सावर्डे येथे आत्महत्यासावर्डे आनंदवाडी येथील विश्वास कामत (48) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि पुत्र असा परिवार आहे. कामत हे गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सावर्डे येथील व्यायामशाळेत क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करत होते. त्याचबरोबर वाद्यवृंदामध्ये गायक म्हणूनही कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची मन:स्थिती ठीक नव्हती. आपण आयुष्यात काही करू शकत नसल्याची खंत व्यक्त केलेली चिठ्ठी त्यांच्या मृतदेहाजवळ सापडली. |