पंतप्रधान मोदी यांची आज गोव्यात सभा

0
112

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज ताळगाव पठारावरील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होणार आहे. स्टेडियममध्ये सुमारे १० हजार एवढी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय स्टेडियमबाहेर मोठा शामियाना उभारण्यात येणार असून तेथे लोकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. शामियान्यात स्क्रीनची व्यवस्था असल्याने तेथे लोकांना स्क्रीनवरून मोदी यांचे भाषण ऐकता येणार आहे. मोदी यांची गोव्यात होणारी ही तिसरी जाहीर सभा असून पंतप्रधान झाल्यानंतरची त्यांची ही दुसरी जाहीर सभा आहे.