यष्टिरक्षक रिझवानचे झुंजार अर्धशतक

0
416

इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवसाचा खेळ अंधुक प्रकाशामुळे थांबवण्यात आला त्यावेळी पाकिस्तानने ८६ षटकांत ९ गडी गमावून २२३ धावा केल्या होत्या. यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान ६० धावा करून नाबाद होता. त्याने ११६ चेंडूंचा सामना करताना आपल्या अर्धशतकी खेळीत ५ चौकार लगावले होते. कसोटीत अर्धशतकी वेस ओलांडण्याची त्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथे त्याने ९५ धावांची खेळी साकारली होती. १७ वर्षीय वेगवान गोलंदाज नसीम शाह एक धाव करून त्याला साथ देत होता. बाबर आझम अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत होता.

परंतु, वैयक्तिक ४७ धावांवर ब्रॉडने त्याचा काटा काढला. १२७ चेंडू खेळून बाबरने चांगला प्रतिकार केला. परंतु, ब्रॉडचा झपकन आत आलेलला चेंडू त्याच्या बॅटची कड् घेऊन यष्टिरक्षक जोस बटलरच्या ग्लोव्हजमध्ये जाऊन विसावला. इंग्लंडकडून ३८ वर्षीय स्विंग गोलंदाज जेम्स अँडरसनने ४८ धावांत ३, स्टुअर्ट ब्रॉडने ५६ धावांत ३ तर सॅम करनने ४४ धावांत १ व ख्रिस वोक्स याने ५५ धावांत १ गडी बाद केला. शाहीन आफ्रिदी सिबलीच्या थेट फेकीवर धावबाद झाला. इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवसाचा खेळ अंधुक प्रकाशामुळे थांबवण्यात आला त्यावेळी पाकिस्तानने ८६ षटकांत ९ गडी गमावून २२३ धावा केल्या होत्या. यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान ६० धावा करून नाबाद होता. त्याने ११६ चेंडूंचा सामना करताना आपल्या अर्धशतकी खेळीत ५ चौकार लगावले होते. कसोटीत अर्धशतकी वेस ओलांडण्याची त्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथे त्याने ९५ धावांची खेळी साकारली होती. १७ वर्षीय वेगवान गोलंदाज नसीम शाह एक धाव करून त्याला साथ देत होता. बाबर आझम अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. परंतु, वैयक्तिक ४७ धावांवर ब्रॉडने त्याचा काटा काढला. १२७ चेंडू खेळून बाबरने चांगला प्रतिकार केला. परंतु, ब्रॉडचा झपकन आत आलेलला चेंडू त्याच्या बॅटची कड् घेऊन यष्टिरक्षक जोस बटलरच्या ग्लोव्हजमध्ये जाऊन विसावला. इंग्लंडकडून ३८ वर्षीय स्विंग गोलंदाज जेम्स अँडरसनने ४८ धावांत ३, स्टुअर्ट ब्रॉडने ५६ धावांत ३ तर सॅम करनने ४४ धावांत १ व ख्रिस वोक्स याने ५५ धावांत १ गडी बाद केला. शाहीन आफ्रिदी सिबलीच्या थेट फेकीवर धावबाद झाला.