दिल्लीतील बलात्कार प्रकरणी चालकास न्यायालयीन कोठडी

0
76

दिल्ली बलात्कार प्रकरणातील टॅक्सीचालक शिवकुमार यादव याला येत्या २४ डिसेंबरपर्यंत चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्याने गुन्हा कबूल केल्याचे समजते.
दरम्यान दिल्ली पोलिसांनी सदर खासगी कंपनीकडे ते भाडेपट्टीवर घेत असलेल्या टॅक्सींच्या चालकांसंबंधीची सर्व कागदपत्रे सादर करण्यास फर्मावले आहे. ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेणारा अधिकारी सदर कंपनीकडे नसल्याच्या कारणाखाली एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अशा प्रकारचा अधिकारी असणे सर्व टॅक्सी सेवा कंपन्यांसाठी अनिवार्य आहे. दिल्ली पोलिसांनी सदर कंपनीविरुद्ध फसवणुकीचा व सरकारी आदेशाचे पालन न करण्याबाबतचा गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, शिवकुमार यादव याला कंपनीने दिलेला आयफोन जप्त करण्यात आला आहे.