खासगी बसमालकांची तिकीट दरवाढीची मागणी

खासगी बसमालकांनी आपले जुनेच रडगाणे पुन्हा सुरू करताना पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तिकीट दरवाढीची मागणी केली आहे. पहिल्या तीन कि.मी.साठीचे 5 रुपयांचे हे तिकीटदर वाढविण्याची आमची मागणी नाही. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक कि.मी.मागे असलेले 45 पैसे हे दर वाढवून 65 पैसे एवढे करावेत, अशी मागणी खासगी बसमालक संघटनेने वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांना सादर केलेल्या एका निवेदनातून केली आहे. त्याचबरोबर खासगी बसमालकांना डिझेलवर सबसिडी देण्यात यावी तसेच प्रत्येक खासगी बसगाड्यांवर कंडक्टर्स आणि ड्रायव्हर्स म्हणून काम करणाऱ्यांसाठी सरकारने समाजकल्याण खात्यामार्फत मदत योजना सुरू करावी, अशी मागणी करण्याबरोबरच वाहतूक खात्याने आपल्या मडगाव व केपे येथील कार्यालयांत सहाय्यक वाहतूक संचालकांची नियुक्ती करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. याशिवाय राज्यात वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाड्यांना जो प्रवासीकर आकारण्यात येत असतो तो रद्द करण्याची तसेच विद्यार्थ्यांना जी अर्ध्या तिकीटांची सवलत आहे ती त्यांना घरापासून विद्यालयांपर्यंतच जाण्यासाठी देण्याची मागणीही संघटनेने केली आहे.
 
 
This is a test