मोदी, शहांकडून जनतेची दिशाभूल

0
90

राहुल गांधींची प्रचारसभेत टीकाकर्जमाफीचा इतका गाजावाजा केला गेला. मग महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली का? असा सवाल कॉंग्रेसचे राहुल गांधी यांनी केला.

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्टातील लातूर औसा येथे आपल्या पहिल्या प्रचार सभेत राहुल गांधी बोलत होते. उद्योगपतींचे साडेपाच लाख कोटींचे कर्ज माफ झाले मात्र, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली का? मोदी, शहा मूळ प्रश्नांवरून जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात कॉंग्रेसची पाळेमुळे रुजत असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकरी, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले. गेल्या ४० वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी भारतात निर्माण झाल्याचे सांगत मोदींनी देशाचे वाटोळेे केले.

चंद्रावर रॉकेट पाठवून तरुणांचे पोट भरणार नाही. त्यांनारोजगार द्या, असा हल्ला चढवला. यावेळी राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर नोटाबंदीवरून लक्ष हटवण्यासाठी चांद्रयान आणि कलम ३७० चे मुद्दे रेटले जात असल्याचा आरोप केला. इस्रोची स्थापना कॉंग्रेसने केली मात्र त्याचे श्रेय भाजप घेत आहे. जीएसटीमुळे व्यापार्‍यांचे हाल होत आहेत. गुजरातमधील कापड उद्योग, हिरे व्यापारी मंदीच्या गर्तेत सापडले आहेत. पण त्यांच्याबद्दल माध्यमांमध्ये एक शब्दही लिहून येत नाही असे राहुल गांधी म्हणाले.