आयपीएल बेटिंग प्रकरणी दाबोळी-चिखलीत छापा

0
84

>> २९ लाख रोख व कागदपत्रे हस्तगत

गोवा आयकर विभागामार्फत दाबोळी चिखळी येथील सरकारी उपजिल्हाधिकारी इस्पितळामागील एका बंगल्यात छापा मारून २८ लाख रुपये रोख माल तसेच काही महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. छापा मारण्याचे छत्र मंगळवार दि. २ एप्रिलपासून सुरू होते. ते बुधवार दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळपर्यंत सुरू होते.
प्राप्त माहितीनुसार दाबोळी चिखली उपजिल्हा इस्पितळामागे एका मोठ्या बंगल्यात गोवा आयकर विभागाने छापा मारून २९ लाख रुपये व काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली असून विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा छापा पडला तेव्हा त्या बंगल्यात आयपीएल बेटिंग सुरू होते अशी माहिती मिळाली. नंतर मात्र हा छापा आयकर विभागाने टाकला असल्याचे स्पष्ट झाले.

छापा मारण्यात आलेल्या बंगल्यातून आयकर विभागाने लाखो रुपयांसहीत लॅपटॉप, हार्डडिक्स व महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. मात्र आयकर विभागाने अजूनही कोणाला अटक केल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. छापासत्र रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तसेच छापा मारण्यात आलेल्यांच्या वास्को येथील सराफी दुकानातसुद्धा जाऊन आयकर विभागाने काही लाखो रुपये व कागदपत्रे जप्त केली. गोवा आयकर विभागाने मात्र याविषयी काहीही बोलण्याचे टाळले.