व्हायब्रंट गोवा परिषदेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

0
100

>> १७ पासून श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्हायब्रंट गोवा परिषद २०१९ च्या कामकाजाचा आढावा काल घेतला.
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचारात सहभागी होऊन मुख्यमंत्री डॉ. सावंत रविवारी संध्याकाळी गोव्यात परतले आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत मागील गुरुवार दि. १० ऑक्टोबरला प्रचारासाठी महाराष्ट्र राज्यात गेले होते. यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये जाऊन व्हायब्रंट गोवा परिषद २०१९ च्या कामकाजाचा आढावा घेतला. येत्या गुरुवार १७ ते १९ ऑक्टोबर २०१९ दरम्यान व्हायब्रंट गोवा परिषद होणार आहे. यात देश – विदेशातील उद्योजक, व्यावसायिक सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्हायब्रंट परिषदेचे आयोजन, सुरक्षा व्यवस्था व इतर महत्त्वाच्या बाबीची माहिती जाणून घेऊन संबंधितांना आवश्यक सूचना केल्या आहेत.

व्हाय्रबंट गोवा ग्लोबल एकस्पो अँड समिट २०१९ मध्ये ५०० पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बिझनेस कन्व्हेक्शनसाठी गोव्यासह भारतातील बिझनेज समूहाने २७५ बूथचे बुकिंग केले आहे, परिषदेत खिमजी रामदास एलएलसीचे पार्टनर व संचालक पंकज खिमजी, ओमानच्या सल्तनतमधील मोठे व्यावसायिक आणि मिनरल डेव्हलपमेंट ओमान (एमडीओ)चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक नासीर अल मकबली आणि दुबईतील राज ग्रुपसह इतर कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुस्तङ्गा सासा व इतरांची व्याख्याने होतील.

परिषदेतील इतर गोष्टी

डेक्कन समूहाद्वारे इनोव्हिवा वेस्ट मॅनेजमेंट सोल्यूशन्स कंपनी हे झिरो वेस्ट मॅनेजमेंट उपक्रमासाठी पार्टनर असणार आहेत. या तीन दिवसीय कार्यक्रमात कचरा होणार नाही, म्हणून ते कटिबद्ध असणार आहेत.
गोव्यातील टिटो ग्रुपतर्ङ्गे जगातील सर्वांत मोठे ङ्गेनी कॉकटेल करण्यात येणार असून गोल्डन वर्ल्ड रेकॉर्ड ऑर्गनायझेशनकडून प्रमाणपत्र मिळविण्यात येणार आहे.
द इन्स्टिट्यूट ऑङ्ग इंडियन इंटेरिअर डिझायनर्स (आयआयआयडी) गोवा चाप्टरतर्ङ्गे या उपक्रमासाठी इको पार्टनर असणार्‍या ङ्गोमेंतो ग्रुपच्या मदतीने पर्यावरण विषयावर लांब चित्र साकारण्यात येणार आहे.