जि. प. निवडणुकांचे निकाल जाहीर

मंत्री-आमदारांचा पाठिंबा असलेल्यांना यश

उ. गो. जि. प. अध्यक्ष अमोल मोरजकर पराभूत

गेल्या रविवारी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. मतमोजणीसाठी सकाळी 8 वाजता सुरू झाली व पहिला निकाल सकाळी 10 वाजता जाहीर झाल्याचे राज्य निवडणूक आयुक्त पी. एम. बोरकर यांनी सांगितले. उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा अमोल मोरजकर यांना काल झालेल्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मंत्री व आमदार यांनी पाठिंबा दिलेल्या बहुतेक उमेदवारांचा या निवडणुकीत विजय झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. या निवडणुकीत कॉंग्रेससमर्थक उमेदवारांचा मोठ्या संख्येने विजय झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. उत्तर तसेच दक्षिण अशा दोन्ही ठिकाणी कॉंग्रेससमर्थक उमेदवारांचा मोठ्या संख्येने विजय झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, भाजपनेही या निवडणुकीत आपले समर्थक उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाल्याचा दावा केला आहे. भाजपचे किमान 6 ते 7 पदाधिकारी या निवडणुकीत विजयी झाल्याचे भाजप आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. शिवाय विजयी झालेल्यांमध्ये पक्षाच्या समर्थकांचाही समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काल प्रत्येक तालुक्यात मतमोजणीस्थळी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी रंगपंचमीच साजरी केली. आपला उमेदवार विजयी झाल्यामुळे आनंदी झालेल्या समर्थकांनी एकमेकांना गुलाल लावून आनंद व्यक्त केला. दरम्यान, मतमोजणी सुरळीतपणे पार पडल्याचे राज्य निवडणूक आयुक्त पी. एम. बोरकर यांनी सांगितले.

विजयी उमेदवारांची यादी

1 मांद्रे श्रीमती मांजरेकर 3257 2 कोरगाव दीपक कळंगुटकर 2751 3 धारगळ सुरंगी हरमलकर 3485 4 तोरशे पांडुरंग परब 4971 5 थिवी डायना ब्रागांझा 5928 6 हळदोणे कुंदा बागकर 5090 7 पेन्ह द फ्रान्स गुपेश नाईक 5218 8 कळंगुट आबेलिना मिनेझिस 5388 9 हणजूण वासुदेव कोरगावकर 2804 10 साळगाव मायकल लोबो 4742 11 ताळगाव जानू रुझारिओ 6478 12 सांताक्रुझ सुरेश पालकर 3784 13 चिंबल छाया नाईक 4739 14 आगशी आंतोनियो सिल्वेरा 5537 15 चोडण वृंदा नाईक 3551 16 कुंभारजुवे धाकू मडकईकर 4695 17 लाटंबार्से शिल्पा नाईक 4165 18 पाळी लक्ष्मीकांत परब 2545 19 कुडणे फोंडू सावंत 2234 20 होंडा अशोक गावस 7900 21 नगरगाव उमलो गावडे 6815 22 कुर्टी दीपिका प्रभू 6137 23 तिवरे गोकुळदास नाईक 3787 24 वेलिंग शिवदास गावडे 4724 25 मये मेघना महेश येंडे 26 बांदोडा पौर्णिमा नाईक 27 कवळे शैला बोरकर 28 शिरोडा नारायण कामत 29 सांकवाळ अपर्णा नाईक 7202 30 कुठ्ठाळी सिंथिया डिसिल्वा 4572 31 नुवे विल्फ्रेड डिसा 4809 32 राय डॉमनिक गावकर 4059 33 दवर्ली मारिया मिरांडा 4193 34 कुडतरी वीणा लॉरेन्स 4511 35 गिरदोली सीमा डायस 4629 36 चिंचिणी साब्रिना डायस 2239 37 वेळ्ळी अँथनी रॉड्रिग्स 2876 38 बाणावली मारिया रिबेलो 5555 39 कोलवा नेली रॉड्रिग्स बिनविरोध 40 सावर्डे प्रदीप देसाई 3192 41 धारबांदोडा रश्मी लांबोर 4094 42 रिवण नवनाथ नाईक 2463 43 शेल्डे रुझारियो फर्नांडिस 3740 44 बाळ्ळी सुप्तिका गावकर 2350 45 फातर्पा खुशाली वेळीप 3426 46 खोला कृष्णा वेळीप 2822 47 पैंगीण दया पागी 3741 48 रेईश मागूश जयेश साळगावकर 49 शिवोली दीपक धारगळकर 50 नावेली उमेदवाराचे निधन झाल्याने रद्द
 
 
This is a test