दोन बसगाड्यांची टक्कर; दहा जखमी

0
127

>> दिकरपाल-मडगाव येथे भरधाव वेगात बसेसच्या शर्यतीमुळे अपघात

सावर्डे येथून मडगावच्या दिशेने येणार्‍या दोन खाजगी प्रवासी बसच्या शर्यतीत दिकरपाली येथे सकाळी लकाकी जवळ अपघात होऊन बसमधील दहा व स्कुटरवरील दोघे जखमी झाले. काल सकाळी १०.३० वा. हा अपघात झाला.

सावर्डे येथून जीए ०९ यु ५८०३ क्रमाकांची खासगी प्रवासी बस मडगाव येथे येत होती. त्यामागे जीए ९ यु ५७५८ क्रमाकांची प्रवासी बस येत होती. लकाकी जवळ एक कार उजव्या रस्त्याने वळली असता पुढची बस थांबली. त्याचवेळी मागून भरवेगाने निघालेल्या बसची जोरदार धडक मागच्या बाजूने पुढच्या बसला बसली व दोन्ही बसमधील दहा प्रवासी जखमी झाले. त्यांत ज्योनिता मास्कारेन्हास (काकोडा) मनीषा च्यारी (४२ केपे) पद्मा नंदिखोल, शंकर नंदिखोल (सावर्डे), ज्यास्मिता मेंडोसा, कमल गोपाल, भुवनेश्‍वर, गोपाल चांद केलदी, बसुराज हे प्रवासी जखमी झाले.

त्याचवेळी समोरून जीए ०८ वाय ३५७५ क्रमांकाची स्कुटर केपेला निघाली होती. स्कुटर चालकाचा ताबा गेला व त्याने स्कुटरची धडक बसला दिली. त्यांत स्कुटरस्वार शेख अहमद मागे बसलेला कबीर यल्लाप्पा काळे हे दोघे जखमी झाले. तात्काळ बाजूचे लोक व मायणा कुडतरी पोलिस तेथे पोहचले व जखमींना हॉस्पिसियु हॉस्पिटलांत नेण्यात आले. तेथे प्रथमोपचारानंतर त्यांना दुपारी घरी पाठविण्यात आले.

चालकांच्या लायसन्स रद्दचा प्रस्ताव
पोलिस निरिक्षक गुरुदास कदम यांच्या नेतृत्वाखाली तेजस नाईक यानी पंचनामा केला. भरधाव व निष्काळजीपणे बसेस हाकल्याने हा अपघात झाल्याचे सांगून दोन्ही बसचे चालक रणजीतकुमार व अँथनी रिबॅलो यांचे ड्रायव्हिंग परवाने व बसचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी वाहतूक खाते व जिल्हाधिकार्‍यांना पाठविला आहे.