आय लीग ३० नोव्हेंबरपासून

0
146

इंडियन सुपर लीगला भारतातील सर्वोच्च फुटबॉल लीगचा दर्जा देऊन आय लीगची द्वितीय विभागीय म्हणून अवनती केल्यानंतर स्पर्धेचा पहिला मौसम ३० नोव्हेंबरपासून खेळविला जाणार आहे. आय लीग प्रक्षेपणाच्या हक्कांबाबत पुढील आठवड्यापर्यंत निर्णय अपेक्षित आहे. एआयएफएफ लीग समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर द्वितीय विभागीय लीग परवाना प्रक्रिया सुरू करण्यासाठी दहा क्लबांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये भवानीपूर एफसी, मोहम्मदान एफसी, लोनस्टार कश्मीर, एआरए एफसी, एनजीआर फुटबॉल क्लब जम्मू, किकस्टार्ट एफसी कर्नाटक, एफसी बंगळुरू युनायटेड, एफसी केरला, गढवाल एफसी व एयू राजस्थान यांचा समावेश आहे. परवाना प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्यास पुढील वर्षापासून द्वितीय विभागीय लीगमध्ये खेळण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. आयएसएलमधील फ्रेंचायझी एटीके, जमशेदपूर एफसी, बंगळुरू एफसी, चेन्नईन एफसी, एफसी गोवा, केरला ब्लास्टर्स एफसी, मुंबई सिटी एफसी, हैदराबाद एफसी, तसेच पंजाब एफसी व एआयएफएफ विकास संघ द्वितीय विभागात खेळेल.