ठळक बातम्या

दुधाची भेसळ करणारी टोळी मुंबईत पकडली

नामांकित डेअरींच्या ब्रॅंडेड दुधात पाणी मिसळून ते दहिसर, बोरिवली, शिवाजी नगर भागात वितरीत करणाऱ्या एका मोठ्या टोळीला काल अन्न व औषध प्रशासनाने तीन ठिकाणी छापे टाकून पकडले. अमूल, मदर डेअरी यासारख्या नामांकित कंपन्यांच्या ब्रॅंडेड दुधात ही टोळी पाणी मिसळीत असे.
Read more...
 

कॉन्स्टेबल संजय परब फरारी घोषित

अटाला प्रकरणी निलंबीत केलेला पोलीस शिपाई संजय परब पोलिसांना न सापडल्याने त्याला पोलिसांनी फरारी म्हणून घोषित करून त्याच्याविरुध्द अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
Read more...
 

रेल्वेच्या जाहिरातीत दिल्ली पाकिस्तानात!

पूर्व रेल्वेने काल देशभरातील काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत नवी दिल्ली चक्क पाकिस्तानात दाखविण्यात आली असून कोलकता बंगालच्या उपसागरात दाखवली गेली आहे. रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते शुभारंभ होणाऱ्या महाराजा एक्स्प्रेसच्या उद्‌घाटन समारंभाच्या या जाहिरातीत हा घोळ घातला गेला आहे.
Read more...
 

कारोलिना पो यांची मनपा महापौरपदी फेरनिवड

पारेख उपमहापौर

पणजीच्या महापौर म्हणून कारोलिना पो तर उपमहापौर म्हणून यतीन पारेख यांची काल फेरनिवड करण्यात आली. गुप्त मतदान पध्दतीचा अवलंब न केल्याच्या तसेच गेल्या तीन वर्षांच्या काळात कोणतीही विकासकामे न केल्याच्या निषेधार्थ भाजप पुरस्कृत नगरसेवकांनी निवडणूक प्रक्रियेच्या वेळी सभात्याग केला.
Read more...
 

"निवृत्त' शिक्षकांचा आज "मेणबत्ती' मोर्चा

"बेरोजगार युवकांना संधी मिळावी म्हणून भाजप राजवटीत 58 वर्षे पूर्ण केलेल्यांना सक्तीने निवृत्तीवर पाठविलेल्या शिक्षकांवर झालेला अन्याय दूर करण्याच्या मागणीसाठी विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस आज संध्याकाळी 7 वाजता शहरात मेणबत्त्या लावून मोर्चा काढण्याचा निर्णय डिस्क्रिमिनेटेड टीचर्स फोरमने घेतला आहे.
Read more...
 
<< Start < Prev 361 362 363 364 365 366 367 368 369 370 Next > End >>

Page 362 of 744
 
This is a test