भारताला कांस्यपदक

0
117

सात वर्षांपूर्वी रशियातील आयएएएफ वर्ल्ड रेस वॉकिंग कप स्पर्धेतील पदक थोडक्यात हुकल्यानंतर भारतासाठी काल आनंदाची बातमी आली. या स्पर्धेत द्वितीय स्थानावर राहिलेल्या युक्रेनच्या संघातील एक सदस्य उत्तेजक चाचणी दोषी आढळल्यामुळे त्यांचे पदक हिसकावण्यात आले आहे. त्यामुळे चौथ्या स्थानावर राहिलेल्या भारताला कांस्यपदक मिळाले आहे. भारतीय संघात के.टी. इरफान, बाबूभाई पानुचा व सुरिंदर सिंग यांचा समावेश होता. २०१२ साली मे महिन्यात सारान्स्क येथे झालेल्या या स्पर्धेत भारताला २० किलोमीटर सांघिक प्रकारात चीन, युक्रेन व ऑस्ट्रेलियानंतर चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले होते. पदक जिंकून सात वर्षे लोटल्यानंतर युक्रेनला ऍथलिट रुसलान दिमत्रेंको दोषी आढळल्याने युक्रेनला पदक गमवावे लागले आहे. रुसलान याची कामगिरी हटवूनही भारत व युक्रेन यांचे समान ६८ गुण झाले होते. परंतु, भारताचा तिसरा सर्वोत्तम धावपटू २९वा तर युक्रेनचा ५१वा असल्याने भारताला कांस्य मिळाले. वैयक्तिक प्रकारातही रुसलानने मिळविलेले कांस्यपदक हिसकावून घेण्यात येणार आहे.