आयर्नमॅनच्या टपाल तिकिटाचे अनावरण

0
110

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मिरामार-पणजी येथील हॉटेल मेरियॉटमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आयर्नमॅन ७०.३ च्या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण केले.
भारतीय टपाल खात्याकडून हे टपाल तिकिट काढण्यात आले असून ४० पेक्षा अधिक वर्षांच्या आयर्नमॅनच्या इतिहासात अशाप्रकारे देशाच्या टपाल विभागाने प्रथमच पाठिंबा दिला आहे.

आयर्नमॅन ७०. ३ गोवा, हाफ डिस्टेंस ट्रायथलॉन रविवारी, २० ऑक्टोबर रोजी पणजी येथे आयोजित करण्यात आली आहे. भारतात होणारी ही पहिली आयर्नमॅन ७०.३ ची रेस आहे. यामुळे आयर्नमॅन स्पर्धेचे यजमान असणार्‍या ५३ देशांमध्ये भारताचा समावेश होणार आहे. प्रत्येक सहभागीला हे विशेष स्टॅम्प देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात जगभरातील २७ देशांमधील सुमारे १ हजारपेक्षा अधिक ट्रायथलेट्स भाग घेणार आहेत.
याप्रसंगी बोलताना डॉ सावंत म्हणाले, पंतप्रधान मोदींजीनी समोर ठेवलेल्या फिट इंडिया चळवळीला आधार देण्यासाठी आयर्नमॅन ७०.३ गोवा पार पडत असल्याचे पाहून आनंद होतो आहे. योस्का यांची फिटनेस आणि निरोगी जीवनाप्रतिच्या दृष्टिकोनाचे अभिनंदन करावे वाटते. त्यांच्यामुळेच गोव्याला जगाच्या नकाशावर खेळाच्या बाबतीत स्पोर्ट्‌स डेस्टिनेशनचे स्थान मिळाले आहे.