मोरजीत घरवजा मांगरांना आग लागून लाखोंची हानी

कान्नाईकवाडा-मोरजी येथील सुरेश शंकर मांद्रेकर, नागेश शंकर मांद्रेकर, वासुदेव शंकर मांद्रेकर, सदाशिव श्रीपाद मांद्रेकर आणि जनार्दन श्रीपाद मांद्रेकर यांच्या एकूण तीन घरवजा मांगराना काल सायंकाळी 7 वाजता अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आत बांधकाम साहित्य, किमती फर्निचर, नारळ आणि इतर वस्तू जळून पूर्णपणे खाक झाल्या. शेजाऱ्यांनी जवळच्या विहिरीला दोन पंप लावून पाण्याद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीचा भडका एवढा मोठा होता की मांगर संपूर्ण जळून खाक झाले. तत्पूर्वी पेडणे अग्निशमन दलाला कळविण्यात आले. परंतु कान्नाईकवाडा येथील अंतर्गत रस्ता अरुंद असल्याने वाहनाला यायला अर्धा तास लागला. तरीही अग्निशमन दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. घटनास्थळी आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भेट देऊन सरकारने लवकरात लवकर संबंधितांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
 
 
This is a test