ऊस उत्पादकांना मुख्यमंत्र्यांची ‘संजीवनी’बाबत ग्वाही

0
131

संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद केला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील ऊस उत्पादकांच्या एका शिष्टमंंडळाला काल दिली. शिष्टमंडळाने पर्वरी येथे मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन संजीवनी साखर कारखान्याच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, सहकार मंत्री गोविंद गावडे, सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांची उपस्थिती होती.
साखर कारखाना बंद करण्याचे उद्देश नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांनी घाबरू नये. शेतकर्‍यांनी लागवड केलेल्या उसाची खरेदी केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आमदार गावकर यांनी सांगितले.