भय इथले संपत नाही…

0
122

>> साळ, पेडण्यात पाणी ओसरले पण भीती कायम

तिलारी धरणाच्या जलविसर्गामुळे व मुसळधार पावसामुळे महापुराचा तडाखा बसलेल्या साळ गावातील पूर ओसरला आहे. पुलाखाली पाणी गेल्याने व पाणी ओसरू लागल्याने साळवासीयांना थोडा धीर आला असला तरी लाखो रुपयांची शेती बागायतीची, घरांची हानी झाल्याने ते भीतीच्या छायेत आहेत. दरम्यान, साळ नदीवरील बंधारा ङ्गूटब्रिज पूर्णपणे उखडला असून भलीमोठी लाकडे, ओंडके अडकून असल्याने या पुलावरून वाहतूक व लोकांनीही ये जा करू नये असा आदेश मामलेदार प्रवीणजय पंडित व जलसंसाधान खात्याचे अधिकारी के. पी. नाईक यांनी जारी केला आहे.
सर्वत्र तलाठ्यांमार्फत नुकसानाचा आढावा घेतला जात आहे.

जलसंसाधान खात्याने साळ बंधारा व पुलावरील ओंडके, झाडे व अडकलेले सामान तसेच दुरुस्ती व सङ्गाई सुरू केली आहे. यासाठी सर्व यंत्रणा वापरून मदतकार्य सुरू आहे असे श्री. नाईक यांनी सांगितले.
अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून अनेक कुटुंबे अजूनही इतर ठिकाणी वास्तव्य करून आहेत. सुमारे ४० कोटी रुपये खर्चून साकारण्यात आलेले पंपिंग स्टेशन पाण्याखाली गेले होते. तेथे अजूनही पाणी असल्याने मोठे नुकसान झाले आहे.

डिचोली तालुक्यात मोठी पडझड
डिचोली तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड झाली असून १०० च्या आसपास घरांची हानी झाली आाहे. शेती बागायती व इतर हानी मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. डिचोली व साखळीतील परिस्थिती आटोक्यात असून नियंत्रण कक्ष स्थितीवर लक्ष ठेवून आहे.

डिचोलीत ९० घरांची हानी
दरम्यान, डिचोली तालुक्यातील सुमारे दोन महिन्यांच्या पावसात किमान ९० आसपास घरांची हानी झालेली असून त्यांना तातडीची मदत पुरवावी अशी मागणी होत आहे. पावसाने कहर केल्याने जमीन खचली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेतली. त्यात सर्व नुकसान, शेती-बागायतीची हानी, लोकांचे पुनर्वसन करण्याबाबत विचार मंथन झाले केंद्राकडून विशेष मदत घेण्यासाठी बोलणी केली असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
मये, साळ, आमोणा, कुडणे, वेळगे, सुर्ला, हरवळे, कासारपाल, दोडामार्ग, मुळगाव, मेणकुरे, पाळी, मायणा, न्हावेली आदी भागात घरांची पडझड झाली आहे. काहींचे अर्ज जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात असले असून अजूनही अहवाल केला जात आहे असे सांगण्यात आले. काल शुक्रवारी वेळगे येथे घर कोसळून ५०००० ची हानी झाली. डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत कार्य केले.
ज्या घरांची हानी झाली आहे त्या सर्वांना विशेष आर्थिक मदत पुरवावी अशी मागणी डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर व मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी केली आहे.

बागायती व शेती उद्ध्वस्त
साळ, मेणकुरे, धुमासे, आमोणा, मये व इतर तालुक्यातील अनेक भागातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेकडो शेतकरी नुकसानाच्या खाईत सापडले आहेत. साळ, मेणकुरे आदी भागातील बागायती पूर्णपणे वाहून गेल्या असून पुरामुळे अतोनात हानी झाली आहे. नारळ बागा, चारा तसेच पंप, झोपड्या सर्व उद्ध्वस्त झाले असून या सर्वांना मोठी भरपाई देऊन पुन्हा धीर देणे गरजेचे आहे. केंद्राकडून विशेष मदत मागून ती तातडीने वितरित करण्यात यावी अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्ये यांनी सरकार दरबारी केली आहे.

सरकारी यंत्रणेचे आभार
दरम्यान, साळ गावात पुराने थैमान घातल्यानंतर डिचोली मामलेदार श्री. पंडित, उपजिल्हाधिकारी श्री. देसाई, सर्व यंत्रणा, पोलीस अग्निशामक दल, जलसंसाधन खात्याचे श्री. नाईक, सभापती, मुख्यमंत्री, जिल्हा पंचसदस्य, सर्व पंच, सारे गावकरी एकत्र येऊन या महासंकटाचा मुकाबला कला. यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. त्या सर्वांचे गावच्यावतीने सरपंच घनःश्याम राऊत यांनी आभार व्यक्त केले आहेत.

पेडण्यात पूर ओसरला पण अद्यापही धोका
जोरदार पाऊस व नदीला आलेला महापूर याची भीती आजही पेडणे तालुक्यातील शापोरा नदी किनारी भागातील जनतेच्या मनात आहे.
काल पावसाने उसंत घेतली आहे. शापोरा नदीवरील थर्मास, वजरी, इब्रामपूर या भागातील पुलाखाली खांबांना मोठमोठी झाडे, ङ्गांद्या, केळीची झाडे अडकून अडथळा निर्माण झाला आहे. इब्रामपूर, हळर्ण, तळर्ण, चांदेल, कासारवर्णे या भागातील शेतकर्‍यांची १२ हजारांपेक्षा जास्त केळीची झाडे वाहून गेली त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान ह्या हंगामात त्यांचे झाले आहे.

पूरग्रस्त भागात पाण्याचा जोर कमी असला तरीही वीज आणि संपर्क माध्यम टेलिङ्गोन सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पूर्णपणे जनसंपर्क तुटला असून तो अजून पूर्वपदावर आलेला नाही. अनेक रस्त्यांशेजारी दरड कोसळून अनेक वीज खांब जमिनीवर कोसळलेले आहेत.