दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा ः नितिश कुमार

0
112

बिहारचे मुख्यमंत्री तथा सत्ताधारी एनडीएचे घटक असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाचे अध्यक्ष नितिश कुमार यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळायला हवा, असे वक्तव्य करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या यासंबंधीच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. नितिश कुमार यांनी एका सभेत बोलताना हे वक्तव्य केले.
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळायला हवा ही आमच्या पक्षाची नेहमीच मागणी राहिली आहे. तसेच बिहारला विशेष राज्य दर्जा मिळायला हवा अशीही आमची मागणी आहे. दिल्लीतील बदरपूर येथील जेडीयूच्या कार्यकर्त्यांच्या सभेत बोलताना कुमार यांनी याप्रकरणी भूमिका स्पष्ट केली.

दिल्लीसाठी बिहारचे लोक खूप काम करीत आहेत. येथे मोठ्या संख्येने बिहारी लोक राहतात. त्यांनी एखाद्या दिवशी काम न करण्याचे ठरवले तर दिल्ली ठप्प होऊ शकते. दिल्लीला अशा राज्याचा दर्जा मिळायला हवा जेथे सर्व गोष्टींचा अधिकार राज्य सरकारला मिळायला हवा.