नातवाच्या निधनाच्या धक्क्याने आजोबा मृत्यूमुखी
शिर्ले दुर्घटना
शिर्ली बार्शे येथील दगडाच्या खाणीत खोदकाम करताना दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन युवक ठार झाले होते. त्यात आणखी धक्कादायक घटना म्हणजे काल जानू शाबा वेळीप यांचे आजोबा जानू वेळीप (७५) हे नातू ठार झाल्याचे ऐकून धक्का बसून मरण पावले.
काल सकाळी जानू वेळीप याचे आजोबा जानू शेतात होते त्यांना नातवाची दुःखद घटना समजताच धक्का बसला व ते मरण पावले. या दरड कोसळणाच्या घटनेत एकाच घरातील जानू, सुरेश व जतू असे तीन सदस्य मरण पावले. त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मागच्या तारखेने नियुक्तीपत्रेदिली गेल्याचा इन्कार
राज्य विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मागची तारीख घालून विविध सरकारी खात्यांत नोकर्यांसाठीची नियुक्तीपत्रे काढण्यात आल्याचा आरोप खोटा व निराधार असल्याचे गोव्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी काल सांगितले.
निवडणूक आयोगापुढे पत्रकारांचे धरणे
राज्य निवडणूक आयोग कार्यालयातील मुख्य निवडणूक अधिकारी कुमार स्वामी यांनी काल पत्रकारांना आयोगाकडे आलेल्या तक्रारींसंबंधीची माहिती न दिल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी आयोगाच्या आल्तिनो येथील कार्यालयात धरणे धरून घोषणा दिल्या.
पोरस्कडे अपघातात पादचारी ठार
पोरस्कडे पेडणे राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ रस्त्यावर हिरोहोंडा मोटरसायकलची धडक बसून अनंत बाळा हळदणकर (६०) ठार झाले तर मोटरसायकलस्वार किशोर जाधव व पांडुरंग महाले हे दोघेजण जखमी झाले.
तोंड सांभाळून बोला !
निवडणूक आयुक्तांनी मायावतीना फटकारले
मायावतीने निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर टीका करताना विचार करून बोलावे, असे मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी कडक शब्दात काल सुनावले. एका पक्षाची निशाणी असलेले हत्तीचे पुतळे मोठे आहेत व ते सुंदर दिसतात म्हणून झाकायचे नाहीत काय असा प्रश्न त्यांनी केेला.
अमेरिकेतील प्रस्तावित कायद्यांच्या निषेधार्थ ‘विकिपिडीया’ बंद
अमेरिकेच्या संसदेत सादर करण्यात आलेल्या पायरसीविरोधी विधेयकांच्या निषेधार्थ जगातील बहुसंख्य लोकांकडून भेट दिले जाणारे ऑनलाईन माहितीकोश असलेले ‘विकिपिडीया’ हे संकेतस्थळ २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आले. या कायद्यांमुळे संकेतस्थळांवर निर्बंध येणार असून भाषण स्वातंत्र्याच्या गळचेपी होणार असल्याचा आरोप ‘विकिपिडी’याने केला आहे.
कन्हैय्याला अटक
आपल्याच शाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप दाखल करण्यात आलेला शिक्षक कन्हैय्या नाईक याला काल बाल न्यायालयाने अटक पूर्व जामीन नामंजूर केला, त्यानंतर रात्री उशीरा पोलिसांनी त्याला अटक केली.
कोमल विनोदाचे फूलमाळी : चिं. वि. जोशी
- शंभू भाऊ बांदेकर
मराठी साहित्यात विनोदाचे आद्यपीठ श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी प्रथम स्थापन केले, असे इतिहास सांगतो. असे हे कोल्हटकर आपल्या विनोदी लेखनाबद्दल म्हणत कीं, ‘मला हास्यरसा इतकाच करूणरस आवडतो. पण मजकडून करूणरसात्मक लेखनाच्या मानाने हास्यरसात्मक लेखनच अधिक झाले आहे’. ही गोष्ट मात्र खरी. पुढे सांगावयाचे म्हणजे, ‘कथानक तयार करताना मी आधी वर्ष-वर्ष त्यात घालवित असतो. मात्र लेखन सुरू करण्यापूर्वीचे दोन-तीन महिने ते कथानक डोक्यात इतके घोळत राहते कीं, तद्विषयक विचारांचा भार शेवटी असह्य होऊनच लेखनास सुरूवात होते.
युतीद्वारे नवसंजीवनी
निवडणूक आयोगाच्या मान्यतेच्या नव्या निकषांमुळे अस्तित्वाचे संकट उभे राहिलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षापुढे आता युतीशिवाय पर्याय उरलेला नाही. स्वतःची मतसंख्या निवडणूक आयोगाच्या निकषांना उतरवायची असेल तर युतीद्वारे अधिकाधिक जागा लढवूनच ती वाढवता येणे शक्य आहे. कॉंग्रेससोबत पाच वर्षे सत्तासोबत केल्यानंतर तो पक्ष सर्वांत भ्रष्टाचारी असल्याचा साक्षात्कार मगो नेत्यांना आता निवडणूक तोंडावर असताना घडला. पण असा साक्षात्कार घडूनही या मंडळींनी शेवटच्या क्षणापर्यंत कॉंग्रेसशी पुन्हा युती करण्यासंदर्भात बोलणी का सुरू ठेवली होती या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? संधिसाधूपणा हेच मगो पक्षाचे तत्त्व उरले आहे की काय? या संधिसाधूपणानेच तर मगोचे अस्तित्व जवळजवळ संपवले. गोवा मुक्तीनंतर या प्रदेशाच्या जडणघडणीचा पाया ज्या पक्षाने आणि त्याच्या द्रष्ट्या नेत्यांनी रचला, त्या पक्षाची आधी कॉंग्रेसने आणि नंतर भाजपाने वाताहत केली. ही वाताहत करण्यात वरील दोन्ही पक्षांचा जेवढा वाटा होता, त्याहून अधिक पक्षातून वेळोवेळी फुटून निघालेल्या नेत्यांचा होता.
खडीचा डोंगर कोसळून तीन कामगार ढीगार्याखाली
शिर्ले - बार्से येथील घटना
शिर्ले-बार्से येथे दगडाच्या क्वारीवर डोंगराचा भाग कोसळून जानू शाबा वेळीप (२४), सुदेश कृष्णा वेळीप (२५) व संदीप नागू वेळीप (२५) हे तिघे तरुण कामगार दगड - मातीच्या ढीगार्याखाली गाडले गेले. रात्री उशीरापर्यंत ढीगारे उपसण्याचे काम सुरू झाले नव्हते.
करमल घाटाच्या अलीकडे मडगाव पोळे रस्त्यापासून सहा ते सात किलोमिटर आतमध्ये शिर्ले बार्शे ही अतिग्रामीण डोंगराळ जागा आहे. या ठिकाणी चिमूट वेळीप यांची स्टोन क्वारी आहे.
मगो-कॉंग्रेस युतीची बोलणी संपुष्टात
भाजपाकडे १० जागांची मागणी
कॉंग्रेस सर्वांत भ्रष्टाचारी पक्ष : ढवळीकर
सध्या भाजपशी युती करण्यासंबंधीची बोलणी चालू आहेत. कॉंग्रेस हा सर्वांत भ्रष्टाचारी पक्ष असून त्यांच्याकडील बोलणी यापूर्वीच बंद केल्याचे मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
सर्वांत भ्रष्टाचारी कॉंग्रेस पक्षाकडे सरकार स्थापन करण्यासाठी युती का केली होती? आता निवडणुकीच्यावेळी मतदारांनी प्रश्न विचारल्यास काय उत्तर देणार, असे प्रश्न करून पत्रकारांनी ढवळीकर यांना बरेच छेडले. त्यावर सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला नसता तर राष्ट्रपती राजवट लागू झाली असती, ते टाळण्यासाठीच कॉंग्रेससोबत सरकार स्थापन केल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. भाजप व आपल्या पक्षाची विचारप्रणाली मिळतीजुळती असल्याचे ते म्हणाले.
माध्यमप्रश्न न्यायप्रविष्ट असताना १०५ शाळांचे इंग्रजीकरण
सरकारची हायकोर्टात कबुली
व्यवस्थापनांकडे स्पष्टीकरण मागितल्याची माहिती
एकूण १७९ पैकी १०५ प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच इंग्रजी माध्यम सुरू केल्याची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला सादर केले आहे. आज त्यावर सुनावणी होणार आहे.
वरील शाळांच्या व्यवस्थापनांनी माध्यमात बदल केल्यामुळे अनुदान का बंद करू नये, अशा नोटिसाही शाळा व्यवस्थापनांना पाठविल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. वरील १०५ शाळांपैकी ७० शाळा व्यवस्थापनांनी शिक्षण खात्याला माध्यम बदलल्याची माहिती दिलेली आहे तर ३५ जणांनी माहिती देण्यास नकार दिला आहे.
रियाझ खान साखळीचे नगराध्यक्ष
साखळी पालिकेवर रियाज खान यांची नगराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. निर्वाचन अधिकारी म्हणून अजित पंचवाडकर तर निवडणूक अधिकारी म्हणून पालिकेचे मुख्याधिकारी शशांक ठाकूर उपस्थित होते. त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष ब्रह्मानंद देसाई, नगरसेवक प्रा. सुनिता वेरेकर, दिलीप देसाई, आनंद नाईक, आरती नाईक, यशवंत माडकर, लक्ष्मण देसाई, पूजा डांगी हे नगरसेवक उपस्थित होते.
‘कदंब’चे चेअरमनपद दीपक ढवळीकरांनी सोडले
प्रियोळचे आमदार दीपक ढवळीकर यांनी काल कदंब महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला.
कदंब महामंडळ हे सरकारने आपत्कालीन म्हणून जाहीर करावे, अशी मागणी ढवळीकर यांनी केली आहे. महामंडळाच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न केले. परंतु ते फायद्यात येऊ शकत नाही.
जुवारी पुलाचे काम आचारसंहितेमुळे अडले
छोट्या छोट्या भेगा पडल्याने वाहतुकीसाठी धोकादायक ठरलेल्या जुवारी पुलाच्या डागडुजीचे काम विधानसभा निवडणूक आचार संहितेमुळे अडून पडले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्यातील सूत्रांनी दिली.
सरकार लष्कर प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टात सरकारकडून ‘कॅव्हिएट’
जन्मवर्ष बदलण्यास संरक्षण मंत्रालयाने नकार दर्शविल्यानंतर लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी परवा सरकारविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर काल केंद्र सरकारने लष्कर प्रमुखांबाबत कोणताही निर्णय देण्याआधी आपले म्हणणे ऐकून घ्यावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हिएट’ सादर केले आहे.
सालेमचे भारतातीलहस्तांतरण रद्द
मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी व कुख्यात गुंड अबू सालेम याचे भारतातील हस्तांतर रद्द करण्याच्या लिस्बन येथील न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध भारत सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळली गेली आहे. त्यामुळे अबू सालेमला पोर्तुगालच्या हवाली करावे लागणार आहे. पोर्तुगालच्या सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारची ही याचिका फेटाळली.
कार्निव्हल व शिमगोत्सवाचे भवितव्य निवडणूक आयोगाच्या हाती
होऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठीची अचारसंहिता लागू झालेली असली तरी दरवर्षी सरकारतर्फे राज्यात आयोजित करण्यात येणारा कार्निव्हल व शिमगोत्सव आयोजित करण्यास आपणाला परवानगी द्यावी अशी मागणी करणारी दोन वेगवेगळी पत्रे (एक कार्निव्हल व दुसरे शिमगोत्सवासाठीचे) सात-आठ दिवसांपूर्वीच पर्यटन खात्याने राज्य निवडणूक आयोगाला पाठवली असल्याचे पर्यटन संचालक स्वप्नील नाईक यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
विमान वाहतूक क्षेत्रात ४९% विदेशी गुंतवणुकीचा प्रस्ताव
भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात ४९ टक्के थेट विदेशी गुंतवणुकीस मान्यता देण्याचा प्रस्ताव खाते तयार करणार असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्री अजित सिंग यांनी काल सांगितले. काल हवाई वाहतूक मंत्री व अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्यात झालेल्या बैठकीत एअर इंडिया कर्मचार्यांच्या पगाराची थकबाकी अदा करण्यासाठी १५० कोटी रु. मंजूर करण्याचे ठरविण्यात आले.
कोकणी नाट्यस्पर्धेच्या अल्पप्रतिसादास जबाबदार कोण?
- दिलीप बोरकर
गोवा कला अकादमीच्या यंदाच्या नाट्यस्पर्धेत म्हणे फक्त चारच प्रवेशिका आलेल्या आहेत. कला अकादमीची कोकणी नाट्यस्पर्धा असो वा मराठी असो, कमीत कमी पाच प्रवेशिका स्पर्धेसाठी आल्या तरच ती स्पर्धा घेतली जाण्याचा नियम कला अकादमी राबवीत असते. त्याच्या मागील कारण म्हणजे स्पर्धेतील नाटकांतून पहिल्या तीन क्रमांकाच्या नाटकांची निवड करण्यासाठी परीक्षकांना वाव मिळायला हवा. पाच प्रवेशिका म्हणजे स्पर्धेचा निकष नसला तरी त्या पाच नाटकांतून त्यातल्या त्यात तीन नाटके निवडण्याची संधी परीक्षकांना लाभते. स्पर्धेसाठी सादर करण्यात आलेल्या पाच नाटकांतील इतर दोन नाटकांना उत्तेजनार्थ बक्षीस दिले गेले नाही तरी चालते. निदान पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक निवडायला मिळाला तरी पुरेसा असतो. त्यामुळे कला अकादमीचा कार्यभाग अनायासाने उरकणे शक्य होऊन जाते.
वाईट पायंडा
एकीकडे पाकिस्तानचे लष्करप्रमुख राजकीय महत्त्वाकांक्षेने एकेक पाऊल पुढे टाकत असताना दुसरीकडे भारतात आपले लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी सरकारलाच न्यायालयात खेचले. लष्करप्रमुखाने सरकारलाच न्यायालयात खेचण्याची ही आगळीक वैयक्तिक कारणाखाली जरी असली, तरी त्याचे दूरगामी पडसाद उमटणे आता अटळ आहे. मुख्यतः नवे लष्करप्रमुख होऊ इच्छिणार्या ज्येष्ठ अधिकार्यांना या संघर्षाचा फटका बसणार आहे. श्री. सिंग यावर्षी ३१ मे रोजी निवृत्त झाले तर ईस्टर्न कमांडचे ले. जन. विक्रमसिंग हे भावी लष्करप्रमुख होतील. सिंग पुढील वर्षी निवृत्त होत असतील तर मात्र ले. जन. के. टी. पटनाईक हे लष्करप्रमुख होतील आणि या वर्षी ३१ मे च्या पूर्वीच जर सिंग यांनी निवृत्ती घेतली, तर ले. जन. शंकर घोष हे लष्करप्रमुख होतील. लष्करप्रमुखाचा कार्यकाल ३ वर्षे किंवा वयाची ६२ वर्षे यापैकी जे आधी असेल तिथपर्यंत असतो. त्यामुळे हा केवळ सरकार आणि लष्करप्रमुख यांच्यातील संघर्ष नाही. न्यायालयीन खटलेबाजीचे एक चक्रच यातून निर्माण होऊ शकते आणि तसे घडले तर ते भविष्यात धोकादायक ठरू शकते.
योगमार्ग - रोजयोग (सत्य - ३७)
- डॉ. सीताकांत घाणेकर
हजारो वर्षांपासून शास्त्रकार सांगतात - ‘सत्य म्हणजे ईश्वर’. प्रत्येक मानवामध्ये देवत्व आहे. असे असताना देखील काही मानव देवत्वाकडे न वळता असे वागतात की त्यांना दानवच म्हणावे लागेल. काहीजण जन्मतःच तसे असतात. ते कसेही वागले तरी आश्चर्य वाटत नाही. पण सज्जन माणसे जेव्हा सत्याकडे पाठ फिरवतात तेव्हा मानवाची अधोगती निश्चित ठरलेली असते. सर्वनाशाची ती नांदी असते.
जयोऽस्तु ते हे जयाभारते...
- प्रा. रमेश सप्रे
ते वाक्य ऐकून अंगावर आकाशातून वीज कोसळावी तशी त्यांची अवस्था झाली. एका देव व गुरू यांच्यावर पूर्ण श्रद्धा व विज्ञानावर विश्वास असलेल्या व्यक्तीकडून तसं काही ऐकावं लागेल अशी त्यांना कल्पना नव्हती. एक प्रकारचा वज्राघातच होता तो!
असं काय घडलं होतं? घडलं फार विशेष असं काही नव्हतं. एक दुसरी-तिसरीत असलेली छोटीशी मुलगी शाळेत जायला भीत होती. नव्हे जातच नव्हती. बळजबरीनं नेलं तर पांढरी फटक पडत होती. जवळजवळ बेशुद्धच. एवढी कसली भीती वाटली होती किंवा वाटत होती तिला. ती तर काही बोलायलाच तयार नव्हती. आईवडलांना खूपच काळजी लागून राहिली होती. एकुलती एक पोर ही.. कसं होणार हिचं...नि आमचंही! तसे प्रयत्न काही कमी केले नव्हते तिला शाळेत नेण्याचे. निरनिराळी आमिषं दाखवली होती. बक्षिसं देण्याची आशा दाखवली होती. धाकदपटशासुद्धा वापरून झाला होता. पण ही ढिम्म... कश्शीच शाळेत जात नव्हती. अन् घरीही काहीही हालचाल न करता, व्यवस्थित न खाता-पिता शून्यात पाहत बसत होती. शरीर म्हणजे नुसता हाडांचा सांगाडा झाला होता. आधीच अशक्त, त्यात ही अवस्था! परिस्थिती तशी बिकटच होती. पुरेशी गंभीर होती.
लष्कर प्रमुखांची सरकारविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका
सरकारने चुकीचे जन्मवर्ष नोंद केल्याची केलेली तक्रार संरक्षण मंत्रालयाने फेटाळून लावल्यानंतर भारताचे लष्कर प्रमुख जन. व्ही. के. सिंग यांनी या प्रकरणी केंद्र सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची जन्मतारीख १० मे १९५१ असताना सरकारने १० मे १९५० अशी नोंद केली आहे. ज्यामुळे त्यांना एक वर्ष अगोदर निवृत्त व्हावे लागणार आहे.
एखाद्या सैन्यदल प्रमुखाने सरकारलाच सुप्रीम कोर्टात खेचण्याची ही पहिलीच वेळ आहे. लष्कर प्रमुख सिंग यांच्यावतीने ज्येष्ठ वकील यू. यू. ललित सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. आपण १३ लाख जवानांच्या सेनेचे प्रमुख असून वयाचा वाद हा आपल्या ‘प्रतिष्ठा व प्रमाणिकपणा’ यांच्याशी निगडीत असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.
जितेंद्र देशप्रभू कॉंग्रेसमध्ये
माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांनी काल पुन्हा कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आपण स्वगृही परतत असल्याने आनंद होत असल्याचे देशप्रभू यांनी सांगितले. देशप्रभू यांची लवकरच पक्ष प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली जाईल.
प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी त्यांचे स्वागत केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत राजकीय गरज म्हणून कॉंग्रेसने देशप्रभू यांना काही काळासाठी राष्ट्रवादीच्या ताब्यात दिले होते. परंतु आज त्यांना आपण परत पक्षात आणल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे उत्तर गोव्यात पक्ष बळकट होईल, असे त्यांनी सांगितले.
आठवडा अखेरपर्यंत कॉंग्रेस उमेदवार निश्चित
सुभाष शिरोडकर यांचे प्रतिपादन
कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांची यादी चालू सप्ताहाच्या अखेरपर्यंत निश्चित होणार असून दि. १९ रोजी दिल्लीत छाननी समितीची बैठक होण्याची शक्यता असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी काल सांगितले.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस युती होणारच. जागा वाटपाच्या प्रश्नावरही लवकरच निर्णय होईल, असे सांगून यावेळी कॉंग्रेस पक्षालाच किमान २२ जागा मिळतील, असे शिरोडकर यांनी सांगितले. असे असेल तर राष्ट्रवादीशी युती करण्याची गरज काय, असा प्रश्न केला असता, या राज्याला स्थिर प्रशासन देण्यासाठी त्याचीही गरज आहे, असे ते म्हणाले. मगोनेही कॉंग्रेस बरोबरच राहावे असे वाटते. त्यामुळे त्यांच्याशी बोलणी चालूच असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री कामत यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने गोव्याला स्थिर प्रशासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
वेर्णा अपघातात युवक ठार
वेर्णा महामार्गावरील महिंद्रा शोरुमसमोर करीझ्मा मोटरसायकलची मारुती व्हॅनला धडक बसून मोटरसायकलचालक लॉयलावाडो - उतोर्डा येथील युवक सेनफोर्ड नेल्सन परेरा (२१) ठार झाला.
तिसरी आघाडी स्थापण्याच्या हालचाली
ठराविक लोकांच्या हातात असलेली सत्ता काढून घेण्याच्या व कॉंग्रेसला शह देण्याच्या हेतूने ३ मार्च रोजी होणार्या गोवा विधानसभा निवडणुकीत आघाडी स्थापन करून सात मतदारसंघांतून वेगवेगळे उमेदवार उभे करण्याचा विचार सुरू असून पुढील दोन दिवसांत संबंधितांची एक बैठकही आयोजित केल्याचे समजते.
पाकिस्तानचे पंतप्रधान पद सोडण्याच्या तयारीत
राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईस मान्यता न दिल्याप्रश्नी, पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने काल अवमान नोटीस जारी केली. गिलानी यांना दि. १९ रोजी व्यक्तीश: सादर होण्याचे आदेशही कोर्टाने दिले. दरम्यान, या आदेशानंतर पंतप्रधान गिलानी यांनी पद सोडण्याची तयारी दाखवली आहे.
आचारसंहिता काळात पंजाबात २४ कोटी रुपयांची रोकड जप्त
पंजाब विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यात २४ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांनी काल दिली. ही सुमारे तेवीस कोटी सात लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून आयकर खात्याला अधिक चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे.
भाजपचे जनसंपर्क अभियान सुरू
भाजपच्या जनसंपर्क अभियानचा काल सकाळी पणजीतून शुभारंभ झाला. भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली यांनी बावटा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला.
यात्रेसाठी खास सजवलेल्या गाडीतून नंतर विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, भाजपचे प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर व पैंगीणचे आमदार रमेश तवडकर यांनी वरील गाडीतून जनसंपर्क अभियानसाठी प्रयाण केले.
‘गोवा डेअरी’ निवडणुकीत श्रीकांत नाईक गट विजयी
गोवा डेअरीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष माधव सहकारी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा पराभव झाला तर श्रीकांत नाईक यांचे पॅनल विजयी झाले. सहकारी गटाचे ५ तर नाईक गटाचे ७ संचालक निवडून आले. मतमोजणी काल सकाळी मडगाव येथील सहकारी सोसायटीच्या प्रबंधकाच्या कचेरीत झाली.
साने गुरुजी कथामालेचे बालमित्र : अरविंद नेवगी
- चंद्रकांत रामा गावस
३६ वे अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला अधिवेशन मुळगाव डिचोली येथे २६-२७ डिसेंबर २००३ रोजी भरले होते. पहिल्या दिवसाची रम्य संध्याकाळ. अधिवेशनाचा उद्घाटन समारंभ संपन्न होत होता. साने गुरुजींची खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही प्रार्थना एक निवृत्त शिक्षक व गोवा प्रदेश साने गुरुजी कथामालेचे संघटक आपल्या सुरेल स्वरात, मुलांत मूल बनून म्हणत होते. त्यांच्यामागून अधिवेशनात सहभागी झालेली शेकडो मुले त्यांच्या सुरांत सूर मिसळून गात होती. सर्वत्र आनंददायी व मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. ते गीतकार होते ‘अरविंद रामचंद्र नेवगी’. डिचोली गावचे रहिवासी.
तिसरा डोळा मिटला
देशातील पहिल्यावहिल्या महिला प्रेस फोटोग्राफर पद्मविभूषण होमी व्यारावाला यांच्या निधनाच्या वृत्ताला राष्ट्रीय दैनिकांत कोठे तरी कोपर्यात जागा मिळाली असेल, परंतु या नावाशी या देशाच्या इतिहासातील एक संस्मरणीय पर्व जोडले गेलेले आहे हे विसरता येणार नाही. देशाच्या स्वातंत्र्यापासून नवभारताच्या उभारणीपर्यंतच्या त्या भारलेल्या कालखंडाच्या साक्षीदार असलेल्या होमींनी आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने का होईना, ते सारे ऐतिहासिक क्षण आपल्या कॅमेर्यात अमर केले आणि आज आपल्यासाठी तो सारा ठेवा पाहण्या, अनुभवण्यास उपलब्ध झाला आहे. एक स्त्री असूनही प्रेस फोटोग्राफीसारख्या अत्यंत धावपळीच्या आणि जिकिरीच्या व्यवसायात उतरण्याचे धाडस दाखवणार्या होमींनी त्या छायाचित्रणकलेशी नेहमीच निष्ठा राखली. त्यांनी टिपलेल्या हजारो छायाचित्रांमध्ये केवळ इतिहास टिपला गेला आहे असे नव्हे, तर त्यामध्ये कमालीची कलात्मकताही दिसून येते हा होमींच्या छायाचित्रणाचा विशेष आहे. आपण पोटासाठी छायाचित्रणाकडे वळले, परंतु आता पन्नास वर्षांनंतर आपण केलेल्या कामाचे मोल कळते असे त्या म्हणत, परंतु ज्या निष्ठेने आणि झोकून देऊन त्यांनी हे सारे क्षण टिपले, त्याला तोड नाही.
‘भाजपचा मुख्यमंत्री ठरायचा आहे’
भाजपने मुख्यमंत्रीपदासाठीचा उमेदवार अजून ठरवला नसल्याचे अरूण जेटली यानी काल पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देताना स्पष्ट केले.
उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक याना स्थानिक राजकारणात येण्याची इच्छा असून पक्षाने त्याबाबत काय निर्णय घेतला आहे, असे विचारले असता त्याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नसल्याचे जेटली यानी सांगितले.
अशा प्रकारचे निर्णय पत्रकार परिषदेतून जाहीर करण्यात येत नसून त्यासंबंधी निर्णय झाल्यानंतर तुम्हाला कळवू, असे जेटली म्हणाले.
दरम्यान, श्रीपाद नाईक यांना पत्रकार परिषदेनंतर गाठून पत्रकारानी विचारले असता पक्षानेच सुरवातीला आपणाला स्थानिक राजकारणात उतरण्याचा प्रस्ताव दिला होता, असे ते म्हणाले. आता काय ते पक्षच ठरवणार असल्याचे ते म्हणाले. पर्वरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सुपर मार्केट जळाल्याच्या दुसर्याच दिवशी पेडा-बाणावली येथे सात झोपड्या जळून खाक
बाणावली, कोलवा येथील सुपर मार्केट, रेस्टारंट व खाद्यपदार्थांच्या गाड्यांना आग लागल्याची घटना ताजी असताना पेडा बाणावली येथे काल भर दुपारी ७ झोपड्यांना आग लागून त्या जळून झाल्या. त्यात १.५० लाख रुपयांची हानी झाली.
रोज बाप्तीस्ता या जमिनीत या झोपड्या होत्या. लक्ष्मण च्यारी यांचे ३० हजार रुपयाचे, गोपी चव्हाण यांचे ७५ हजार व लिला लमाणी हिचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले, त्या चार झोपड्यांत कोणी राहात नव्हते. रोज बाप्तीस्ता हिनेच त्या बांधायला दिल्या होत्या. काल दुपारी २.३० वाजता अचानक आग लागल्याने घरांतील माणसे बाहेर आली व आग विझवायला लागली. तात्काळ अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले व त्यांनी आग विझविली. जमीन मालक रोज बाप्तीस्ता यांनी या आगीमागे घातपाताचा संशय व्यक्त केला. राजकारण्यांतील हीतशत्रुनी आग लावली असून पाच वर्षामागे अशी घटना घडली होती असे तिने सांगितले.
निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी महिला निरीक्षकांवर
गोव्यातील निवडणुका निपक्षपातीपणे घेण्याचे काम सोपविण्यात आलेल्या निवडणूक निरीक्षकांच्या पथकात सर्व महिलांचाच समावेश आहे. देशाच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे महिला निरीक्षकांच्या पथकाकडे निवडणूक पार पाडण्याचे काम सोपविण्यात आले आहे.
पाच राज्यांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम ठरविल्यानंतर निवडणूक आयोगाने २० निवडणूक निरीक्षकांचे पथक गोव्याला पाठविले होते, त्यात सर्व महिलांचाच समावेश आहे.
महिला निरीक्षकांच्या पथकात गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांतून प्रत्येकी तीन, हरयाणा व छत्तिसगढ येथील दोन तर बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, केरळ, तामीळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यातून प्रत्येकी एक महिला सहभागी आहे.
गझल लिहिणार्यांबरोबर गायकही हवेत : पांचाळे
गझल संमेलनाचा समारोप
मराठी गझलच्या प्रचारासाठी एकटा भीमराव पांचाळे पूरा पडणार नाही, गझल लिहिणारे खूप आहेत, मात्र गझल गायकांची परंपरा निर्माण व्हायला हवी, असे मत काल अ. भा. मराठी गझल संमेलनाच्या समारोप सोहळ्यात ‘गझल सागर’चे गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केले. कला अकादमीत आयोजित दोन दिवसीय ६व्या अ. भा. मराठी गझल संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी बैठक आता उद्या किंवा परवा
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील युतीबाबतची पुढील बैठक आता उद्या मंगळवार दि. १७ किंवा परवा १८ रोजी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादीला सोडायच्या पाच मतदारसंघाबाबत यापूर्वीच एकमत झालेले असून अन्य दोन किंवा तीन मतदारसंघाबाबत वरील बैठकीत चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीने आठ जागांची मागणी केलेली असली तरी शेवटी सात जागांवर दोन्ही पक्षात समझोता होण्याची शक्यता दोन्ही पक्षातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पोळे येथे अपघातातएक ठार
पोळे येथे इनोवा कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात मारो येथील श्री निराकार विद्यालयाचे निवृत्त शिक्षक मंगलदास लोलयेकर (७०) यांना अपघाती मरण आले. १५ रोजी माड्डीतळप लोलये येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कारचालक अजरत अली याला काणकोणच्या पोलिसांनी वाहनासहित ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रवादीला केवळ ६ जागा सोडण्यास कॉंग्रेस अनुकूल
आज दिल्लीत बैठक
आठ जागांची राष्ट्रवादीची मागणी
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी युती व जागा वाटपासंबंधी परवा शुक्रवारी झालेल्या बैठकीत ठोस निर्णय होऊ न शकल्याने पुढील बैठकीत निर्णय घेण्याचे ठरल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी काल सांगितले. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये नवी दिल्लीत आज रविवार दि. १५ रोजी बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आठ जागांसाठी हट्ट धरून बसला असल्याचे सांगून त्यांच्यासाठी जास्तीत जास्त सहा जागा सोडण्याची पक्षाची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दोन्ही पक्षांचे नेते हट्टाला पेटल्याने परवा शुक्रवारी झालेल्या बैठकीत काहीही निर्णय होऊ शकला नसल्याचे वृत्त आहे.
‘मराठी साहित्यात गझलयुग आले आहे’
६व्या अ. भा. गझल संमेलानध्यक्ष घनश्याम धेंडे यांचे प्रतिपादन
कला अकादमीत संमेलनाचे उद्घाटन
मराठी गझलने एक सशक्त काव्यप्रकार म्हणून मराठी साहित्य परंपरेत रूढ होऊन आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मराठी साहित्यात ‘गझलयुग’ आले आहे, असे प्रतिपादन सहाव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष घनश्याम धेंडे यांनी केले. आजची गझल काल्पनिक राहिलेली नाही, जीवनातील वास्तवतेचे दर्शन, चित्रण गझलेतून होताना दिसते, असे ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले. काल सुरू झालेल्या या संमेलनात आजही दिवसभर कार्यक्रम चालू राहणार आहेत.
गझल सागर प्रतिष्ठान व कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचे उद्घाटन शशिकला काकोडकर यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर ज्ञानेश्वरीचे विद्वान प्राचार्य गोपाळराव मयेकर, अभिनेत्री आशालता, स्वागताध्यक्ष परेश जोशी, ‘गझल सागर’चे भीमराव पांचाळे, ५व्या संमेलनाच्या अध्यक्ष संगीता जोशी, कला अकादमीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष नरेंद्र आजगावकर व ऊर्दू शायर नसीम रिफअत ग्वालियरी उपस्थित होते.
आजपासून भाजपचे जनसंपर्क अभियान
राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज १५ जानेवारीपासून भाजपचे १६ दिवसांचे जनसंपर्क अभियान सुरू होणार असल्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले. भाजपचे राष्ट्रीय नेते अरुण जेटली यांच्या हस्ते आज पणजीत या अभियानचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
१५ रोजी सुरू होणार असलेले हे जनसंपर्क अभियान ३० रोजी संपणार असून या सोळा दिवसांत भाजप गोव्यातील ४० ही मतदारसंघ पिंजून काढणार असल्याचे पार्सेकर यांनी स्पष्ट केले. जनसंपर्क अभियानाअंतर्गत राज्यातील ४० ही मतदारसंघांत फिरून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आघाडी सरकारने राज्याची कशी लूट चालवली आहे याची लोकांना माहिती देण्यात येणार असल्याचे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.
कोलवा येथे सुपर मार्केट जळून खाक
रेस्टॉरंट, ६ दुचाकींनाही आग; घातपाताचा संशय
कोलवा पोलीस स्टेशनजवळ असलेल्या शोकाज या सुपर मार्केटला काल पहाटे आग लागून ते पूर्ण जळून गेले. या आगीत ३५ ते ४० लाख रुपयांची हानी झाली.
दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस समितीचे उपाध्यक्ष फ्रेंकी उर्फ फ्रांसिस्क सिक्वेरा यांच्या मालकीचे असून राजकीय वैमनस्यातून आग लावण्याचे घातपाती कृत्य असल्याचा दावा फ्रेंकी यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेबरोबरच कोलवा व बाणावली येथे आणखी सहा गाड्यांना आग लावण्याच्या किरकोळ घटना घडल्या आहेत.
१६ पासून पणजीत हनुमान चालीसा ज्ञानयज्ञ
चिन्मय मिशनच्या पणजी केंद्रातर्फे सोमवार दि. १६ जानेवारीपासून पणजी जिमखाना मैदानावर हिंदीतून श्री हनुमान चालीसा महाज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असल्याचे चिन्मय मिशन - पणजीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
मरूसागर एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यास आग
अजमेर एर्नाकुलम या कोकणे रेल्वे मार्गावरून धावणार्या मरूसागर या जलद गाडीच्या वातानुकूलित यंत्रणेला आग लागल्याने गाडी पाझरखणी येथे थांबवून आग विझवावी लागली. त्यात सुदैवाने कोणाही प्रवाशाला इजा पोहचली नाही. गाडीचे मात्र थोडे नुकसान झाले. गाडीच्या ४ व ३ या डब्यामधील वीज वाहिनीच्या रबराच्या पट्ट्यास आग लागून सर्वत्र आगीच्या ठिणग्या व धूर येऊ लागताच प्रवाशांनी रेल्वे अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले.
बाबा रामदेववर काळी शाई फेकली
काल पत्रकार परिषदेत बोलत असताना बाबा रामदेव यांच्या तोंडावर एकाने काळी शाई फेकून मारली. शाई फेकणार्यास रामदेव यांच्या समर्थकांनी चोप देऊन नंतर पोलीसांच्या स्वाधीन केले. रामदेव यांनी काल नवी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये भ्रष्टाचार व काळे धन याविषयी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी हा प्रकार घडला. ‘आपण असे काय केले ज्यासाठी हे लाभले’ अशी प्रतिक्रिया नंतर रामदेव यांनी दिली.
रमेश नाईक शिवसेना राज्यप्रमुखपदी
शिवसेनेच्या गोवाराज्य प्रमुखपदी रमेश नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आतापर्यंत अस्थायी समितीच्या अध्यक्षपदी होते.
शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये जाहीर झालेले गोवा राज्य कार्यकारिणीतील अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे -
प्रदीप बोरकर - जिल्हाप्रमुख उत्तर गोवा, धनराज नाईक जिल्हाप्रमुख दक्षिण गोवा, शशिकांत पर्येकर - जिल्हा संपर्क प्रमुख दक्षिण गोवा.
रंगुनी रंगात सार्या, राजरंग आपुला वेगळा
- रमेश सावईकर
आमचा गोवा हे एक छोटे राज्य. हे राज्य आदर्श बनविण्याची राजकीय पुढार्यांची प्रबळ इच्छा, निस्सीम राजकारण भक्ती आणि त्याप्रति प्रीती आहे. ‘गोवा के लोग अजिब है’ असे देशाचे पहिले पंतप्रधान स्व. पं. जवाहरलाल नेहरू म्हणाले होते. एक राजकारणी आणि लेखक म्हणून नेहरू फार मोठे होते. ‘दी डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकातून त्यांनी भारत देशाचा, संस्कृतीचा अन् प्रांतीय विविधतेचा शोध घेतला. त्यांच्या नजरेतून गोवा सुटला नाही अन् म्हणूनच त्यांनी गोमंतकीयांना ‘अजिब‘ संबोधले असावे. महत्त्वाची बाब म्हणजे गोमंतकीय आपला अजबतेचा ठसा उमटविण्यात गेल्या ५० वर्षांत कुठेही कमी पडले नाहीत. राजकारणात तर मुळीच ‘उणे’ नाहीत! गोवा मुक्त झाल्यावर वास्तविक राष्ट्रीय पक्षाकडे राजसत्ता जा शकली असती. पण तसे न घडता मुक्त गोव्याचे राजकीय भवितव्य घडविणारा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सत्तेवर आला. तब्बल साडेसतरा वर्षे म. गो. पक्षाने गोव्यावर अधिराज्य केले. म. गो. पक्ष आणि यु. गो. पक्ष या प्रादेशिक पक्षांनी त्याकाळात गोव्याच्या भवितव्याचा पाया घातला. राष्ट्रीय राजकीय प्रवाहात जाण्याचे टाळून प्रादेशिक राजकीय प्रवाहाच्या प्रभावात गोमंतकीय जनतेने ‘गोयकारपण’ टिकविले. तथापि नंतर राष्ट्रीय प्रवाहात विलीन होत कॉंग्रेस पक्षाकडे सत्तेची सूत्रे गेली. भारतीय जनता पक्षाने म. गो. पक्षाच्या साहाय्याने आपली पाळेमुळे ग्रामीण भागांपर्यंत घट्ट केली. अन् कॉंग्रेस भाजप हे दोन प्रमुख पक्ष बनले. प्रादेशिक पक्षाकडून राष्ट्रीय पक्षाकडे वाटचाल करीत ५० वर्षांचा कालखंड लोटला. त्यात प्रादेशिक पक्ष म्हणून म. गो. पक्ष अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहे. या खेपेस तर म. गो. पक्षाला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी किमान ३ जागा जिंकाव्या लागतील. म. गो.-भाजप युती झाल्यास ते सहज शक्य आहे. त्याचा फायदा म. गो. पक्षाला तर होईलच पण त्यापेक्षाही विरोधी भाजपला अधिक फायदा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाला म. गो.-भाजप युती फिस्कटलेली हवी. राष्ट्रवादी-कॉंग्रेस युती झाल्यास कॉंग्रेस पक्षाची मते विभागली जाणार नाहीत. म्हणून ही युती होण्यात सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचे अधिक भले होईल.
लगाम घालण्याची वेळ
फेसबुक आणि गुगलसारख्या २१ सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांविरुद्ध खटले चालवण्यास अनुमती देऊन सरकारने या मुख्यत्वे विदेशी संकेतस्थळांना भारतीय न्यायव्यवस्थेसमोर हजर करण्याची तयारी चालवली आहे. ज्या खासगी याचिकेच्या आधारे न्यायालयाने या संकेतस्थळांवर खटला दाखल करून घेतला, त्यामध्ये याचिकादाराने ही संकेतस्थळे सामाजिक तेढ निर्माण करतात असा आक्षेप घेतला आहे. अश्लीलता, अपप्रचार, बदनामी यासाठी या संकेतस्थळांचा वापर होत असल्याचे याचिकादाराचे म्हणणे आहे. खरे तर नव्वदच्या दशकानंतर जसजसे माहिती तंत्रज्ञान प्रगत होत गेले, तसतसे त्याने बघता बघता त्याने जग व्यापले. इंटरनेट हा घरोघरी परवलीचा शब्द बनला. संगणकसाक्षर समाजाच्या जगण्याचा ‘गुगल’ हा अपरिहार्य भाग भाग बनून गेला. कोणताही बदल घडतो तेव्हा त्याच्यासोबत बर्या - वाईट गोष्टी घडतच असतात.
स्नेह जपूया... सौख्य वाढवूया... संदेश मकर संक्रांतीचा मनामनांत रुजवूया...
- सौ. पौर्णिमा केरकर
आपल्या प्राचीन संस्कृतीत माणसाच्या भाग्यविधात्या देवदेवतांची जागा पक्ष्यांनी घेतलेली आढळते. नागर असो वा आदिवासी, लोकमानसाच्या धार्मिक श्रद्धेत पक्ष्यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे. राजस्थानमधील भिल्ल आदिवासी लोकांमध्येही काळ्या रंगाच्या काही पक्ष्यांना देव मानून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. अशा पूजाविधीतून वैयक्तिक आणि समूहमनाच्या भावभावनांना पडताळून शकून-अपशकूनविषयी सजगता दाखविली जाते.
तीळगूळ घ्या अन् नेहमीच गोड बोला!
- सौ. लक्ष्मी नारायण जोग
जानेवारी महिना लागला की सर्वांना सर्वात आधी वेध लागतात ते संक्रांतीचे! बहुतेक वेळा संक्रांत १४ जानेवारीलाच येते. पण क्वचित ती १५ जानेवारीलाही येते. यंदा तशीच ती आली आहे. असं सांगतात की, या दिवसापासून दिवस तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्री लहान होत जातात. शेवटी रथसप्तमीच्या दिवशी दिवस व रात्र सारखे होतात. पुढे दिवस मोठा मोठा होतच जातो. उन्हाळा वाढतो. थंडीचे दिवस मार्गशीर्ष म्हणजेच डिसेंबर महिन्यापासून सुरू होतात. कडाक्याच्या थंडीत गोठल्यासारखे होते, तर सुखद थंडीत मन उत्साहित व आनंदीत होते. फळझाडांना मोहोर येऊन पुढे त्यांना फळांचा बहर येणार आहे हे सूचित होते. फुलझाडांना मात्र जास्त थंडी असली की कळ्या कमी येतात. आपल्यात संक्रांतीच्या काळाला ‘पर्वकाळ’ मानतात. म्हणजेच पवित्र काळ! भाविक लोक, साधुसंत मंगलस्नानासाठी पवित्र नद्यांच्या सान्निध्यात जातात व मंगलस्नान करतात. प्रयागसारख्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. तिथल्या पवित्र भूमीला साधुसंतांचा पदस्पर्श होतो.
माथानी साल्ढाना भाजपमध्ये
माजी पर्यटनमंत्री तथा रापोणकरांचो एकवोट संघटनेचे नेते माथानी साल्ढाना यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काल भाजप प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे गोव्यात संघटना बळकट होईल, असा विश्वास प्रदेश भाजप अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केला. साल्ढाना कुठ्ठाळीतून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
२००२पासून साल्ढाना मनाने भाजपबरोबरच होते काल ते शरीरानेही भाजपवासी झाले. अत्यंत स्वच्छ चारित्र्य असलेले ते नेते असून आतापर्यंत ते कोणत्याही आमिषाला बळी न पडता जनतेचे काम करीत आहेत. त्यामुळे साल्ढाना यांना जनमानसात वेगळेच स्थान असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.
आठ मतदारसंघांत कॉंग्रेस उमेदवार निश्चित
एकाहून जास्त इच्छुकांच्या मतदारसंघांबाबत पेच
प्रदेश कॉंग्रेस निवडणूक समितीने जी संभाव्य उमेदवारांची यादी पाठविली होती, त्यापैकी केवळ एकाच उमेदवाराचे नाव विचाराधीन होते अशा ८ मतदारसंघांचे उमेदवार काल दिल्लीत उमेदवार छाननी समितीने निश्चित केले. मात्र एकापेक्षा जास्त उमेदवार असलेल्या काही मतदारसंघांत नावे निश्चित करण्याबाबत पेच असून त्यासाठी पुढील बैठक दि. १७ किंवा दि. १८ रोजी घेण्यात येणार आहे.
दरम्यान, फातोर्डा व सांताक्रुझ मतदारसंघांत उमेदवार निश्चित करण्याबाबत पेच निर्माण झाल्याचे कळते.
फातोर्ड्यात गेली पाच वर्षे कॉंग्रेसचे विजय सरदेसाई काम करीत आहेत. मात्र मुस्लिमांना प्रतिनिधीत्व देण्यासाठी तेथून एम. के. शेख यांच्या नावाचा प्रस्ताव कॉंग्रेसचे केंद्रीय सचिव लुइझिन फालेरो यांनी ठेवला आहे तर काही कॉंग्रेस नेत्यांनी युवक कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्यासाठी प्रयत्न जारी ठेवले आहेत.
निवडणूक आयोगाला कमी लेखायचा प्रयत्न नको
मुख्य निवडणूक आयुक्तांची पंतप्रधानांकडे तक्रार
कायदा मंत्री सलमान खुर्शिद यांच्या विधानाने नाराज बनलेल्या मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी काल पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे तक्रार केली आहे.
एका दूरचित्रवाणीसाठी दिलेल्या मुलाखतीत खुर्शिद यांना, सीबीआयवरील सरकारच्या नियंत्रणासंदर्भात प्रश्न विचारल्यावर कायदा मंत्र्यांनी म्हटले होते की, प्रत्येक यंत्रणा ही नियंत्रणाखालीच असते.
तोरसे येथील अपघातात मोटरसायकलस्वार ठार
तोरसे पेडणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वर टाटाटी पर व मोटरसायकल यांच्यात विचित्र अपघात होऊन बांदा येथील अमित शेटकर (३१) ठार झाला. ही घटना १३ रोजी सकाळी ८.३० वा. घडली.
खासगी बस मालक संघटना ढवळीकर बंधूंच्या विरोधात
अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेने येत्या विधानसभा निवडणुकीत ढवळीकर बंधूंचा पराभव करण्यासाठी कंबर कसली असून प्रियोळ मतदारसंघातून गोविंद गावडे यांना तर मडकईत रवी नाईक यांचा पुत्र रितेश नाईक यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
संकेतस्थळांवरील कारवाईस मंजुरी
देशाच्या एकात्मतेस धक्का पोचविणारा मजकूर प्रसारित केल्याबद्दल २१ संकेतस्थळांविरुद्ध कारवाईस काल केंद्र सरकारने मान्यता दर्शविली. या संकेतस्थळांत फेसबूक, गुगल, याहू, मायक्रोसॉफ्ट यांचा समावेश आहे.
विदेशस्थित संकेतस्थळ कंपन्यांना समन्स पाठविण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने काल परराष्ट्र मंत्रालयाला दिले.
रेल्वे भाडेवाढीचे संकेत
गेल्या आठ वर्षांपासून वाढ न करण्यात आलेल्या रेल्वेच्या तिकीट दरात यंदा वाढ करण्याचे संकेत काल केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी दिले.
म्हापशात एकाची आत्महत्या
शेळपे-धुळेर म्हापसा येथील प्रदीप विठ्ठल सावंत (४७) या इसमाने काल दुपारी ३.३० वाजता आपल्या राहत्या घराच्या छपराला नायलॉनच्या दोरीने वाशाला गळफास लावून आत्महत्या केली.
आशय परिपक्व करून मगच कागदावर उतरवा : पांचाळे
गझल सागर प्रतिष्ठान, मुंबई आणि गोवा कला अकादमी आयोजित सहावे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन आज व उद्या पणजीत कला अकादमीत होत आहे. त्यानिमित्ताने गझलनवाज भीमराव पांचाळे यांची विशेष मुलाखत
० मराठी गजल लोकप्रिय व्हावी हा ध्यास घेऊन आजवर आपण निष्ठेने वावरलात. आजवरच्या या सर्व कार्यातून काय हाती लागले असे वाटते?
०० गेल्या चाळीस वर्षांचा हा प्रवास... सुरवातीला मी फक्त एक गायक म्हणून सुरूवात केली. गझल गायन करणे हा माझ्या जिवाभावाचा छंद होता, एक पॅशन होते. पण त्या काळी गझलचे रसिक तुलनेने कमी होते. जे होते ते खरे होते, परंतु दाद देण्याची आजच्यासारखी पद्धत तेव्हा मराठीत रुजली नव्हती. सुरेश भट यांनी मराठी गझल वाढण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मराठी गझल वाढण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार मी तेव्हा करू लागलो. नाव, प्रसिद्धी, पैसा हे सगळे आपल्या गझल गायकीतून आपल्याला मिळेल, परंतु आपल्याकडून गझलला काय मिळणार या विचाराने मला अंतर्मुख केले. हाफ पँट घालण्याच्या वयात, चौदाव्या - पंधराव्या वर्षी मी अमरावतीत सुरेश भटांचे गझलगायन ऐकले. ऊर्दू गझल ऐकण्याचा मुळात मला शौक होताच. मुशायरे, मैफली ऐकत होतो. जे ऐकायचो ते आवडत होते, पण मराठी गझलचे गारूड जे माझ्या मनावर झाले ते सुरेश भटांमुळे. मराठी गझलसाठी आपला वाटा काय या विचाराने मला चिंतन करायला लावले. मग मी ज्या गावी मैफलीला जाईन, तेथे एक दिवस मुक्काम वाढवणे, चांगल्या कवींना, गझलकारांना जवळ आणणे, असे माझ्या परीने सुरू केले. त्यातले बहुतेक जण कविता करायचे, पण गझलचे तंत्र त्यांना माहीत नसायचे. म्हणून मग मी गझलच्या कार्यशाळा घ्यायला सुरूवात केली. त्या काळी काही प्रथितयश गझलकार होते, पण नव्या कवींना उमेद देणे तर दूरच, उलट ते त्यांना नामोहरम करीत की गझल लिहिणे सोपे नाही. पण मला वाटते की गालिबपासून सुरेश भट आणि आजच्या इलाही जमादारांपर्यंत सर्वांनी गझलचे तंत्र आत्मसात केले, तसे ते प्रत्येकाने शिकायला काय हरकत आहे?
या सम हा संगीत युगंधर
- सुनील तांबे
उर्दू गझलेच्या दुनियेत अद्वितीय स्थान निर्माण करणारे गझल गायक मेहदी हसन यांचं नाव घेतलं जात असेल, तर मराठी गझल क्षेत्रात गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या शिवाय दुसरं नाव नाही. मराठी गझलसाठी भीमराव पांचाळे हे पर्यायवाची असच नाव आहे. गोड, मुलायम, भावनांच्या विविधांगी प्रवाहांनी ओतप्रोत भरलेला, नित्य नवा, पहाटवार्यासारखा ताजा, दमदार असा अस्सल बावनकशी, अमर्याद आलापांचं लेणं लेवून विजेसारखा लखलखणारा, खणखणणारा, जादूई, बुलंद असा आवाज म्हणजे गझलनवाज भीमराव पांचाळे! भीमरावांनी विकसित केलेली स्वत:ची गायन शैली, शास्त्रीय संगीताची कसून साधना केल्यानं अवघडातल्या अवघड रागांवरची हुकुमत, एक एक अक्षर वेगळं काढावं इतके स्पष्ट आणि शुद्ध शब्दोच्चार आणि पहिल्याच सुरात रसिकांना जिंकण्याच्या त्यांच्या क्षमतेनं ते मराठी गझल गायनाचे अनभिषिक्त सम्राट ठरले आहेत.
गझल : मला भावलेली - उमगलेली
- राधा भावे
गझलचे शेर... त्यातल्या ओळी... ओळीतले शब्द, शब्दांतला आशय... कधी चाबकाच्या फटकार्यासारखा बसणारा, कधी खंजिरासारखा काळजात घुसणारा, कधी जणू फुलांचा पाऊस, तर कधी थुई - थुई करणारा कारंजा!! कोणाही सजग, संवेदनशील रसिक व्यक्तीच्या मनाला भिडणारा हा काव्यप्रकार... एक लोभस अभिव्यक्ती... त्यामुळे कधीही चांगली गझल, सुंदर शेर वाचनात आले की छान वाटायचं. काही क्षण मन तिथंच रेंगाळायचं... परंतु आपणही असं काही लिहावं किंवा लिहू शकू असं कधी वाटलं नव्हतं.
गझल सागर प्रतिष्ठानची वाटचाल
- जनार्दन केशव म्हात्रे
भीमराव पांचाळे हे नाव आता मराठी गझल रसिकांना अपरिचित राहिलेले नाही. भीमरावांनी आपल्या गायकीद्वारे मराठी गझल घराघरांत पोहोचविली आहे. त्यासोबतच मराठी गझल खेडोपाडी पोहोचविण्यासाठी व ती जनमानसात रुजविण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट व त्याकरिता राबविलेले उपक्रम हे देखील मोलाचे आहेत.
मै अकेला ही चला था जानिबें मंजिल मगर
लोग साथ आते गये और कारवॉं बनता गया
भीमरावांनी मराठी गझल जनमानसात रुजविण्यासाठी गझल सागर प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली. गझल सागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गझल मुशायरे, गझल कार्यशाळा, गझल गायन मैफली व गझल विषयक अनेक उपक्रम महाराष्ट्रभर तसेच महाराष्ट्राबाहेरही सातत्याने आयोजित केले आहेत. मराठी गझल या काव्यविधेसाठी आजवर अखिल भारतीय स्तरावरची पाच संमेलने गझल सागर प्रतिष्ठानने सुनियोजितपणे पार पाडली आहेत. सहावे संमेलन आज गोव्यात भरते आहे. गझल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या अनेक मान्यवरांचे सत्कार केले आहेत. गझल अभ्यासाच्या दृष्टीने गझल सागर हे नियतकालिक त्यांनी काढले. या उपक्रमांमध्ये सातत्य ठेवून गझल सागर प्रतिष्ठानने मराठी गझल आज घरोघरी पोहोचविली आहे. गझल सागर प्रतिष्ठानच्या या सार्या खटाटोपांसाठी भीमरावांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्तीसुद्धा घेतली आहे. त्यांनी आपले सर्वआय्ाुष्य गझलसाठीच अर्पण केले आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.
नरेंचि केला हीन किती नर
माणूस शिकला सवरला, जगाच्या अधिकाधिक संपर्कात आला की त्याला सुजाण, सुसंस्कृत गणले जाते, परंतु या तथाकथित सुसंस्कृत माणसांकडूनच जेव्हा जारवांसारख्या आदिवासींचे शोषण होते, तेव्हा माणसाच्या सुसंस्कृततेविषयी सोडाच, त्याच्या माणूसपणाविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिल्यावाचून राहात नाही. अंदमानमधील या पुरातन जमातीतील निसर्गतः दिगंबरावस्थेतील स्त्रियांना पर्यटकांपुढे नंगानाच घालायला लावण्याचे जे प्रकरण उघडकीस आले आहे ते समस्त मनुष्यजातीलाच लांच्छनास्पद आहे. सदर व्हिडिओ नवा की जुना किंवा पर्यटकांपुढे त्या आदिवासी स्त्रियांना नाचायला लावणारे पोलीस होते की पर्यटक हे प्रश्नच गैर ठरतात. जो प्रकार या चित्रफीतीमध्ये दिसतो ती केवळ विकृतीच नाही, तर आधीच अस्तंगत होत चाललेल्या एका आदिम मनुष्यजातीच्या विनाशाची नांदी आहे. त्यामुळे घटनेचे गांभीर्य कितीतरी पटींनी वाढते. एखाद्या प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना पाहावे, तसे देशी - विदेशी पर्यटक अंदमानमधील जारवांना पाहायला लोटतात.
खर्चाची मर्यादा ओलांडणारे उमेदवार ताबडतोब अपात्र
निवडणूक आयोगाकडून सूचना
गोवा विधानसभा निवडणुकीतील खर्चाच्या बाबतीत निवडणूक आयोगाने गंभीर धोरण अवलंबिले असून एखाद्या उमेदवाराने खर्चाविषयी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्यास त्याच क्षणी उमेदवाराला अपात्र ठरविण्याचा अधिकार निरीक्षकांना दिला आहे, अशी माहिती संयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त नारायण नावती यांनी काल पत्रकारांना दिली.
खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आतापर्यंत २० निरीक्षक गोव्यात दाखल झाले असून आणखी किमान १४ निरीक्षक येणार आहेत.
पुडुचेरी, तामीळनाडू व पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाने मर्यादेपेक्षा अधिक खर्च करणार्या उमेदवारांविरुद्ध कारवाई केली आहे. त्यामुळे गोव्यातही तेच धोरण अवलंबविण्याचे ठरविले असून आयोगाने तसे स्पष्ट आदेश दिल्याचे नावती यांनी सांगितले.
हरमल येथे काजू बागायतीस आग लागून एक कोटीची हानी
हरमल येथील कोरखण-चणईवाडा-मधलावाडा व खालचावाडा भागातील डोंगराळ पठारावर काल गुरुवार १२ रोजी सकाळी १०.३० च्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत पालये व केरी पठारावरील डोंगराळ भागातील काजू व आंबा बागायती आगीच्या भक्षस्थानी पडल्या. या आगीच्या घटनेत सुमारे एक कोटीपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
दरम्यान, आग इतकी भयंकर होती की ती आटोक्यात आणताना अग्नीशामक दलास अथक परिश्रम करावे लागले. आगीचे तांडव नृत्य रोखण्यासाठी बागायतदारांबरोबर स्थानिक ग्रामस्थ हरमल पंचक्रोशी हायस्कूल व अवरलेडी ऑफ माऊण्ट कार्मेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही अथक परिश्रम घेतले. आठ तास आगीचे तांडव नृत्य चालू होते.
श्रीपाद यांच्या उमेदवारीबाबत चार-पाच दिवसांत निर्णय
पर्वरी मतदारसंघातून भाजपची उमेदवारी उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांना देणार की नाही, यावर पुढील चार-पाच दिवसात राष्ट्रीय पातळीवर निर्णय होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारीच्या बाबतीत झुलवत न ठेवता स्पष्ट ते सांगा, असे नाईक यांनी राष्ट्रीय नेतृत्वाला सांगितल्याचे कळते. पर्वरी मतदारसंघाची उमेदवारी नाईक यांनाच देण्यात यावी म्हणून त्यांच्या समर्थकांनी भाजप नेतृत्वावर दबाव आणला आहे. वरील प्रकारामुळे पक्षात खळबळ निर्माण झाली असून नाईक यांनी राज्याच्या राजकारणात येऊ नये, असे वाटणार्या काही स्थानिक नेत्यांनी नुकतीच मुंबईत जाऊन राष्ट्रीय नेत्यांशी चर्चा केल्याचे कळते.
दहावीच्या मुलांसाठी आणखी एक परीक्षा
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दुसर्या सत्रात होणार्या पूर्वतयारी परीक्षेपूर्वी (प्रिलिम्स) आणखी एक परीक्षा घेणाच्या निर्णयावर काल शालांत मंडळाने शिक्कामोर्तब केले.
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर खूप उशिरा या परीक्षेचा शालांत मंडळाने निर्णय घेतल्याचा दावा करून काही विद्यार्थी व मुख्याध्यापकानी या परीक्षेला विरोध केला होता व ही अतिरिक्त परीक्षा घेऊ नये अशी मागणी करणारी निवेदने गोवा शालांत मंडळाकडे केली होती.
सरकारी कार्निव्हल व शिमगा यंदा होणे कठीण
गोवा विधानसभेसाठीची आचारसंहिता लागू झालेली असल्याने यंदा सरकारला राज्यात कार्निव्हल व शिमगोत्सवाचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोग कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानात लष्करी उठावाचे सावट
राष्ट्राध्यक्ष झरदारी दुबईला निसटले
लष्करप्रमुखांनी घेतली खास बैठक
पाकिस्तानात सरकार व लष्करात संबंध ताणले गेल्यानंतर लष्करी उठावाची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच काल अचानकपणे पाकिस्तानच राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी दुबईला निघून गेले.
६ व्या अ. भा. मराठी गझल संमेलनाची जय्यत तयारी
देशाच्या विविध भागांतील ३५० गझलकारांचा सहभाग
पणजीत गोवा कला अकादमी आणि गझलसागर प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या पणजीत कला अकादमी संकुलात भरणार्या सहाव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून सुप्रसिद्ध अभिनेत्री व गायिका आशालता, ऊर्दूचे प्रख्यात शायर जनाब नसीम रिफअत ग्वालियरी, सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक राजदत्त आदी पाहुणे गोव्यात आज व उद्या दाखल होत आहेत. या संमेलनामध्ये गोव्याच्या रसिकजनांनी सहभागी होऊन उत्तमोत्तम गझल मुशायरे आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी काल पत्रकार परिषदेत केले. यावेळी कला अकादमीचे सदस्य सचिव पांडुरंग फळदेसाई हेही उपस्थित होते.
त्यांच्या व्यावसायिक नैपुण्याचा बळी का?
- संजीव कामत, कांदोळी गोवा.
सध्या गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. जिंदाल यांच्या राजीनाम्यानंतर वृत्तपत्रांतून तसेच स्थानिक चित्रवाहिनीवर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतात. त्यांचे आरोग्यमंत्र्याबरोबरचे संबंध बिघडल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते, पण दोघांनीही त्याचा इन्कार केला आहे. विरोधी पक्षनेते श्री मनोहर पर्रीकर यांनी तर डॉ. जिंदाल याना ‘उत्कृष्ट न्यूरोसर्जन’ असल्याचे प्रमाणपत्र देताना थेट त्यांच्या प्रशासकीय क्षमतेबद्दल शंक व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणतात की, डॉ. जिंदाल हे आरोग्यमंत्र्यांच्या ताटाखालचे मांजर बनल्यामुळे त्यांनी गोवा मेडिकल कॉलेजची अक्षरशः वाट लावली आहे. या उलटसुलट प्रतिक्रिया वाचताना व ऐकताना मनात काही प्रश्न निर्माण झाले, त्यामुळे हा लेखप्रपंच.
अगतिक झरदारी
लष्कर, आयएसआय, सर्वोच्च न्यायालय आणि महागाईत होरपळलेली जनता यांनी चारी बाजूंनी पुरते घेरले गेलेले पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारी वैयक्तिक कारणाचे निमित्त साधून काल दुबईला रवाना झाले. पाकिस्तानचा आजवरचा इतिहास लक्षात घेता लष्करी उठावाच्या भीतीने झरदारींना ग्रासलेले असणे स्वाभाविक आहे. अर्थात, स्वतःवर ही वेळ त्यांनीच आणलेली आहे आणि तिला गेल्या किमान सहा महिन्यांतील घटनाक्रमाची पार्श्वभूमी आहे. गेल्या मे महिन्यात अमेरिकेने थेट पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनचा खातमा केल्यानंतरच्या सार्या घडामोडी जर पाहिल्या, तर राष्ट्राध्यक्ष झरदारी, पंतप्रधान गिलानी आणि त्यांच्या लोकनियुक्त सरकारची एकंदर लोकप्रियता घसरणीलाच लागलेली दिसते. लादेनच्या खातम्यानंतर आपले लष्कर आणि आयएसआयकडून बंड होऊ शकते या भीतीने झरदारींनी आपले राजदूत हुसेन हक्कानी यांच्या मार्फत अमेरिकेला जे साकडे घातले, ते या प्रकरणातील मध्यस्थ असलेला व्यापारी मन्सूर इजाझने उघडकीस आणल्याने त्यांच्या पुरते अंगलट आले. त्या ‘मेमोगेट’ ची चौकशी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने सध्याच्या लोकनियुक्त सरकारवर अत्यंत कडक ताशेरे ओढले.
कुटुंबातील दोन किंवा अधिकांना उमेदवारी दिल्यास काय बिघडले?
विश्वजित राणे यांचा सवाल
सत्तरी तालुक्यातील चार मतदारसंघात आपल्या कुटुंबातील सदस्यांना निवडून आणणे सहज शक्य आहे. परंतु सध्या तरी वडील प्रतापसिंह व आपण मिळून दोघांनीच राजकारण करावे, असा कुटुंबाचा निर्णय असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल एका प्रश्नावर सांगितले.
कुटुंबातील दोन किंवा अधिक सदस्यांना निवडणुकीची उमेदवारी देण्यास आपला मुळीच विरोध नाही. चर्चिल कन्या वालांका आलेमांव हुशार व कार्यक्षम असून त्यांनी उमेदवारीसाठी दावा केल्यास काय बिघडते ? असा प्रश्न करून लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे, परंतु त्यासाठी जनतेसाठी काम करण्याची तयारी असली पाहिजे. काहीजण निवडणुकीच्या वेळीच पुढे येतात. त्याला अर्थ नसतो, असे ते म्हणाले.
पोलिसांशी गैरवर्तन करणार्यापर्यटकांना लोकांकडून चोप
पणजी येथे वाहतूक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पेडणेकर यांनी स्कॉर्पियो गाडी अडवली असता त्यांना मारहाण करणार्या बेंगलोर येथील चार पर्यटकांना लोकांनी चोप दिल्याने गोमेकॉत दाखल करावे लागले. पैकी दोघेजण अजूनही गोमेकॉत उपचार घेत असून दोघांना पणजी पोलिसांनी अटक केली आहे.
काल सकाळी जुने गोवे येथे ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावरून क्रमांकपट्टी नसलेली एक पांढर्या रंगाची स्कॉर्पियो गाडी धावताना दिसली. पोलिसांनी चालकाला गाडी थांबण्यास सांगितली असता तो वेगाने पणजीच्या दिशेने गेला. त्यामुळे पोलिसांनी पणजी वाहतूक पोलिसांना फोन करून काळ्या काचा असलेल्या व क्रमांकपट्टी नसलेल्या सदर गाडीसंबंधी सतर्क केले.
श्रीपादना तिकीट नाकारल्यास कार्यकर्ते प्रचारापासून दूर
भाजपा नेतृत्वावरील दबाव वाढला
उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांना ३ मार्च रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीत पर्वरी मतदारसंघाची उमेदवारी नाकारल्यास त्यांच्या अनेक समर्थकांनी भाजपपासून अलिप्त राहण्याचा विचार चालविलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार परवा रात्री पर्वरी भागातील काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक होऊन नाईक यांनाच पर्वरीतून उमेदवारी मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यामुळे येणार्या काळात हे प्रकरण रंगण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून नाईक यांनी पर्वरी भागात काम सुरू केले आहे. परंतु सध्याच्या राजकीय वातावरणात त्यांना उमेदवारी देणार की नाही याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
विश्वजित कृष्णराव राणे भाजपमध्ये
सालेली येथील विश्वजित कृष्णराव राणे यांनी काल आपल्या सुमारे १०० समर्थकांसह भाजपात रितसर प्रवेश केला. काल येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी आपला प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज पक्षाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे सुपूर्द केला.
आरोग्य मंत्र्यांच्या तक्रारीनंतर बंडू देसाई यांच्या घरावर दोनदा छापा
माजी पंचायत मंत्री बंडू देसाई यांच्या घरावर काल निवडणूक अधिकार्यांचा व वाळपई पोलिसांचा असे दोन छापे पडले.
आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी जिल्हाधिकार्यांकडे देसाई हे बनावट नियुक्तीपत्रांचे वितरण करीत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी निवडणूक अधिकारी राजू गावस यांना तपास करण्याचा आदेश दिला होता.
कमरेवरून ट्रकचे चाक गेल्याने ठार
ट्रकचालकास जमावाकडून मारहाण
तिळारळ केपे येथे काल सकाळी ११.३० वा. झालेल्या टीपर - मोटरसायकल अपघातात मोटरसायकलच्या मागे बसलेला सावंतवाडा-काकोडा येथील ४४ वर्षीय टीपू सुलतान मुल्ला ठार झाला तर चालक प्रोद गजानन फडते हा जखमी झाला आहे.
अल्पसंख्यकांचे आरक्षण स्थगित
निवडणूक आयोगाचा आदेश
२७ टक्के ओबीसी आरक्षणातून ४.५ टक्के कोटा अल्पसंख्यकांना राखीव ठेवण्याचा निर्णय विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांत स्थगित ठेवण्याचे निर्देश काल निवडणूक आयोगाने सरकारला दिले. या आरक्षणाबाबत आयोगाकडे तक्रारी आल्या होत्या.
निवडणुकीत होणार ‘पोल मॉनिटरिंग’
निवडणूक यंत्रणेच्या तयारीला वेग
येत्या ३ मार्च रोजी राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी तयारी जोरात सुरू असून मतदान यंत्रांची तपासणी, निवडणूक केंद्रांची दुरुस्ती, निवडणुकीसाठी लागणार्या लोकांचे प्रशिक्षण आदी कामे हाती घेण्याची तयारी सुरू झाली असल्याचे उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी मिहिर वर्धन यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले.
अंदमानच्या जारवा जमातीचे पोलिसांकडून शोषण
पर्यटकांसमोर अर्धनग्न स्थितीत नाचायला लावण्याचा प्रकार
अंदमान निकोबार बेटांवरील जारवा या आदिवासी जमातीतील अर्धनग्न महिलांना तेथील पोलिसांकडून पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचायला लावण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ ‘गार्डियन’ या नामांकित वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आल्याने खळबळ माजली असून केंद्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश अंदमान व निकोबार प्रशासनाला दिले आहेत. हा व्हिडिओ जुना असल्याचे पोलिसांचे म्हणणे असले, तरी पर्यटकांकडून पैसे घेऊन जारवा स्त्रियांना त्यांच्यापुढे अर्धनग्न स्थितीत नाचायला लावण्याचा हा प्रकार करणार्या संबंधितांचा शोध घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
नव्या मतदारांना २५ रोजी ओळखपत्रे देणार
१ जानेवारी २०१२ रोजी ज्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली आहेत व मतदार म्हणून स्वतःची नोंदणी केलेली आहे त्यांना या विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार असल्याचे निवडणूक अधिकारी दुर्गाप्रसाद यांनी काल सांगितले. नवा मतदार म्हणून नोंदणी करण्याचा १२ जानेवारी हा शेवटचा दिवस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १८ व १९ या वयोगटातील ज्या मतदारांनी स्वतःची नोंदणी केलेली आहे त्यांना राष्ट्रीय मतदान दिनी म्हणजेच २५ जानेवारी रोजी मतदार फोटो ओळखपत्रे देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कवितेच्या चोचीत आयुष्याचा घास देणारे बोडके
- शंभू भाऊ बांदेकर
रविवार दि. ८ जानेवारी रोजी पहाटे कविमित्र अवधुत कुडतरकर याचा फोन आला. तो ओक्साबोक्शी रडतच होता. मी घाबरलो, विचारले, काय झाले? तो रडतच कसाबसा म्हणाला, नरेंद्र गेला... माझ्यावर आकाश कोसळल्यासारखे झाले. माझ्यावर ‘परममित्र’ नावाची कविता लिहिणारा माझा परममित्र नरेंद्र बोडके गेली तीन वर्षे मूत्रपिंड विकाराने आजारी होता. ‘आता माझे काही खरे नाही’ असे म्हणत म्हणत दुर्दम्य आत्मविश्वासाने पुनश्च हरिओम् करीत जगत होता.
म्हणे शरम वाटते...
कुपोषणाची समस्या देशात गंभीर स्वरूप धारण करून आहे आणि ती राष्ट्रीय शरमेची बाब आहे असे वक्तव्य पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकतेच केले. आजच्या बेशरम राजकारणाच्या जमान्यात पंतप्रधानांना शरम वाटणे ही चांगली बाब आहे, परंतु देशात ही परिस्थिती ओढवण्यास त्यांचाही वाटा आहे हे त्यांनी नाकबुल करू नये. कुपोषणासारख्या समस्या या असंतुलित विकासाची फळे असतात आणि एकीकडे देशाच्या आर्थिक विकासाचे गोडवे गाणार्या नेतेमंडळींनी तळागाळातल्या वास्तवाकडे सातत्याने केलेली डोळझाकच अशा समस्या उग्र रूप धारण करण्यास कारणीभूत असते. एका स्वयंसेवी संस्थेने शंभर जिल्ह्यांत केलेल्या सर्वेक्षणात ४२ टक्के मुले कुपोषित असल्याचे आढळले. यावरून ही समस्या किती गंभीर आहे आणि तरीही आजवर सरकारपासून प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांच्या नजरेच्या कक्षेबाहेर ती कशी राहिली हे दिसून येते. आपली प्राधान्ये अशा मूलभूत गोष्टींना नसतात, उलट क्षुल्लक भावनिक मुद्द्यांचाच आपण नेहमी काथ्थ्याकूट करीत असतो. विविध पक्षांकडून हाताळले जाणारे विषय आणि प्रत्यक्षात देशापुढे उभी असलेली आव्हाने यांचा ताळमेळ जुळताना क्वचितच दिसतो.
मान्यता टिकविण्याचे ‘मगो’ समोर आव्हान
मगोची मान्यता टिकविण्यासाठी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मगोला कमीत कमी तीन आमदार निवडून आणावे लागतील किंवा एकूण मतदानापैकी ८ टक्के मते मिळवावी लागतील. यामुळे मगोसमोर गंभीर पेच निर्माण झाला आहे.
मगोने कोणत्याही पक्षाशी युती केली तरी या पक्षाच्या वाट्याला किती जागा येऊ शकतील, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रियोळ व मडकई हे दोन मतदारसंघ वगळल्यास अन्य कोणत्याही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मते मिळविण्याची मगोत क्षमता नाही. त्यामुळे या निवडणुकीत सिंह हे आपले चिन्ह सांभाळण्यासाठी मगोला अधिकाधिक मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागेल.
गोवा विकास पक्षाची युगोडेपाशी युती
आणखीही पक्ष सामील होतील : मिकी
गोव्याची परंपरा, संस्कृती व गोमंतकीय वारशाचे जनत करण्यात कॉंग्रेस सरकार व राष्ट्रीय पक्षाना अपयश आले असून भ्रष्टाचाराचे लाचलुचपतीचे डोंगर साचलेले आहेत. त्यातून गोमंतकीयांची मुक्तता करण्यासाठी गोव्याच्या विकासासाठी गोवा विकास पार्टी व युगोडेपा पक्षाने या विधानसभा निवडणुकीत युती केलेली आहे. आणखीही स्थानिक पक्ष त्यात सामील होतील. या निवडणुकीत गोव्याचे सरकार स्थानिक पक्षाचे असेल असे गोवा विकास पार्टीचे सर्वेसर्वा मिकी पाशेको व युगोडेपाचे अध्यक्ष डॉ. जोर्सन फर्नांडिस, सरचिटणीस आनाक्लेत व्हिएगश यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषेदत सांगितले.
यावेळी विकास पार्टीच्या अध्यक्ष व्हियोना पाशेको, सरचिटणीस लिंडन मोंतेरो तसेच युगोडेपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गोव्याचे फार मोठे नुकसान या कॉंग्रेस पक्षाने केले. स्थानिक राज्याचे हित स्थानिक पक्षच सांभाळू शकतात. त्यासाठी दोन्ही पक्षांनी युती केली आहे. आणखी स्थानिक पक्ष व बिगरगोमंतकीय संस्था यात सामील होणार असल्याचे मिकी पाशेको यांनी सांगितले.
कॉंग्रेसविरोधात मतदान करण्याचे ऍड. भेंब्रे व पुंडलिक नाईक यांचे आवाहन
भाषा सुरक्षा मंचाच्या जागृतीसाठी बैठका
शैक्षणिक माध्यमासंदर्भात कॉंग्रेस सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे येत्या निवडणुकीत त्या पक्षाविरोधी प्रचार करण्याची घोषणा करणार्या भारतीय भाषा सुरक्षा मंचाने त्यासाठी बैठका घेण्यास सुरुवात केली असून काणकोण येथील बैठकीत मंचाचे पदाधिकारी ऍड. उदय भेंब्रे यांनी आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला पराभूत करण्याचे आवाहन केले.
भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी यापुढे जो पक्ष कार्यरत राहील त्यालाच आगामी निवडणुकीत प्राधान्य देऊन कॉंग्रेसला पराभूत करून भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे सर्व शक्तीनीशी भाषा सुरक्षामंचाने उभे राहावे व राज्यात बदल घडवून आणावा, असे ऍड. भेंब्रे म्हणाले. भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या शिशुवाटिका सभागृहात कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
दहा लाखांची बनावट दारू जप्त
अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली काल अबकारी खात्याने थिवी-म्हापसा येथे एमएच ०४ जे ३१७४ क्रमांकाच्या वाहनातून ‘ओल्ड बील’ व्हिस्कीचे ८०० बॉक्स जप्त केले.
आचारसंहिता भंग प्रकरणी कारवाई
हळदोणेचे आमदार दयानंद नार्वेकर व कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आयोगाने म्हापशाचे उपजिल्हाधिकारी व महिला आयोगाला २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. संयुक्त निवडणूक आयुक्त नारायण नावती यांनी ही माहिती दिली.
निवडणुकांदरम्यान दौरा करणार पण प्रचार नाही
टीम अण्णाचा निर्णय
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांवेळी कुठल्याच पक्षाविरुद्ध प्रचार करणार नसल्याचे टीम अण्णाने काल जाहीर केले.
‘उमेदवारी हवी असेल तर आधी अर्ज करा’
होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांना जर कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी हवी असेल तर त्यासाठी त्यांनी अर्ज करावेत अशी प्रतिक्रिया काल सभापती प्रतापसिंह राणे यांनी दिली. मात्र, आपण सभापती असल्याचे सांगून त्यावर अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. त्यांनी अर्ज केल्यास पक्षश्रेष्ठी त्यांच्या अर्जांवर सकारात्मकपणे विचार करू शकतील, असे ते म्हणाले.
शॅकमालकासह चार जणांनाखूनप्रकरणी अटक
फातराडे वार्का येथील केप्रिकॉन बार ऍण्ड रेस्टॉरंट या शॅकमध्ये बुधवारी पहाटे ‘जी फोर’ सुरक्षा कंपनीचा सुरक्षारक्षक राजीवकुमार (२५) याचा शॅक मालक व त्यातील चार कामगारांनी खून केल्याचा आरोप असून कोलवा पोलिसांनी शॅक मालक लुसियानो दुमिंग फुर्तादोसहीत चार कामगारांना अटक केली व मारहाणीसाठी वापरलेले सामान जप्त केले.
लोक जनशक्ती पार्टीचा गोव्यात प्रवेश
विधानसभा निवडणुका लढवणार
तृणमूल कॉंग्रेसच्या पाठोपाठ लोक जनशक्ती पार्टीनेही गोव्यात प्रवेश केला असून ३ मार्च रोजी होणार्या गोवा विधानसभा निवडणुकीत किमान २५ मतदारसंघात निवडणूक लढविण्याची माहिती पक्षाचे गोवा निरीक्षक मुकेश गुज्जर व लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्रनाथ उसगावकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
मायावती आणि हत्तींचे पुतळे झाकण्यास एक कोटी खर्च
निवडणूक आयोगाच्या फर्मानानुसार कार्यवाही सुरू
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी सरकारी पैशातून उभारलेले स्वतःचे तसेच बहुजन समाज पक्षाचे पुतळे निवडणूक काळात झाकण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असले, तरी केवळ हे पुतळे झाकण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च येणार आहे.
मायावती देशातील सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्री
गोव्याचे ५५ टक्के आमदार कोट्यधीश
बहुजन समाज पक्षाच्या नेत्या व उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती या देशातील सध्याच्या सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांची एकूण संपत्ती देशातील इतर प्रमुख १० मुख्यमंत्र्यांच्या एकूण संपत्तीहूनही जास्त आहे. मायावती यांनी आपली संपत्ती ८७ कोटी २७ लाख रुपये असल्याचे जाहीर केले असून आपल्याला ही सर्व संपत्ती आपल्या अनुयायांनी दान केलेली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पैसा ओतल्याशिवाय निवडणुका होतील?
- दिलीप बोरकर
आगामी निवडणूक काळात गोवा, पंजाब आणि उत्तरप्रदेश या राज्यांत पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर होईल अशी चिंता मुख्य निवडणूक आयुक्त एस्. वाय्. कुरेशी यांनी व्यक्त केली आहे. पैशांच्या जोरावर मतें विकत घेतली जाऊ नयेत आणि लोकशाहीत प्रत्येक मतदाराने आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे आणि योग्य व आदर्श उमेदवाराचीच निवड करून विधानसभेसारख्या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात आपले प्रतिनिधित्व करावे अशी भावना बहुतेक मुख्य निवडणूक आयुक्तांची असावी.
मुन्नाभाई एमबीबीएस!
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून झालेली पेपरफोडीची घटना अशा प्रकारच्या परीक्षांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करते आहे. पेपरफोडीचे प्रकार अशा देशव्यापी परीक्षांमध्ये नवे नसले, तरी यावेळी त्यासाठी घेतली गेलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत मात्र नवी आहे. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवू इच्छिणार्यांकडून तीस ते चाळीस लाख रुपये घेऊन त्यांना परीक्षा सुरू असताना उत्तरे सांगण्याचा हा एकंदर प्रकार धक्कादायक तर आहेच, परंतु पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्या देशभरातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. म्हणूनच पकडल्या गेलेल्या या टोळीवर अत्यंत कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. या टोळीने पेपरफोडीसाठी वापरलेले तंत्र त्यांच्या सराईतपणाकडे अंगुलीनिर्देश करते. एमबीएच्या दोघा विद्यार्थ्यांनी ही परीक्षा घेणार्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या संकेतस्थळावर बनावट नोंदणी क्रमांकांद्वारे परीक्षार्थी म्हणून स्वतःची नोंदणी केली. तिच्या आधारे प्रत्यक्ष परीक्षागृहात प्रवेश मिळवला.
योगमार्ग - राजयोग (सत्य - ३६)
डॉ. सीताकांत घाणेकर
सत्य - एक श्रेष्ठ तत्त्व - मानवविकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक माणसाप्रमाणे, परिस्थितीवश, किंवा इतर कारणांमुळे सत्याचा वेगवेगळा अर्थ केला जातो. दोन माणसांच्या विचारांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असू शकतो. आज आपल्या राज्यात किंवा देशात जी परिस्थिती आहे तिथे नजर टाकली तर अनेक मते दर विषयांवर दिसतात. मग ती लोकसभा असो अथवा राज्यसभा असो. जास्त करून भयानक मतभेदच दृष्टिक्षेपात येतात. पुष्कळ वेळा स्वतःचा स्वार्थ सत्याच्या आड येतो. तर काही वेळा व्यक्तीचा काही कारणांमुळे झालेला अपमान देखील. आणि ही गोष्ट आजचीच नाही तर इतिहासात अशा अनेक घटना वारंवार दिसतात.
फिलॉसॉफर फिलिप
- प्रा. रमेश सप्रे
त्याची ती एखाद्या मोठ्या माणसासारखी खांदे उडवत, हात जमिनीला समांतर हलवत बोलण्याची शैली लक्षात राहण्यासारखीच होती. टेबलापेक्षा थोड्या जास्त उंचीची एक आकृती काचेच्या दारामागे टकटक करत उभी होती. आत पाऊल टाकल्यापासून ती बोलू लागली, शाळेत येऊन अजून पंधरा दिवसही झाले नव्हते. पण धाडस बघा. इयत्ता पाचवीतला हा मुलगा मुख्याध्यापकांना विचारत होता, ‘काय सर, शाळा सुरू होऊन इतके दिवस झाले पण अजून टाइमटेबल नाही? कुठला तास, कोणता शिक्षक, काय विषय काहीही कळत नाही. आम्ही आमचा मौल्यवान वेळ (प्रेशस टाइम) वाया घालवतोय सर!’
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ४ ऐवजी ६ मार्चला
गोवा तसेच मणीपूर, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी ६ मार्च रोजी होणार असल्याचे काल निवडणूक आयोगाने काल जाहीर केले. याआधी मतमोजणीची तारीख ४ मार्च ठरविण्यात आली होती. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान ४ फेब्रुवारीऐवजी ३ मार्चला ठेवण्यात आल्यामुळे मतमोजणीच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.
दि. ४ फेब्रुवारी रोजी महम्मद पैगंबर यांचा वाढदिवस ‘बरावफत’ असल्याने त्यादिवशी निवडणुका ठेऊ नयेत अशी मागणी उत्तर प्रदेशमध्ये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केली होती. त्यामुळे मतदानाच्या तारखेत फेरबदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला. एकूण सात टप्प्यात उत्तर प्रदेशच्या निवडणुका होत आहेत.
पैंगीण अंगणवाडीत कुकरचा स्फोट
६ बालके जखमी
महालवाडा पैंगीण येथील एका अंगणवाडीत कुकरचा स्फोट झाल्यामुळे ६ बालके किरकोळ जखमी होण्याची घटना ९ रोजी घडली.
जखमी बालकांमध्ये प्रतीक्षा वेळीप, विशाखा दीपक पागी, निषाद चंद्रकांत पागी, अस्मिका राजेंद्र वेळीप, बाबू विजयकुमार वेळीप आणि यश शिवप्रसाद वेळीप यांचा समावेश असून सर्व बालकांवर काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार दिल्यानंतर घरी पाठविण्यात आले. कुकर गॅसवर ठेवल्या वेळी खाली पडला व त्याचा स्फोट झाला. त्यावेळी अंगणवाडीतील बालके खेळत होती. अंगणवाडी इमारतीमधील दोन खोल्यांपैकी एकाच खोलीत अंगणवाडी चालते.
तृणमूल येत्या निवडणुकीतकॉंग्रेसविरोधात लढणार : विली
अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस पक्षाचा गोवा अध्यक्ष म्हणून आपण सूत्रे हाती घेतली असून आपला पक्ष गोव्यातील ४० मतदारसंघांपैकी बहुतेक मतदारसंघांत निवडणुका लढवणार असल्याचे डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाने राज्यात भरपूर भ्रष्टाचार केलेला असून भ्रष्टाचार, महागाई, बेकायदा खाणी, कचरा, वीज समस्या हे मुद्दे घेऊन तृणमूल कॉंग्रेस निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे ते म्हणाले. तृणमूल कॉंग्रेस पक्षाने उत्तर प्रदेश, मणिपूर व गोवा या राज्यात निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलेला असून पंजाब व उत्तरांचल या राज्यात मात्र तृणमूल कॉंग्रेस निवडणूक लढवणार नसल्याचे ते म्हणाले.
मडगाव अर्बन बँकेवर आंगले गटाचे वर्चस्व
मडगाव अर्बन बँकेच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष रमाकांत सोयरू आंगले गटातील ९ ही उमेदवार प्रचंड मतानी निवडून आले. विरोधी गटातील म्हाळू नाईक यांना १००३ मते पडली.
सिप्रियानो मृत्यू; जबाबदार पोलिसांच्या अटकेची मागणी
पणजी पोलीस स्थानकातील कोठडीत सिप्रियानो फर्नांडिस याला मृत्यू आला त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही अद्याप त्याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलिसांना अटक करण्यात येत नसल्याबद्दल काल येथील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेतून नाराजी व्यक्त करण्यात आली.
पदव्युतर वैद्यकीय परीक्षेचेपेपर फोडणारी टोळी पकडली
पाच जणांना दिल्लीत अटक
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतर्फे घेतल्या जाणार्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या महत्त्वपूर्ण परीक्षांचे पेपर फोडणार्या एका टोळीचा पर्दाफाश काल दिल्ली पोलिसांनी केला. यासंदर्भात पाच जणांना अटक करण्यात आली असून परीक्षार्थींकडून भरमसाट पैसे घेऊन त्यांना पेपर सोडवण्यास हे टोळके मदत करीत होते असे आढळून आले आहे. अटक झालेल्यांमध्ये एक डॉक्टर व चौघे इतर असून आणखी अनेकांना अटक होण्याची शक्यता आहे.
अतिमद्यप्राशनाने महिलेचा मृत्यू
केसरव्हाळ येथील एका हॉटेलात मृत्यू पावलेल्या सर्जे घुमा चॅको या रशियन महिलेचा मृत्यू अतिमद्यप्राशन व न्युमोनियाने झाल्याचे शवचिकित्सने सिद्ध झाले आहे.
त्या शिक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद
पणजीतील एका विद्यालयाचा शिक्षक कन्हैय्या नाईक याच्याविरुद्ध पणजी पोलिसांनी आता विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. सदर विद्यार्थिनीच्या वैद्यकीय तपासणीत लैंगीत अत्याचार झाल्याचे उघड झाल्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याआधी त्याच्याविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
बेळगावात साकारणार आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव
बेळगाव आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव यंदा १५ व १६ जानेवारी रोजी होणार असल्याचे महोत्सवाचे संयोजक चैतन्य कुलकर्णी यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. पतंग उडवण्यात तरबेज असलेले ६२ संघ या महोत्सवात भाग घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पानिपत युद्धात गोव्याचेही योगदान
शारदा व्याख्यानमालेत आफळे यांची माहिती
गोमंतकाने पानिपतच्या युद्धासाठी योगदान दिल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत, असे प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी शारदा व्याख्यानमालेच्या दुसर्या दिवशी बोलताना सांगितले.
येथील विद्याप्रबोधिनी संकुलात आयोजित या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन भारत विकास परिषद आणि जनहित मंडळ, पर्वरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
पर्यावरण संरक्षण : काळाची गरज
- मनोहर काशीनाथ पेडणेकर, मधलामाज, मांद्रे
‘‘आजकालवेगळेच वातावरण अनुभवायला येते. पावसाळ्यात सुध्दा उकाडा जाणवतो. थंडीच्या दिवसात तर कडाक्याची थंडी केव्हा आली? केव्हा येणार? याची स्मृती जागवावी लागते. उन्हाळा हा बारमाही बाराखडीसारखा असतो. घाम आणि तहान ही तर नित्याचीच चिंता मानवी जीवनाला त्रस्त करीत असते, सतावीत असते, व्याकूळ करीत असते’’ (घामाला अपवाद अर्थात् वातानुकूल बंदिस्ती!) असे सूर, असे व्यथित सूर, असे प्रतिकूलतेचा कंठशोष करणारे सूर जीवन व्यथित करतात. कोणते बरे कारण असेल या व्याकूळतेला? मानवनिर्मित कृतघ्नतेला? जीवनाचे विधायक गणित हे परिश्रमाच्या बेरजेवर, दुष्टपणाच्या शुन्यातील वजाबाकीवर, संपन्नतेच्या गुणाकारावर आणि संकुचित वृत्तीच्या भागाकारावर अवलंबून असते. गणितातील जर ‘कॅलक्युरेटर’ कसाही हाताळला गेला तर, ‘अचूक उत्तराची’ अपेक्षा कशी बरे करावी?
प्रलोभनांना लगाम
निवडणुका जिंकण्यासाठी गैरमार्गांचा वापर होऊ नये यासाठी नाना तर्हेने उपाययोजना करीत आलेल्या निवडणूक आयोगाने गोव्याच्या निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता नुकतीच व्यक्त केली आहे. अर्थात, अशा प्रकारे पैशाचा वापर होणे हे उघड गुपीतच म्हणायला हवे. गेल्या अनेक निवडणुकांमधून मतदारांना शेवटच्या क्षणी आपल्याकडे वळवण्यासाठी पैशाचा वापर होत आला आहे आणि दिवसेंदिवस त्याचे स्वरूप अधिकाधिक भयावह होत चालले आहे. काही वर्षांपूर्वी अनेक मतदारसंघांमध्ये मतदारांना साड्या वाटल्या गेल्या तरी मते पालटायची. आज चित्र कितीतरी पटींनी बदलले आहे. मतदारांना प्रत्येक उमेदवाराकडून नानाविध आमिषे दाखविली जात आहेत आणि पैसा तर पाण्यासारखा ओतला जातो आहे. काही इच्छुक उमेदवार तर गेली दोन वर्षे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत आणि मतदारांवर नानाविध गोष्टींची खैरात करून जिंकून येण्याची स्वप्ने पाहात आहेत. धान्यवाटप करण्यापासून महागड्या वस्तू भेट देण्यापर्यंत काहीही कमी ठेवले गेलेले नाही.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती होईलच : मावीन
कॉंग्रेस पक्षाची राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरची युती यावेळीही होईलच असा विश्वास कॉंग्रेसचे प्रचार प्रमुख असलेले उपसभापती व कुठ्ठाळीचे आमदार मावीन गुदिन्हो यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. कॉंग्रेसच्या संभाव्य आघाडी व उमेदवार छाननी समितीची नवी दिल्लीत होऊ घातलेली बैठक येत्या दि. १२ मार्चपर्यंत लांबल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिाली.
जागा वाटपावरून दोन्ही पक्षात मतभेद असले तरी दोन्ही पक्षांना यावेळीही युती झालेली हवी आहे व दोन्ही पक्षांचे नेते त्यासाठी सकारात्मक स्वरूपाची बोलणी करण्यास इच्छुक असल्याचे मत मावीन गुदिन्हो यानी व्यक्त केले. पक्षाच्या छाननी समितीची बैठक परवा नवी दिल्लीत होऊ न शकल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस व मगो पक्ष यांच्याबरोबरील निवडणूकपूर्व संभाव्य आघाडीचीही बोलणी आता लांबणीवर पडल्याचे ते म्हणाले.
दक्षता आयोगाकडून भ्रष्टाचारविरोधी रणनीती
काळे धन व बेनामी मालमत्तेवर विशेष लक्ष
सर्व सरकारी खात्यांना तसेच अंमलबजावणी संचलनालय, आयकर खाते, सीबीआय, महसूल व गुप्तचर संचालनालय आणि केंद्रीय पोलीस यंत्रणांमध्ये ही रणनीती वितरित केली जाईल. या रणनीतीला मान्यता लाभल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीवर आयोग बारीक लक्ष ठेवणार असून यासंबंधीचा वार्षिक अहवाल संसदेला सादर करणार आहे.
काळे धन व बेनामी मालमत्ता तसेच भ्रष्टाचाराच्या विविध प्रकारांना आळा घालण्याच्यादृष्टीने केंद्रीय दक्षता आयोग रणनीतीचा मसुदा तयार करीत असून त्याला महिना अखेरपर्यंत अंतिम स्वरूप मिळेल.
देशाची वाटचाल कठीण परिस्थितीतून : पंतप्रधान
देश कठीण परिस्थितीतून वाटचाल करीत असल्याचे काल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अनिवासी भारतीयांच्या सम्मेलनात बोलताना सांगितले. सध्याच्या आर्थिक वर्षात विकास दर मागे पडून ७ टक्क्यांवर राहणार असून पुढील काळात तो पुन्हा ९ ते १० टक्क्यांवर जाईल अशी अपेक्षा आहे.
भारत कठीण काळातून जात असला तरी एक राष्ट्र म्हणून आम्ही आव्हाने पेलण्याचा पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करीत आहोत, असे ते म्हणाले.
अण्णांना डिस्चार्ज
जंतूसंसर्गामुळे उद्भवलेल्या आजाराच्या कारणाने गेला आठवडाभर येथील इस्पितळात उपचार घेणारे अण्णा हजारे यांना काल डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, अजूनही आपल्या अशक्त वाटत असल्याने महिनाभर आराम करणार असून त्यानंतर भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या पुढच्या तयारीस लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे विधानसभा निवडणुका होत असलेल्या राज्यांत दौरा करणे असंभव असल्याचेही ते म्हणाले.
तुये येथे भोसकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला
तुये (पेडणे) येथील फेरीधक्क्यापासून शंभर मीटर अंतरावर २० ते २५ वयोगटातील अज्ञात युवकाचा सुर्याने भोसकलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा मृतदेह सडलेल्या अवस्थे होता.
कॅसिनोला गंडा घालणार्यांना रिमांड
बनावट डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करून पणजीतील ‘प्राइड’ या तरंगत्या कॅसिनोला सुमारे ३९ लाख १९ हजार रु. गंडा घातल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १२ जणांच्या टोळीला सहा दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड देण्यात आला असल्याचे पणजी पोलिसांनी सांगितले.
भरारी पथके सक्रिय
काळा पैसा व दारूवर लक्ष
होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काळा पैसा व दारू याचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता राज्य निवडणूक आयोगाने व्यक्त केलेली असून या पार्श्वभूमीवर विमानतळ, रेल्वे व आंतरराज्य बस टर्मिनसवर खास लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे आयोगातील सूत्रानी स्पष्ट केले. आयोगाच्या भरारी पथकाने आतापर्यंत दोन ठिकाणी छापे मारून एके ठिकाणी मतदारांना वितरीत केल्या जाणार्या पाण्याच्या टाक्या (नुवें मतदारसंघ) हस्तगत केल्याचे तसेच आरोग्य संचालनालयात टाकलेल्या छाप्यात नोकरीसाठीच्या उमेदवारांची स्वीकृतीपत्रे हस्तगत करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
निवडणूकविषयत तक्रारींसाठी नियंत्रण कक्षांची स्थापना
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकार्यांमार्फत उत्तर गोव्यातील २३ मतदार संघांसाठी निवडणूकविषयक तक्रारी स्वीकारण्याकरिता ठिकठिकाणी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. पणजी, फोंडा, डिचोली, म्हापसा, पेडणे, वाळपई याठिकाणी हे नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत.
वैभवशाली इतिहस मुलांपर्यंत पोचवा : आफळे
शारदा व्याख्यानमालेचे पर्वरीत उद्घाटन
परकीयांचा पाय आमच्या देशाला लागला तो आमच्या चुकीमुळेच लागला. भारताचा गत इतिहास म्हणजे आक्रमणांचाच इतिहास होय. ग्रीक, कुशाण, शक, हुंड, सिध्दी, पोर्तुगिज आणि इंग्रजांनी आपल्या देशावर आक्रमणे केली. त्यात इंग्रजांनी आपला ठसा उमटवला. इंग्रजांनी दिडशे वर्षात आपली शिक्षण प्रणाली राबवली तोच पायंडा आजपर्यंत आपण टिकवून आहोत. आपला वैभवशाली इतिहास आपल्या मुलांपर्यंत पोहोचविणे काळाची गरज आहे असे उद्गार पुणे येथील प्रसिध्द किर्तनकार चारुदत्त आफळे यांनी काल भारत विकास परिषद आणि जनहित मंडळ, पर्वरी यांनी आयोजित केलेल्या शारदा व्याख्यानमालेत काढले.
डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांचे चिदंबरमविरोधी ‘पुरावे’ सादर
टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात विद्यमान गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा हात असल्याचा आरोप करून खळबळ उडवणारे जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम स्वामी यांनी काल आपल्याजवळील यासंदर्भातील पुरावे दिल्लीत न्यायालयास सादर केले. या प्रकरणी पुढील सुनावणी २१ जानेवारीस ठेवण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेले मेमो, चिदंबरम हे अर्थमंत्री असताना त्यांचा तत्कालीन दूरसंचार मंत्री राजा यांच्याशी झालेला पत्रव्यवहार आदी संदर्भातील कागदपत्रे स्वामी यांनी न्यायालयास सादर केली आहेत.
चिदंबरम यांना टूजी घोटाळ्यात सहआरोपी करावे अशी मागणी स्वामी यांनी न्यायालयास केली आहे. चिदंबरम यांनी स्पेक्ट्रम वाटपात राजा यांच्या जोडीने लक्ष घातले होते व युनिटेक आणि स्वान या दोन कंपन्यांच्या भागभांडवलाच्या विभाजनास त्यांनीच अनुमती दिली होती असा आरोप स्वामी यांनी केला आहे. चिदंबरम यांनी राष्ट्रीय सुरक्षेशीही खेळ मांडल्याचा आरोप स्वामी यांनी केला.
कॉंग्रेस नेत्याची अहमद पटेलांशी चर्चा
येत्या ३ मार्च रोजी गोव्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमांव, मच्छिमारी मंत्री ज्योकीम आलेमांव, शिक्षणमंत्री बाबुश मोन्सेर्रात यानी नवी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
वरील सर्व नेत्यांनी यावेळी एक तर आपले नातेवाईक अथवा मर्जीतील इच्छुक उमेदवारांना कॉंग्रेस उमेदवारी मिळावी यासाठी या भेटीत लॉबिंग केल्याचे वृत्त आहे. चर्चिल आलेमांव यानी आपली कन्या वालंका आलेमांव, ज्योकीम आलेमांव यानी आपले पुत्र युरी आलेमांव, बाबुश मोन्सेर्रात यानी आपली पत्नी जेनिफर मोन्सेर्रात व इजिदोर फर्नांडिस याना उमेदवारी देण्याची मागणी अहमद पटेल यांच्याकडे केली.
साखळी परिसरात कुजलेल्या स्थितीतील दोन मृतदेह सापडले
घातपाताचा संशय व्यक्त : तपास सुरू
साखळी येथील बोडके मैदानाजवळ व सुर्ल येथील पठारावर अशा दोन ठिकाणी दोन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत काल आढळून आले असून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. साखळी बोडके मैदानावर आढळलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून अंगावर कपडे होते.
सुर्ल सत्तरीतील सड्यार या पिकनिक ठिकाणावर एका दरीत सडलेल्या अवस्थेत दुसरा मृतदेह सापडला असून ओळख पटण्यापलीकडे आहे. ती घातपाताची घटना असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काल सकाळी एका अज्ञात व्यक्तीने त्या ठिकाणी घाण येत असल्याची माहिती वाळपई पोलिसांना दूरध्वनीवरून वाळपई पोलिसांनी गावातील नागरिकांच्या मदतीने त्या मृतदेहाचा शोध घेतला.
मडगाव अर्बनची आज निवडणूक
१० उमेदवार रिंगणात
मडगाव अर्बन बँकेची निवडणूक आज रविवारी ८ जानेवारी रोजी होणार असून निवडणूक रिंगणात १० उमेदवार आहेत. त्यातून ९ जणांची निवड करावयाची आहे. या निवडणुकीवर १ उमेदवार म्हाळू नाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात स्थगिती मागितली होती. ती फेटाळून लावली गेली व निर्वाचन अधिकारी शिवानी बोरकर यांनी घातलेल्या गोंधळाबद्दल ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला व तो दंड चार आठवड्यांच्या आत भरावा व त्यानंतर याचिकादारानी अर्ज करून त्यावर दावा करावा असे म्हटले होते.
प्रसिद्ध गोमंतकीय कवी नरेंद्र बोडके यांचे निधन
प्रसिद्ध गोमंतकीय कवी व पत्रकार नरेंद्र बोडके यांचे काल पहाटे पावणे पाचच्या सुमारास पुण्यातील सह्याद्री इस्पितळात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. क्रॉनिक रिनल फेल्युअरचा आजार असलेल्या बोडके यांना आठवड्यातून तीनवेळा डायलिसिस घ्यावे लागत असे. प्रदीर्घ काळ त्यांची आजाराशी झुंज सुरू होती. अखेर काल पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
राष्ट्रवादीतून आपल्या हकालपट्टीचा डाव : ट्रॉजन
राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी आपण प्रामाणिकपणे व अथकपणे काम करीत असतानाही पक्षातील काही स्थानिक नेते व पदाधिकार्यांनी आपणाविरुध्द मोहीम सुरू केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष ट्रॉजन डिमेलो यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
‘लोकोत्सव-२०१२’चे शानदार उद्घाटन
गोवा शासनाचे कला आणि सांस्कृतिक संचालनालय, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर, कला अकादमी गोवा आणि गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने कला अकादमीच्या दर्यासंगमावर आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकोत्सव-२०१२’चे काल शानदार उद्घाटन झाले.
महाभारत आणि अणुयुद्ध
- रुद्राजी जगन्नाथ शे. केंकरे
भारत सरकारने अलीकडेच अमेरिकेबरोबर अणुकरार केला असून परराष्ट्रमंत्री प्रणब मुखर्जी यांनी भारत सरकारच्या वतीने स्वाक्षरी करून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या अणुकराराची मूळ संकल्पना पूर्व पंतप्रधान श्री. अटल बिहारी वाजपेयी यांची होती. इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत आणि तद्नंतर भाजपच्या कारकिर्दीत जे अणुस्फोट करण्यात आले, त्यामुळे जागतिक संघटनांनी धास्ती घेऊन अणुबॉम्ब बनविण्यास लागणारा अतिमहत्त्वाचा युरेनिअम धातू, त्याचप्रमाणे अतिशय महत्त्वाची अशी तांत्रिक उपकरणे भारतात उपलब्ध होऊ नयेत म्हणून कोणत्याही देशाने हे अतिशय महत्त्वाचे घटक भारतास देऊ नयेत अशा प्रकारची जागतिक बंदी घातली.
गोव्याच्या राजकारणाला घराणेशाहीचे ग्रहण!
- रमेश सावईकर
गोवा राज्य विधानसभेच्या निवडणुकीची तारीख घोषित झाल्यानंतर राजकारण ढवळून निघत आहे. निवडणुकीची चाहूल सर्वच राजकीय पक्षांना होती, तथापि सध्या निर्माण झालेली राजकीय पक्षांची गोची (विशेष करून सत्ताधारी कॉंग्रेस पक्ष) पाहता, निवडणूक आयोगाने त्यांना चपराक दिली आहे, असेच म्हणावे लागेल.
दुःख वेदनेचा उद्गार
डायलेसिसच्या खाटेभोवती
जाणवतो मृत्यू - पिकल्या केसांचा
पांढुरक्या चेहर्याचा
हा कुठे मित्र आहे?
हा भिववतो...
अखेर दीर्घकाळ भेडसावत आलेल्या या मित्राने बोडकेंना गाठले. एका कवीचा निर्दय बळी घेतला. ‘एका कवीच्या किडनीत पीड.. खाली मान घालून तू हा वार केलास. मरणा, भेदरटा..’ म्हणत बोडके मृत्यूला सामोरे गेले. गोमंतकीय मराठी कवितेची पताका बोरकर - रामाणींनंतर डौलाने फडकत ठेवणार्या नरेंद्र बोडकेंचे नाव घेतल्याखेरीज साठोत्तर मराठी कवितेचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. ‘पंखपैल’ पासून परवाच्या ‘तन्मुख’पर्यंत बोडकेंनी कवितेतून स्वतःला व्यक्त केले. आपली सुख दुःखे मोकळेपणाने मांडली. एम. ए. मध्ये सुवर्णपदक मिळवलेला हा जिनियस पत्रकारितेच्या अस्थिर प्रांतात उतरला आणि मूळच्या कलंदरवृत्तीने त्याची तेथे फरपट केली. चाकोरीतले सुस्थिर आयुष्य जगणे नशिबात नसावेच. त्यात कवितेने झपाटलेले. हे कमी म्हणून की काय आयुष्याच्या उत्तरार्धात जिवघेण्या दुखण्याने गाठले. शंकर रामाणी ‘तीन उन्हाचे दगड ठेवुनी आज रांधले जिणे’ म्हणतात, तसे बोडकेंचे आयुष्य होते. ते त्यांच्या कवितेत पुरेपूर उतरले आहे. माझ्या एकाएका कवितेच्या चोचीत मी आयुष्याच्या एकेका कालखंडाचा घास दिलेला आहे असे बोडके सांगत ते खोटे नाही. कवितेच्या प्रांतात नव्यानेच शिरणार्या बोडकेंच्या कविता त्या काळी ‘नवप्रभा’ने छापल्या.
बालपण देगा देवा ऽऽ
- सौ. देवकी राजेश नाईक
आ ठवणींचा अगणित ठेवा उराशी कवटाळून प्रत्येकजण जगत असतो. कधीतरी तिन्हीसांजेला मनकप्प्यातील आठवणींचा ठेवा वर उफाळून येतो अन् मन भूतकाळात डोकावते. आपलं बालपण प्रत्येकाला हवहवसं वाटणारं अन्, आजच्या फेसबुकच्या जमान्यात तर सर्वच पालकांना ते तीव्रतेने हवहवसं वाटणारं! नाताळाची सुटी पडली अन् आमचे चिरंजीव पहिल्याच दिवशी कंटाळा येतो ही रट लावून बसलेला. खरं सांगू? खूपच दया येते मला आजच्या मुलांची. आमच्या बालपणात आम्ही जे बालपण उपभोगलंय त्याच्या निम्यातसुद्धा ही मुलं उपभोगत नाहीत. मोबाइलवरची गाणी, टी. व्ही. वरचे कार्यक्रम, कॉप्म्युटर, लॅपटॉप, फेसबुक हेच आजच्या मुलांचं जणू विश्व झालंय.
सांगेलीचा गिरोबा
- लाडोजी परब
वेदकाळातील वाङ्मयात खेड्यांचे महत्त्व वर्णिले आहे. प्राचीन काळात खेडी गावांपेक्षाही महत्त्वाची मानली जात. वेदांमध्ये खेड्यांचा उल्लेख वारंवार आढळतो. इ. स. पूर्व चौथ्या व पाचव्या शतकातील बहुतांशी कथांत प्राचीन खेड्यांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवनाचे वर्णन आढळते. खेड्यांचा इतिहास अभंग आहे, तसेच येथील चालीरीती आणि परंपरेच्या वाटा कलात्मक आणि अद्भुत, अगम्य संस्कृतीच्या दिशेने जातात. काही परंपरा अशा आहेत की त्याची उत्तरेही सापडत नाहीत. त्याला अंध:श्रद्धाही म्हणू शकत नाही. कारण त्यातून निर्माण होणार्या परिणामांचे दाखले वेळोवेळी मिळतात. ग्रामीण भाग रूढी, परंपरांनी जखडलाय ही बाब काही अंशी खरी असली तरी त्या संस्कृतीतून संस्कारांचे बीज गावागावांत पेरले गेले आहे. तिथे अद्भुतता आहे. अगम्यता आहे. आणि समाजमन त्या घटनांशी बांधील आहे. अशाच काही घटना आणि संस्कृतीशी नाळ असलेल्या गोष्टींची या सदराद्वारे ओळख करून देत आहोत.
कोकणातील मंदिरे म्हणजे तेथील जनतेची भक्ती आणि भावनांशी जोडलेला जिव्हाळ्याचा संबंध! प्रत्येक देवस्थानात वैविध्यता आहे. गूढता आहे. ती गूढता विज्ञानाच्या दुर्बिणीतून शोधणेही शक्य नाही. कलियुगात ‘चमत्कार’ होत नाहीत, पण या गूढतेलाच ‘नमस्कार’ केल्यावाचून पर्याय नाही. कोकणातील देवस्थाने तेथील स्थानिक लोकांच्या भावनेशी आणि श्रद्धेशी निगडीत असल्याने त्या श्रद्धेवरच वर्षानुवर्षे लोक जगत आले आहेत. श्रद्धा डोळस असावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात. पण या श्रद्धेतून चांगलेच होणार असेल तर ती श्रद्धा बाळगण्यामागे गैर काय? अंगारा, लिंबू, टाचणी, बळी देण्यासाठी कोंबडे या गोष्टी गैर मानणे साहजिकच आहे. अशा गोष्टींसाठी अंध:श्रद्धा निर्मूलन समितीने कडाडून विरोध केला आहे. गावातील उत्सव हे देवस्थानांशी निगडीत असतात. उत्सवांतून अनेक धार्मिक, सामाजिक हितसंबंध दृढ होतात. या हितसंबंधांमुळे गावातील एकोपा आजही टिकून आहे. हा एकोपा निर्माण होण्यामागे गावची श्रद्धास्थाने आणि तेथील परंपरा यांचा घनिष्ठ संबंध आहे.
निवडणूक काळात बनावट नोटांची भीती
सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात करणार
विधानसभा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात येण्याची शक्यता असून अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना प्रत्येक चेकनाक्यावर तैनात केल्याची माहिती संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी काल दिली. आयकर खात्यालाही लक्ष ठेवण्याची सूचना केली आहे.
आरोग्य खात्यातील नोकरभरती प्रकरणी जिल्हाधिकार्यांनी चौकशी अहवाल निवडणूक अधिकार्यांना सादर केला. सदर अहवाल मुख्य सचिवांना पाठवून देणार असल्याचे नावती यांनी सांगितले. वरील खात्यात परवा अनेक उमेदवार स्वीकृतीपत्रे घेऊन गेले होते. हे वृत्त निवडणूक अधिकार्यांना मिळताच त्यांनी छापा मारून सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली होती. या प्रकारामुळे प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.
तीन अपघातांत तीन ठार
नावेली डिचोली, केरी साखळी व उसगाव येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघे ठार झाले.
केरी येथे स्कूटर घसरून चालक ठार
केरी-साखळी रस्त्यावर स्कूटर घसरून पडल्याने घोटेली क्र. २ येथील स्कूटरचालक लक्ष्मण कृष्ण गावस (५५) यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी प्रतिमा लक्ष्मण गावस (२२) जखमी झाली.
कॉंग्रेस राष्ट्रवादी युतीफिस्कटण्याची चिन्हे
दि. ३ मार्च रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती न करता स्वबळावरच निवडणूक लढविण्याचा सल्ला पक्षश्रेष्ठींनी स्थानिक कॉंग्रेस नेत्यांना दिल्याचे कळते. त्यादृष्टिकोनातून पक्षाने जोरदार तयारी केली असून सत्ता हातात ठेवण्यासाठी एका कुटुंबातील दोन किंवा तीन सदस्यांनाही उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उपसभापती माविन गुदिन्हो यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी स्वबळावरच निवडणूक लढविण्याची मागणी पूर्वीपासूनच केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही स्वबळावर निवडणूक लढविल्यास अधिक जागा मिळेल, असे केंद्रीय नेत्यांना सांगितल्याचे कळते.
लोटली येथे पाण्याच्या टाक्या जप्त
भरारी पथकाची कामगिरी
कारवट लोटली येथील सॅबी वाज यांच्या घरावर उपजिल्हाधिकारी रेडकर यांच्या भरारी पथकाने धाड घालून २० पाण्याच्या टाक्या जप्त केल्या. आचारसंहिता चालू असताना मतदारांना खूष करण्यासाठी टाक्या वाटत असल्याची तक्रार केल्यानंतर ही कारवाई झाल्याचे कळते.
भारतीय हिरे व्यापार्यांची चीनमधून सुटका
तस्करीच्या आरोपावरून चीनमध्ये अटकेत असलेल्या २२ भारतीय हिरे व्यापार्यांपैकी बाराजण काल मायदेशी परतले. चिनी न्यायालयाने त्यांच्या हस्तांतरणाचे आदेश दिल्यानंतर त्यांची सुटका झाली.
वाळपई पालिकेच्या इंग्रजी फलकास विरोध
वाळपई पालिकेच्या प्रशासकीय इमारतीला लावण्यात आलेल्या फलकास वाळपईतील मराठी-कोकणी भाषाप्रेमींनी विरोध दर्शविला आहे. त्यासाठी भाषाप्रेमींनी नामफलक बदलण्याची मागणी केली आहे.
दूरसंचार घोटाळ्यातील आरोपीमाजी मंत्री सुखराम ‘कोमा’त
१९९३ मधील गाजलेल्या दूरसंचार घोटाळ्यातील आरोपी व माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री सुखराम हे अत्यवस्थ असून ‘कोमा’त गेले आहेत, अशी माहिती त्यांच्या वकिलाने काल न्यायालयात दिली. त्यामुळे त्यांच्याविरुद्धची सुनावणी शनिवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. सुखराम ‘कोमा’त आहेत. ते इस्पितळाबाहेर पडू शकत नाहीत असे त्यांच्या वकिलाने विशेष सीबीआय न्यायाधीश धर्मेश शर्मा यांना सांगितले. सध्या ८६ वर्षांचे असलेल्या सुखराम यांना न्यायालयासमोर शरणागती पत्करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, सुखराम यांनी वैद्यकीय कारण पुढे करून आजवर ते टाळले होते.
आरुषीच्या पालकांच्या सुनावणीचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
नोएडातील आरुषी तलवार हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तिच्या पालकांविरुद्धची सुनावणी पुढे सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरुषीची हत्या तिच्या आईवडिलांनीच केली असावी असा संशय सीबीआयने यापूर्वी व्यक्त केलेला आहे. आपल्याविरुद्धच्या सुनावणीस स्थगिती मिळावी यासाठी तलवार दांपत्याने अलाहबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी थांबवण्यास नकार दिला होता, त्यामुळे गेल्या मार्चमध्ये तलवार कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या वर्षी १९ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने तलवार दांपत्याविरुद्ध गाझियाबाद न्यायालयाने बजावलेल्या अटक वॉरंटसह त्यांना न्यायालयात बोलावण्यासही स्थगिती दिली होती.
कुठल्या महापालिकेची पंचशताब्दी करताय?
- विजय प्रभू पार्सेकर-देसाई, पेडणे.
मराठीत एक म्हण आहे, ‘मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते’. पणजीच्या महापौरांना ती म्हण तंतोतंत लागू पडते. मुंबई महानगरपालिका ही दि मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट १८८८ (बॉम्बे कायदा ३/१८८८) नुसार अस्तित्वात आली. पूर्वी ती बॉम्बे महानगरपालिका होती. नंतर कायदा क्रमांक २५/ १९९६ नुसार ती ग्रेटर बॉम्बे महानगरपालिका झाली. १९८८ मध्ये बॉम्बे महानगरपालिकेने आपली शताब्दी साजरी केली. लवकरच सदर पालिका शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करणार आहे. बॉम्बे, कलकत्ता, मद्रास या महानगरपालिका १९८८ मध्येच अस्तित्वात आल्या. पूर्वी त्या नगरपालिका होत्या. नंतर अनेक महानगरपालिका अस्तित्वात आल्या. काहींनी हीरक महोत्सव तर इतरांनी रौप्यमहोत्सव साजरे केले.
खडाखडी
संयुक्त पुरोगामी आघाडीतील कॉंग्रेसचा महत्त्वाचा साथी असलेला तृणमूल कॉंग्रेस पक्ष आता दिवसेंदिवस त्या पक्षाला दुरावत चालला आहे असे दिसते. लोकपालच्या सरकारी मसुद्यास तृणमूलने संसदेत कडाडून केलेला विरोध, किरकोळ विक्री क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीविरुद्ध सरकारविरुद्ध उघडउघड ठोकलेला शड्डू, बांगलादेशला तीस्ता नदीचे पाणी देण्यास विरोध दर्शवून खुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यापुढे निर्माण केलेला पेच अशा प्रकारे सातत्याने ममता बॅनर्जी कॉंग्रेसला अडचणीत आणणारी भूमिका जाणूनबुजून घेत आल्या आहेत. ज्या बंगालमध्ये कॉंग्रेसच्या साथीने त्या गेले सात महिने सत्ता उपभोगत आहेत, तिथेही आपल्या वाढलेल्या सामर्थ्याच्या बळावर त्या कॉंग्रेसला झटकून देण्याच्या हालचाली करू लागल्या आहेत असे एकंदर घडामोडींवरून दिसते. खरे तर तृणमूल कॉंग्रेसची सत्तेच्या दिशेने झालेली वाटचाल कॉंग्रेसच्या साथीनेच आजवर झाली. सन २००१ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस - तृणमूल युतीने साठ जागा जिंकल्या होत्या, तेव्हापासून सन २०११ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयापर्यंतची यशाची चढती कमान कॉंग्रेसच्याच साथीने सर केली आहे.
लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाने काल राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेतली.
निवडणूक आयोगाचा आरोग्य खात्यावर छापा
आचारसंहिता काळात भरती : १८ उमेदवारांची स्वीकृतीपत्रे जप्त
निवडणूक आचार संहिता लागू झालेली असताना काल आरोग्य खात्यात नोकरभरती प्रक्रिया चालू असल्याचे वृत्त मिळताच तिसवाडीचे मामलेदार गौरीश कुट्टीकर यांच्या नेतृत्वाखालील राज्य निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कांपाल येथील आरोग्य संचालनालयाच्या इमारतीत छापा मारून उमेदवारांची स्वीकृतीपत्रे व अन्य साहित्य जप्त केले.
काल सकाळी ११.३०च्या दरम्यान १८ उमेदवार नोकर्यांसाठीची आपली स्वीकृती पत्रे आरोग्य संचालनालयात देण्यात आले होते. आचार संहिता लागू असतानाही या उमेदवारांची स्वीकृती पत्रे स्वीकारली जात असल्याचे कळल्यानंतर अज्ञाताने दूरध्वनीवरून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता आयोगाने तिसवाडीचे मामलेदार गौरीश कुट्टीकर यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाला छापा टाकण्यासाठी पाठवले.
आमदार कवळेकरांसह १५० जणांवर दहशतप्रकरणी गुन्हा
खणगिणी येथे दीडशेपेक्षा जास्त जमावाने चोर समजून दांडेली येथील दोघा तरुणांना मारहाण व पोलिसांची जीप अडवून कायदा हातात घेऊन दहशत निर्माण केल्याबद्दल कुंकळ्ळी पोलिसांनी तेथील १५० लोकांवर गुन्हा नोंद केला आहे. त्यात आमदार चंद्रकांत कवळेकरांचाही समावेश आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या १४३, १४५, १५१, १८६ १८८, ३४१, ३५२, ३५३ व १४९ कलमांखाली नोंद केली आहे.
अँथनी रॉकी डायस व दीपक राजकुमार सिया हे दांडेलीतील चांगल्या कुटुंबातील दोघे नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात आले होते. अँथनी डायस हा बेंगळूर येथील कॉम्युनिटी रिडिओ सर्विसमध्ये सीईओ तर दीपक १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. त्यांना समुद्र किनार्याचे आकर्षण असल्याने बेतुल, खणगिणी येथे गेले होते. स्थानिक ग्रामस्थाना गैरसमज झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन मारहाण केली. नंतर पोलिसांना बोलावून घेतले.
१२ जागा द्या, अन्यथा स्वबळावर लढू
राष्ट्रवादीचा इशारा
महिनाअखेरपर्यंत १२ जागा राष्ट्रवादीला सोडण्याचे कॉंग्रेसने निश्चित केले नाही तर सर्व ४० मतदारसंघांतून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा ठराव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश समितीने काल घेतल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट व सरचिटणीस ऍड. अविनाश भोसले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. युतीच्या प्रश्नावर कॉंग्रेस लपवाछपवी करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
युती डोळ्यांसमोर ठेऊन ३१ डिसेंबरपर्यंत १४ मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. आता उर्वरित मतदारसंघांतूनही इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. इच्छुकांनी दि. १२ रोजीपर्यंत पक्षाच्या कार्यालयात अर्ज करावेत असे कळविण्यात आले आहे.
श्रीपाद गोव्यात हवेत : पर्रीकर
उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईकांची गोवा विधानसभेत गरज असल्याने सहा महिन्यांपूर्वी पक्षाचा केंद्रीय निवडणूक समितीकडे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. परंतु त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार केंद्रीय नेत्यांचा असल्याचे विरोधी नेते मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले.
अण्णांचा प्रचारदौरा रद्द
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचही राज्यांत अण्णा हजारे लोकपाल विषयावर जागृतीसाठी प्रचार दौरा करणार होते, मात्र हजारे यांची प्रकृती बिघडल्याने हा दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती किरण बेदी यांनी काल दिली.
‘रॉकस्ट्रीट जर्नल’चे संपादक अमित सहगल यांचा बोगमाळो येथे बडून मृत्यू
‘रॉकस्ट्रीट’ या संगीतविषयक नियतकालिकाचे संस्थापक तसेच संपादक अमित सहगल (४७) यांचा काल बोगमाळो येथे समुद्रात बुडून मृत्यू झाला.
काल श्री. सहगल अन्य मित्रांसोबत तसेच मुलीबरोबर छोट्या बोटीतून मांद्रे येथून समुद्र सफारीसाठी निघाले होते. ते बोटीने बोगमाळो येथील समुद्रापर्यंत दुपारी २.३० वा. पोचले. बोट किनार्याजवळ आली तशी सहगल यांनी समुद्रात पोहण्याच्या इराद्याने उडी टाकली. मात्र काही वेळातच ते पाण्यावर तरंगताना आढळून आले. त्यांना लगेच किनार्यापर्यंत आणून इस्पितळात नेण्यात आले मात्र आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, उडी टाकल्यावर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला असावा, असा कयास पोलिसांनी वर्तविला आहे.
पणजीत सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी ७० कोटी
पणजी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी पणजी महापालिकेला जवाहरलाल नेहरू शहर विकास योजनेखाली ७० कोटी रु. एवढा निधी उपलब्ध होणार असल्याचे महापालिकेतील सूत्रानी सांगितले. महापालिकेच्या वरील प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चोख निर्णय
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी हॉलमार्किंग सक्तीचे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. आजवर अशा प्रकारचे हॉलमार्किंग ऐच्छिक होते आणि ते सक्तीचे करण्याचा निर्णयही पुरेशा हॉलमार्किंग सुविधांअभावी जवळजवळ तीन वर्षे लांबणीवर टाकला गेला होता. आता त्याची सक्ती केली गेल्याने देशभरातील लक्षावधी ग्राहकांना फार मोठा दिलासा लाभणार आहे. सोन्याची शुद्धता हा ग्राहकांसाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. २२ कॅरेटचे म्हणून विकले जाणारे दागिने खरोखरच २२ कॅरेटचे असतील याची कोणतीही खात्री नसल्याने केवळ दैवावर भरवसा ठेवूनच अशा प्रकारे खरेदी आजवर होत आली. अर्थातच सोने खरेदीत फसवणूकही मोठ्या प्रमाणावर होत असे कारण त्याची शुद्धता तपासण्याचे कोणतेही साधन ग्राहकापाशी नसते आणि तांत्रिक चाचण्या केल्याखेरीज त्याची शुद्धता वरपांगी आजमावताही येत नाही. आता सरकारच्या या निर्णयामुळे या भगवान भरोसे कारभाराला थोडा आळा बसेल अशी अपेक्षा आहे.
बोनसवाटपाची घोषणा ही वैचारिक दिवाळखोरी
- संजीव कामत, कांदोळी - बार्देश
गेल्या १९ डिसेंबर रोजी गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त पणजीत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ध्वजारोहणानंतर केलेल्या भाषणात ‘क’ आणि ‘ड’ वर्गात येणार्या सरकारी कर्मचार्यांना व सेवानिवृत्त कर्मचार्यांना सरसकट पाच हजार रूपयांचा बोनस देण्याचा निर्णय ऐकवला. सरकारचा हा निर्णय म्हणजे ङ्गक्त मुख्यमंत्री व अन्य काही मंत्र्यांचा असावा असे वाटते. सर्वसाधारणपणे कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर गोव्यातील विचारवंत व अन्य वरिष्ठ सरकारी अधिकार्यांची मते जाणून घेतली जावीत अशी अपेक्षा असते, व ती जरूर असावीच. पण सध्या विविध खात्यांतर्ङ्गे असले निर्णय जे घेतले जातात, ते बघितल्यावर हे निर्णय एकांगी तर घेतले जात नाहीत ना अशी शंका येते. या वैचारिक दिवाळखोरीच्या पंचनाम्यासाठीच हा पत्रप्रपंच!
६ सरकारी खात्यांनी केलेली ४२८ जणांची भरती रद्द
तीन दिवसांत अहवाल देण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश
विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच निवडणूक आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार पोलीस, सार्वजनिक बांधकाम खाते, वीज, तंत्रनिकेतन व पशुसंवर्धन या सहा खात्यांतील मिळून ४२८ कर्मचार्यांची भरती आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याने रद्द ठरली आहे. वरील प्रकरणी कोणती कारवाई केली यासंबंधीचा अहवाल तीन दिवसांत सादर करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने या खात्यांना दिला आहे.
निवडणूक आयोगाने गोव्यातील नोकरभरतीचा विषय गंभीरपणे हाताळला असून त्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असतानाही वेगवेगळ्या खात्यांमध्ये नोकरभरती चालू असल्याची तक्रार भाजपने आयोगाकडे केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने सर्व खात्यांना २० डिसेंबरनंतर केलेल्या नोकरभरती संबंधीची माहिती सादर करण्यास सांगितले होते.
‘भाजपचा एकही उमेदवार अद्याप निश्चित नाही’
गोव्यातील कॉंग्रेसला नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप-मगो निवडणूक पूर्व युती व्हावी ही जनतेची भावना असून युतीच्या प्रश्नावर सध्या निर्णायक स्वरुपाची बोलणी सुरू असल्याचे प्रदेश भाजप अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजपचा एकही उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. प्रसार माध्यमातून जे वृत्त प्रसिद्ध होत आहे ते योग्य नसून या प्रकारामुळे गोंधळ होत असल्याचे पार्सेकर म्हणाले.
श्रीपाद भाजपला केंद्रात महत्त्वाचे
उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांना भाजपच्या दहा महत्त्वाच्या खासदारांमध्ये स्थान आहे. ते संसदेत भाजपचे सचिव आहेत.
त्यामुळे त्यांना पर्वरी मतदारसंघात उमेदवारी देण्याच्या विषयावर आपण निर्णय घेऊ शकत नाही व भाष्यही करू शकत नाही, हा निर्णय केंद्रीय नेतृत्वानेच घ्यायला हवा, असे प्रदेश भाजप अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी एका प्रश्नावर सांगितले.
नोकरीसाठी फसविल्याप्रकरणी दोघे चंडिगढ येथून ताब्यात
सिंगापूर व केनिया देशांत भरपगारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून १०० बेरोजगार तरुणांना फसविलेल्या दिल्ली येथील राजकुमार श्यामलाल व अरुण गोवर्धन शर्मा यांना चंडिगढ येथे मडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून मडगावात येण्यास निघाले आहेत.
१४ मतदारसंघ ‘खर्चा’ला संवेदनशील
केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील एकूण चाळीस मतदारसंघांपैकी १४ मतदारसंघ खर्चाच्या दृष्टीकोनातून संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आयोजित करण्यात येणार्या प्रत्येक कार्यक्रमांवर निरीक्षक अधिक लक्ष केंद्रित करतील, अशी माहिती संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी दिली.
शिक्षक प्रशिक्षण केंद्राच्या आवारातील झोपड्या मोडल्या
येथील शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या आवारातील झोपड्या काल मोडून टाकण्यात आल्या.
दवर्ली येथे कारमधून २ लाखांचा ऐवज लंपास
दवर्ली येथे ईश्वर दांडी याच्या कारमधून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख रुपयांचे दागिने पळविल्याची तक्रार मायणा कुडतरी पोलीस स्टेशनवर नोंदविली आहे.
ईश्वर दांडी व कुटुंबीय नातेवाईकाचा मृत्यू झाल्यामुळे आंध्रप्रदेशमध्ये गेले होते. ते रात्री परतले. रिवाजानुसार घरात देवकाम करून सामान आत नेण्यास पुरोहिताने सांगितले.
४ नव्या फेरीबोटींची बांधणी रखडल्याने दंड
नदी परिवहन खात्याला जानेवारी महिन्याच्या अखेरीस मिळणार असलेल्या चार फेरीबोटींचे बांधकाम सध्या मंद गतीने चालू असल्याने आता सदर फेरीबोटी फेब्रुवारी महिन्यातच उपलब्ध होऊ शकणार असल्याचे खात्यातील सूत्रांनी सांगितले.
सराफी दुकानातून सोनसाखळी चोरली
डिझायनर्स ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानातून दोन अज्ञात महिलांनी सोने खरेदी करण्याच्या बहाणा वरून सत्तर हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन (१६ ग्रॅम) लंपास केली.
काल बाजाराच्या दिवशी दुपारी २ महिला सदर दुकानात आला व चेन दाखवण्याची विनंती केली याच दरम्यान दुसर्या महिलेने गोष्टी करत असताना एक चेन बॅगेत टाकली व थोड्या वेळाने दोघेही दुकानातून निघून गेल्या.
लोहखनिज निर्यातीवरील करवाढीस चेंबर ऑफ कॉमर्सचा विरोध
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना निवेदन सादर
लोहखनिज निर्यातीवरील निर्यात करात केंद्र सरकारने केलेल्या दहा टक्के दरवाढीस गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने विरोध दर्शवला असून संघटनेचे अध्यक्ष मांगीरिश पै रायकर यांनी यासंदर्भात अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना एक निवेदन पाठविले आहे.
आंतरराष्ट्रीय मिस्ड कॉल्सबाबत सावधगिरी बाळगा!
वोडाफोनचे आवाहन
आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून तुम्हाला जर मिस्ड कॉल आला असेल तर पुन्हा त्या क्रमांकाशी संपर्क करताना सावधगिरी बाळगा असे आवाहन वोडाफोनकडून करण्यात आले आहे.
वोडाफोन ग्राहकांनी केलेल्या तक्रारींनुसार त्यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून मिस्ड कॉल्स येत असून त्या क्रमांकाशी पुन्हा संपर्क केला असता भरमसाठ भाडे आकारले जात आहे. यासाठी ग्राहकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पाकिस्तानमधील असुरक्षित हिंदू व उदासीन केंद्र सरकार
- भास्कर वासुदेव जोशी, कारापूर - तिस्क, साखळी.
पाकिस्तानमधील २७ कुटुंबे भारतात तीर्थयात्रेसाठी आली आहेत. त्यापैकी १४० सदस्यांनी आपल्याला भारतात राहू द्यावे अशी विनंती केंद्र सरकारला केली होती. मात्र, त्यांची ही विनंती ङ्गेटाळणार असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत एका प्रश्नावरील उत्तरात सांगितले. आता यावर त्यात काय चूक आहे, असे वर वर विचार करता वाटेल. परंतु त्यांना पाकमधून भारतात का येऊन रहावे असे वाटले याचा विचार केला, तर त्याचे उत्तर मिळते.
विज्ञानातील पीछेहाट
वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रात भारताची पीछेहाट होत असून चीनने भारतापेक्षा पुढे मजल मारली आहे, अशी स्पष्ट कबुली पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकतीच भुवनेश्वरला सुरू असलेल्या ९९ व्या राष्ट्रीय विज्ञान कॉंग्रेसमध्ये दिली. वैज्ञानिक संशोधन आणि विकास यासंदर्भातील सरकारी अर्थसहाय्यात येत्या बाराव्या पंचवार्षिक योजनेत वाढीव तरतूद करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे. विज्ञान क्षेत्रातील भारताची पीछेहाट हे काही गुपीत नव्हे. गेल्या काही वर्षांमध्ये चीनच नव्हे, तर अगदी ब्राझीलसारख्या देशानेही भारताला मागे टाकले आहे आणि सरकारने आणि आपल्या औद्योगिक विश्वाने परस्पर सहकार्याने काही ठोस पावले उचलली नाहीत, तर येत्या काही वर्षांतच भारत आणखी पिछाडीवर जाणे हे अटळ आहे. एकेकाळी वैज्ञानिक संशोधनक्षेत्रात रशिया आघाडीवर होता, परंतु विघटनानंतर त्याची झपाट्याने पीछेहाट झाली. भारतीय विज्ञान क्षेत्रही त्याच वाटेने चालले आहे. ती रोखण्यासाठी केवळ वैज्ञानिक संशोधनासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद राष्ट्रीय उत्पन्नाच्या सध्याच्या ०.०९ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर नेणेच पुरेसे ठरणार नाही. त्याच्या जोडीनेच चीनप्रमाणे आणखीही गोष्टी घडणे आवश्यक असेल.
मगो-भाजप युतीसाठीनिर्वाणीचे प्रयत्न
६ जानेवारीपर्यंत निर्णय अपेक्षित
येत्या दि. ३ मार्च रोजी होणार्या गोवा विधानसभा निवडणुकीत मगो-भाजप युतीच्या प्रस्तावावर दि. ६ पर्यंत निर्णय होण्याची शक्यता असून कॉंग्रेसला शह देण्यासाठी अनेकांनी मगो-भाजप युती व्हावी म्हणून जोरदार प्रयत्न चालविले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मगोने युतीसाठी भाजपकडे प्रियोळ, मडकई, फोंडा, पर्वरी व सावर्डे या मतदारसंघांसाठी मागणी केली आहे. परंतु पर्वरी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी तयारी केल्याने पर्वरी मतदारसंघात मगोला सोडणे शक्य नाही. निवडणूक आयोगाची मान्यता टिकवून ठेवण्यासाठी आगामी निवडणुकीत मगोला किमान २५ हजार मतांची गरज आहे.
उमेदवारांना दिलेले नोकरीचे प्रस्ताव स्थगित
आचारसंहितेमुळे ‘कदंब’चा बोनस अडला
राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झालेली असताना सार्वजनिक बांधकाम खाते, आरोग्य खाते व समाजकल्याण खात्याने ज्या उमेदवारांना नोकरीत नियुक्तीचे प्रस्ताव दिले होते ते निवडणुकीपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाने वरील खात्यांना दिला असल्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी काल पत्रकारांना सांगितले.
वरील नोकरभरती करू दिल्यास राज्यातील मतदारांवर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता असल्याने ही स्थगिती आणण्यात आली असल्याचे नावती यांनी स्पष्ट केले.
पर्वरी गट कॉंग्रेसची उमेदवार निवडीसाठी बैठक
उमेदवार निवडताना विेश्वासात न घेतल्याने पाऊल
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश कॉंग्रेसने संभाव्य उमेदवारांचे अर्ज मागवून यादी श्रेष्ठींकडे पाठवून दिली असताना पर्वरी गट समितीने उमेदवार निवडीसाठी बैठक बोलावून प्रदेश कॉंग्रेस नेतृत्वालाच जणू आव्हान दिले आहे.
गट समितीला विश्वासात न घेता उमेदवार निवडला गेल्यास त्याचे परिणाम चांगले होत नाहीत. त्यामुळे आपण गट समितीच्या या बैठकीस हजर राहणार आहोत, असे ऍड्. दयानंद नार्वेकर यांनी सांगितले.
बचत खाते पोर्टेबिलिटीचा अर्थ मंत्रालयाचा प्रस्ताव
मोबाईल क्रमांक आणि आरोग्य विम्याच्या धर्तीवर आता बचत खाते क्रमांकांचे हस्तांतरण करण्याच्या प्रस्तावावर अर्थ मंत्रालय विचार करीत आहे. त्याला मान्यता मिळाल्यास कोणत्याही ग्राहकाला आपला खाते क्रमांक न गमावता बँक बदलता येऊ शकेल. या प्रक्रियेत कोणत्या तांत्रिक अडचणी आहेत त्याचा अभ्यास सुरू असून त्यावर मात केली जाईल असे अर्थ सेवा सचिव डी. के. मित्तल यांनी काल पत्रकारांना सांगितले.
‘कॉंग्रेसला खाली खेचण्यासाठी भाषा सुरक्षा मंच कार्यरत’
विद्यमान कॉंग्रेस सरकारने भारतीय संस्कृती, भाषा, गोव्याची अस्मिता नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला असून आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच अभिनव अभियान राबवणार आहे, असे मंचच्या निमंत्रक शशिकलाताई काकोडकर यांनी सांगितले. मंच कॉंग्रेच्या विरोधात पूर्ण शक्तीनिशी प्रचार करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
कुचेली येथे घरात दोन लाखांची चोरी
कुचेली-म्हापसा येथील मेल्विन डिसोझा यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून रोकड व सोन्याच्या वस्तू मिळून २ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
लष्कर ए तोयबाकडून महिला दहशतवाद्यांना प्रशिक्षण
लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना सध्या पाकव्याप्त काश्मीरातील तळावर २१ महिला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याची माहिती लष्कर सूत्रांच्या हाती लागली आहे.
मोरजीत पाच पर्यटकांना जीवदान
तेंबवाडा मोरजी समुद्रकिनारी रशिया व इंग्लंडच्या मिळून ५ विदेशी पर्यटकांना समुद्रात बुडता बुडता जीवरक्षकांनी वाचवले.
मोरजी समुद्रात ११.१५ वाजता गॅलीलोवा कामीला (४०), ऍलेसीस कॅमरॉन (३५), कॉन्टन्नी डॅडस्व्हॅल (१५) या विदेशी महिला पर्यटक तसेच आल्तिनो पालूला (३०) व मुख्खावेट सीनलेवर (४५) हे रशियन्स समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. अचानक १२.१५ वाजता ज्या ठिकाणी शापोरा नदीचे व अरबी समुद्राचे मीलन होते त्याठिकाणी पाण्याचा भोवर्यात ते सापडले.
तृणमूलने गोव्यातून निवडणूक लढविल्यास फरक नाही : कॉंग्रेस
केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटक पक्ष असलेल्या तृणमूल कॉंग्रेसने गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तसे केले तरी काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसने काल दिली.
विश्वजितविरोधी याचिका; अंतिम सुनावणी २२ फेब्रु.ला
जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या विरोधात ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या स्पेशल लिव्ह पिटिशनला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अल्तमास कबीर व न्यायमूर्ती सुरींदर सिंग निज्जार यांनी आज २२ फेब्रुवारीपर्यंत तहकूबी दिली असून त्याच दिवशी या याचिकेवर अंतिम सुनावणी होणार आहे.
टाटा नॅनोला आव्हान : ‘बजाज’जी स्वस्त कार ‘आरई ६०’ दाखल
३५ कि. मी. प्रतिलिटर धावणार असल्याचा दावा
दुचाकी उत्पादनात भारतात दुसर्या क्रमांकावर असलेल्या बजाज ऑटोने आपले पहिलेच चारचाकी उत्पादन काल बाजारात दाखल केले. कमी किमतीची कार असलेली ‘आरई ६०’ प्रति लिटर ३५ किलोमिटर चारलणार असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. या गाडीची किंमत अधिकृतरित्या कंपनीने जाहीर केली नसली तरी ती साधारण १.२५ लाखांच्या आसपास असेल असे समजते. सध्या जगातील सर्वात स्वस्त कार असलेल्या नॅनोला ‘आरई ६०’ आव्हान ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ईटीव्हीची मालकी आता टीव्ही १८ समूहाकडे
प्रादेशिक दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या क्षेत्रात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ईटीव्ही नेटवर्कची मालकी लवकरच नेटवर्क १८ व टीव्ही १८ समूहाकडे जाणार असून २१०० कोटी रुपयांना हा विक्री व्यवहार झाला आहे. राघव बहल यांच्यापाशी नेटवर्क १८ व टीव्ही १८ या दोन्ही कंपन्यांचे ५१ टक्के भागभांडवल राहणार असून आरआयएलच्या ४ जी ब्रॉडबँड डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या ‘इन्फोटेल’चाही ताबा या कंपन्यांकडे येणार आहे.
पक्षाने नव्हे, जनतेने धडा शिकवायचा असतो
- दिलीप बोरकर
त्यांना पाठबळ द्या
पुण्याच्या अनुज बिडवेची हत्या ही व्यक्तिगत द्वेषापोटी केली गेली की वर्णद्वेषापोटी हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी विदेशस्थ भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियातील भारतीय विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे निर्घृण हल्ले झाले आणि आता तर हे लोण अनेक प्रगत राष्ट्रां’ध्ये पसरल्याचे दिसून येत आहे. ख्रिस’सच्या रात्री अ’ेरिकेत आलोक गुप्ता या तरुणाची हत्या झाली. निरपराध भारतीय विद्यार्थ्यांना ’ाथेफिरूंकडून असे अकारण लक्ष्य केले जात असूनही भारत सरकार केवळ शाब्दिक इशारे दिले म्हणजे आपले कर्तव्य संपले असे मानून स्वस्थ बसले आहे. चिनी व्यापार्यांनी भारतीय मुत्सद्द्याला जी अपमानास्पद वागणूक दिली त्याचा निषेध चिनी मुत्सद्द्याला पाचारण करून लगोलग नोंदवण्यातील तत्परता आणि कणखरता ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेच्या बाबतीत मात्र दाखवली गेलेली दिसली नाही. उच्च शिक्षणासाठी आपल्या कुटुंबियांपासून लांब दूरदेशी जाणार्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकारने आजवर काय केले हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
योगमार्ग - राजयोग (सत्य - ३५)
- डॉ. सीताकांत घाणेकर
भगवंताने रचलेल्या या विश्वात विविध तर्हेचे लोक आहेत. तरुण-वृद्ध, सुशिक्षित-अशिक्षित, ज्ञानी-अज्ञानी... प्रत्येक जण आपल्या परीने वागतो. बहुतकरून वृद्ध, सुशिक्षित, ज्ञानी जनांकडून किमान अपेक्षा असते ती चांगुलपणाची. पण काही वेळा हे लोक असे वागतात की सामान्य जनता भांबावून जाते; आणि ज्यावेळी कुणा एका व्यक्तीवर जास्त करून स्त्रीवर अत्याचार होतात तेव्हा सगळीकडे अंधःकार दिसतो.
‘आनंदा’चे डोही...
- प्रा. रमेश सप्रे
‘आनंद नाव ना रे तुझं? मग तुझा चेहरा फुललेल्या गुलाबासारखा नको का? असा कोमेजलेला का असतो नेहमी? हस पाहू जरा ... एक ... दोन ... तीन!’ माझा हाही प्रयत्न फसला होता. आनंद काही हसायला तयार नव्हता. याच वर्षी तो दुसर्या शाळेतून आला होता. वर्गशिक्षिकेला जरा या गोड पण दुःखी मुलाची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला सांगितल्यावर तिनं प्रासंगिक नोंदीची वहीच (ऍनेक्डोटल रेकॉर्ड) दाखवली.
लोकपाल : कॉंग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप चालूच
हिवाळी अधिवेशनात लोकपाल विधेयक संमत होऊ शकले नाही त्यास एकामेकांना जबाबदार ठरवत कॉंग्रेस व भाजपने आरोपांच्या फैरी काल पुन्हा सुरु केल्या. भाजपच्या मते कॉंग्रेस सरकारमुळे हे विधेयक संमत होऊ शकलेले नाही तर कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार भाजपमुळेच विधेयक अडकून पडले आहे.
कॉंग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी दावा केला की, भाजपने घटना दुरुस्ती विधेयकाविरोधात मतदान केले कारण ती राहुल गांधी यांची कल्पना होती. दुसर्या बाजूने भाजप नेते रवी शंकर यांनी या सर्व विषयावर पंतप्रधान मनमोहन सिंग गप्प का बसले आहेत असा सवाल केला.
कॉंग्रेसला धडा शिकवण्यासाठीचनिवडणुकीच्या रिंगणात : मिकी
गोवा विकास पार्टीचे पाच उमेदवार जाहीर
प्रदीर्घ काळ केंद्रात आणि गोव्यात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी सर्वसामान्य लोकांच्या नावे आपला व आपल्या कुटुंबियांचा स्वार्थच साधला. आता त्यांना सत्तेची चटक लागली असून एकाच कुटुंबातील तीन - चार जणांना निवडणुकीची उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
या निवडणुकीत जनतेने गोव्याच्या भवितव्याचा शांतपणे विचार करून कॉंग्रेस नेत्यांना घरची वाट दाखवावी, असे आवाहन गोवा विकास पार्टीचे नेते मिकी पाशेको यांनी काल पत्रकार परिषदेत केले. आपला गोवा विकास पार्टी हा पक्ष गोव्यातील सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून गोमंतकीयांना पारदर्शी व चांगले प्रशासन देणारे सरकार सत्तेवर आणील असे ते पुढे म्हणाले.
युवतीचा मृत्यू; तणावानंतर युवकास अटक
रावय - कुडतरी येथील नव्या वर्षाच्या पार्टीदरम्यान, साबिना हिलारियो (१९) या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबियांनी संशय व्यक्त करून दुसर्यांदा शवचिकित्सा करावी व मृत्यूचे कारण स्पष्ट करावे नपेक्षा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले, त्यानंतर तणाव निर्माण झाला. त्यानंतर साबिनाची आई कायताना हिने पोलीस उपअधीक्षक शांबा सावंत यांच्याकडे तक्रार केल्यानंतर कुडतरी येथील रॉय फर्नांडिस याला अटक करण्यात आली आहे.
काल हॉस्पिसियु इस्पितळात झालेल्या शवचिकित्सेचा अहवा डॉक्टरांनी राखून ठेवला व व्हिसेरा हैद्राबाद येथे तपासणीसाठी पाठविला असल्याचे सांगितले. मात्र याबाबत असमाधान व्यक्त करीत कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
पेट्रोल दरात तूर्त वाढ नाही
रुपयाचे मूल्य घसरत असल्यामुळे होणार्या नुकसानाशी सामना करण्यासाठी प्रति लिटर रु. २ पेट्रोल दरवाढ करण्यास तेल कंपन्यांना राजकीय मान्यता मिळाली नसल्याने तूर्त भाववाढ टळली आहे. गेल्या पंधरवड्यातच तेल कंपन्यांनी दरवाढ करण्याचे ठरवले होते. मात्र संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने दरवाढ करू नये, असे सरकारची सूचना होती. त्यामुळे कंपन्या थांबल्या होत्या. मात्र या पंधरवड्यातही दर न वाढविण्याचे कंपन्यांनी ठरविले आहे.
भारताच्या दूताशी चीनमध्ये गैरवर्तणूक
चीनच्या भारतीय दूतास समन्स
शांघाय येथे भारतीय दूताशी झालेल्या गैरवर्तणूक प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काल चीनच्या भारतीय दूतास समन्स बजावले.चीनमध्ये एका कोर्टात तेथील व्यापार्यांनी भारतीय दूतास धक्काबुक्की केली, तेव्हा ते चक्कर येऊन पडले व त्यांना इस्पितळात न्यावे लागले. एस. बालचंद्रन हे भारतीय दूत तेथील व्यापार्यांनी थकबाकीसाठी ओलीस ठेवलेल्या भारतीय नागरिकांना सोडविण्यासाठी यूवू येथील व्यापारी कोर्टात गेले होते.
डॉ. विल्फ्रेड डिसोझा तृणमूल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसपक्षाने आपली पक्षाचे गोवा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असल्याचे गोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
कम्युनिस्ट पक्ष गोव्यात पाच जागा लढवणार
कम्युनिस्ट पक्ष उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याचे पक्षाचे सरचिटणीस ए. बी. बर्धन यांनी सांगितले. गोव्यातही पक्ष पाच जागा लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
उत्तर प्रदेशात सर्व शक्तीनिशी पक्ष उतरेल असे सांगताना भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना सत्तेपासून दूर ठेवणे ही पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील शाळा इतक्यात दुबार होणे कठीण
शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील शाळा दुबार कराव्या लागणार असल्या तरी येऊ घातलेल्या शैक्षणिक वर्षापासून ते होणे शक्य नसल्याचे शिक्षण संचालक अनिल पवार यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
अभिजात मराठी संगीत नाटक स्पर्धेत श्री दत्त सांस्कृतिक मंडळाचे ङ्गययाती देवयानीफ प्रथम
गोमंतक मराठी अकादमीने आयोजित केलेल्या नवव्या अभिजात संगीत मराठी नाट्य स्पर्धेत श्री दत्त कला आणि सांस्कृतिक मंडळ सोनारभाट, लाटंबार्से डिचोली या संस्थेच्या ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकाला प्रथम पारितोषिक (रु. १२,०००) प्राप्त झाले.
चांगल्या पिकासाठी मुलीचा बळी
शेतीला चांगले पिक येण्यासाठी सात वर्षीय मुलीचा बळी दिल्याप्रकरणी छत्तिसगड येथे दोघांना पोलिसांनी अटक केली.
स्त्री मुक्ती आंदोलनाच्या प्रेरणास्त्रोत : सावित्रीबाई फुले
- शंभू भाऊ बांदेकर
महात्मा ज्योतीबा फुले हे थोर क्रांतीकारक होते. बहुजनांचा आणि दलितांचा उद्धार, त्यांना शिक्षण देऊन जागृत केल्याखेरीज आणि आत्मोन्नतीची सूत्रे सर्वस्वी त्यांच्या हाती सोपवल्याखेरीज होऊ शकणार नाही हा मुलभूत सिद्धांत डोळ्यांसमोर ठेऊन महात्मा फुलेंनी जीवनाच्या अखेरपर्यंत काम केले. या कामात त्यांना त्यांची पत्नी सावित्रीबाईंनी क्रांतीकारकांच्या पत्नीला शोभेल अशी साथ देऊन स्त्री मुक्तीचा उद्धार करण्याचे काम केले. पुराणातल्या सावित्रीने यमापासून पतीचे प्राण परत मिळविले होते, तर या सावित्रीने पतीचा प्राण आपल्या प्राणात समाविष्ट करून त्यांच्या साथीने स्त्री शिक्षणाची गंगोत्री सामान्यांपासून असामान्यांपर्यंत पोचवली, आणि स्त्री शिक्षणाभिमुख होऊन आपल्या पायावर उभी राहील, स्वतःचे दास्यत्व झुगारून देऊन स्वावलंबन व समतेमध्ये स्वतःला सामील करून घेईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले.
पाच लाख नोकर्या!
नवे वर्ष देशात पाच लाख रोजगार निर्माण होणार असल्याची सुवार्त


































































