जांबावलीत गुलालोत्सव उत्साहात साजरामठग्रामस्थ हिंदू सभेतर्फे जांबावली येथील श्री दामोदर संस्थानात काल प्रसिद्ध गुलालोत्सव साजरा झाला. काल दुपारी 3 वाजता श्रीरामनाथ देवस्थानातील प्रांगणातील श्रीदेवावर गुलाल अर्पण करून या उत्सवास सुरुवात झाली व काही वेळातच सर्व परिसर गुलालमय झाला. तत्पूर्वी सुवारीवादन झाले. या गुलालोत्सवासाठी गोव्याच्या कानाकोपऱ्यातून व राज्याबाहेरूनही हजारो लोक आले होते. दुपारी 11 वाजल्यापासून लोकांनी जांबावली येथे जमावयास सुरुवात केली होती. अन्नसंतर्पणानंतर गुलाल उधळण्यास प्रारंभ झाला. गेल्या बुधवारपासून जांबावली येथे शिशिरोत्सव सुरू असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम व सुवारीवादन होत असे. आज बुधवारी धुळपेठने शिशिरोत्सवाची सांगता होणार आहे. |