टूरिस्ट टॅक्सींच्या मीटरप्रकरणी सरकारला अवमान नोटीस

0
98

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने टूरिस्ट टॅक्सींना डिजिटल मीटर न बसविल्याप्रकरणी राज्य सरकारला अवमान नोटीस काल जारी केली आहे. या अवमान नोटीसला मुख्य सचिवांनी दि. २२ ऑक्टोबरला उत्तर द्यावे, असा निर्देश न्यायालयाने दिला आहे.

राज्यातील टूरिस्ट टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्यासाठी टीटीएजीने वर्ष २०१६ मध्ये एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केली होती. गेल्या कित्येक वर्षे या याचिकेवर न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. राज्य सरकारने टूरिस्ट टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्याबाबत अनेकदा आश्‍वासने दिली. राज्य सरकारने जुलै २०१९ मध्ये येत्या १ ऑगस्ट २०१९ पासून टूरिस्ट टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्याचे काम सुरू केले जाणार असून सहा महिन्यात डिजिटल मीटर बसविण्याचे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन न्यायालयात दिले होते. परंतु, अद्यापपर्यंत न्यायालयाच्या दिलेल्या आश्‍वासनाची कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे.