‘भारत की लक्ष्मी’ अभियान चालवा

0
113

>> पंतप्रधान मोदींचे मन की बातमध्ये आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बातमध्ये बोलताना देशवासीयांना भारत की लक्ष्मी अभियान चालवा असे आवाहन केले. ‘सेल्फी विथ डॉटर’च्या धर्तीवर हे अभियान चालवताना आपल्या कुटुंबात, समाजात असलेल्या अनेक मुली आपल्याकडील कौशल्याने देशाचे नाव उज्जवल करत असतात. अशा मुलींचा या दिवाळीत सन्मान करूया. ‘भारत की लक्ष्मी’ असा हॅशटॅग वापरून तुम्ही सोशल मीडियावर फोटो अपलोड करून त्यांचा सन्मान करा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

आपल्या दुसर्‍या कार्यकाळातील चौथ्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींनी काल रविवारी नशामुक्तीपासून प्लास्टिकमुक्तीपर्यंतचे आवाहन करत देशवासीयांना दसरा व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, कालच्या मन की बातमध्ये आपल्यासोबत एक विशेष पाहुणा असल्याचे पंतप्रधान यांनी ट्विट करत सांगितले होते. त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता होती. हा विशेष पाहुणा म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर होत्या. मोदींनी लतादीदींसोबत त्यांच्या वाढदिवशी २८ सप्टेंबर रोजी झालेले संभाषण या कार्यक्रमात ऐकवले.
दरम्यान, पंतप्रधानांनी नवरात्र व दीपावलीच्या शुभेच्छा देताना, सणवारांचा खरा आनंद वंचित लोकांच्या चेहर्‍यावर हसू आणण्यात आणणं. त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यात आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देशवासीयांनी ’भारताची लक्ष्मी’ अभियान चालवावे, असं आवाहन केले.

तंबाखू, ई-सिगारेट सोडण्याचं आवाहन
दरम्यान, यावेळी पंतप्रधानांनी तरुणांना तंबाखू, ई-सिगारेट सोडण्याचे आवाहन केले. अनेकदा किशोरवयीन मुले फॅशन म्हणून, मजेसाठी तंबाखू सेवन करतात आणि धुम्रपान करू लागतात आणि त्यानंतर ती नशेची शिकार बनतात. ई-सिगारेटही सिगारेट, तंबाखूइतकीच धोकादायक असल्याचे मोदी म्हणाले. पीएम मोदी यांनी ’मन की बात’ कार्यक्रमात टेनिसपटू डेनिल मेदवेदेवचा उल्लेख केला. मेदवेदेवचं कौतुक करत तो तरुणांची प्रेरणी असल्याचं ते म्हणाले.