दिलखुलास

धोकादायक जीवघेणी दहीहंडी

विजय कापडी
‘अहो फुटाणे, मुंबईजवळच्या ठाणे शहरात गोकुळाष्टमीच्या काल्यानिमित्त रचलेल्या दहीहंडी फोडण्यासाठी रचलेल्या मानवी मनोर्‍यावर चढलेल्या एक कोवळ्या वयाच्या तरुणाचा मृत्यू झाला. ही दुख:द बातमी सांगून चणे फुटाण्यांकडे पाहत राहिले. फुटाणे म्हणाले, कधी कधी मला सगळ्यांचाच राग येतो. दहीहंडी फोडू पाहणार्‍या त्या गोविंदा पथकाचा, तो जीवघेणा खेळ आयोजित आणि प्रायोजित करणार्‍यांचा. अहो, मला एक सांगा श्रीकृष्णाच्या वेळेच्या दहीहंडीत काय लाख लाख रुपयांच्या नोटा असायच्या काय?साधे दही, लोणी वा दूध असायचे. आणि पेंद्यामंडळींसह बाळकृष्ण कधी मधी घरातल्या टांगून ठेवलेल्या शिंक्यावरच्या हंडीतून तो दही लोणी दूध पळवायचा. या मूळ गोड कल्पनेचे विकृत स्वरूप आज काल्याच्या दिवशी रस्त्यारस्त्यावर पाहायला मिळतं.
Read more...
 

उचलली जीभ आणि ...

विजय कापडी
हल्ली हल्ली प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या बॅडमिंटनपटू साईना नेहवालने टीकेचे फूल जोरात फटकावले. आणि पुढच्याच क्षणी आपले चुकले असल्याची कबुली दिली...’ ‘चणे, माणसाने दुसर्‍याशी बोलताना ते त्याला समजेल असेच बोलायला हवे...आत्ताच तुम्ही जे म्हणालात त्यातले साईना नेहवाल हे नाव सोडले तर मला कशाचाच बोध झालेला नाही. आणि टीकेचे फूल म्हणजे काय?’
Read more...
 

नाक

विजय कापडी
‘फुटाणे, मला सांगा नाक कधी गळून पडते का हो?’ ‘कसले निरर्थक प्रश्‍न विचारता, चणे? सर्दी झाली तर नाक गळते... पण म्हणून माणसाच्या चेहर्‍यावरचे नाक गळून कसे पडेल? माणसाचा चेहरा म्हणजे त्याचे डोके...डोक्यावरचे केस, कपाळ, कान, डोळे, नाक, तोंड, तोंडातले दात, ओठावरची मिशी, हनुवटी, गाल...गालावरची दाढी...आता काही पुरुषांच्या बाबतीत केस गळून पडतात. डोळ्यांच्या आरोग्याकडं नीट लक्ष दिलं नाही तर अंधत्व येऊ शकते, ऐकण्याची क्षमता कमी कमी होत जाऊन कान निकामी होतात. पण कानावर चष्म्याच्या काड्या ठेवता येतात, तोंडातले दात गळून पडतात.
Read more...
 

सचिनला कानपिचक्या?

विजय कापडी
‘मास्टर ब्लास्टर सचिनला भारतीय दलाचे मानद ग्रुप कप्तानपण मिळाल्यानंतर त्याचे विमान इतके म्हणून उंच उडाले की, आपण काय बोलत आहोत याचेच भान त्याला उरले नसावे.’ फुटाणे गंभीरपणे चणे यांच्याकडे पाहत म्हणाले. ‘का? काय झाले? सचिन बॅट ने बोलतो म्हणतात ना...तो तुमच्याजवळ तोंडाने बोलला काय?’ चणे यांनी विचारले. ‘अहो, तो चक्क म्हणाला की, त्याच्या एकवीस वर्षांच्या क्रिकेटकारकिर्दीत कोणत्याही भारतीय खेळाडूंशी बुकीने फिक्सींगसाठी संपर्क साधल्याचे त्याच्या ऐकिवात नाही...असं जर असेल तर माजी कप्तान अझरूद्दीन, तेज गोलंदाज मनोज प्रभाकर आणि हसरा फलंदाज अजय जडेजा यांचा पुढील खेळात समावेश होणे का बंद झाले?’
Read more...
 

मॅच फिक्सिंगचा बाऊ

विजय कापडी
‘फुटाणे, मॅच फिक्सिंगचा एवढा बाऊ कशासाठी करण्यात येतो आहे, हे माझ्या समजण्या पलिकडचं होऊन बसलं आहे.. ’ ‘चणे, त्यात नवीन ते काय सांगितलंत? तुमच्या समजण्यापलिकडच्या अनेक गोष्टी जगात नित्यनियमानं घडतच असतात’. ‘फुटाणे मला माझा मुद्दा सविस्तर न मांडू देता एकदम कुजका शेरा मारून मोकळे होण्याची तुमची सवय कधी जाईल? लौकरच जावो. ते असो. अहो, फिक्सिंग म्हणजे जुळवून आणणे असा जर अर्थ घेतला तर आयुष्यात आपण सारेच अनेक वेळा, अनेक बाबतीत फिक्सिंगच करत असतो की नाही? बाळ जन्माला येण्याची चाहूल लागली रे लागली की, डॉक्टर आणि त्याचे हॉस्पिटल फिक्स होते. जन्मानंतर हळूहळू वाढू लागले आणि त्याची घरातली कटकट वाढू लागली की काही तास तरी विनाकटकटीत, शांतीत जावेत म्हणून त्याच्यासाठी अंगणवाडीतली जागा फिक्स केली जाते. तेथून त्याचा शैक्षणिक प्रवास जो सुरू होतो तो त्याला एखाद्या ज्ञानशाखेच्या पदवीची सुरळी पदरात पडेपर्यंत चालूच असतो.
Read more...
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 37
 
This is a test