26.6 C
Panjim
Saturday, August 15, 2020

कोविड इस्पितळ पूर्ण भरले

>> सरकारची कबुली : पर्याय विचाराधीन

मडगाव येथील कोविड-१९ इस्पितळातील सगळ्या २२० खाटा आता भरल्या असून या इस्पितळातील खाटा वाढवण्याबरोबरच गरज भासल्यास लवकरच उत्तर गोव्यातही एक कोविड-१९ इस्पितळ सुरू करण्यात येणार असल्याचे काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

कोविड इस्पितळ व व्यवस्थापन यासाठीचा सरकारचा प्लॅन बी तयार आहे. त्यामुळे कुणी घाबरून जायची गरज नाही, अशी माहितीही राणे यांनी काल पेडणे येथे बोलताना दिली.
कोविड इस्पितळासाठी जेवणाचा पुरवठा करणे आऊट सोर्स करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या हे काम जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयातर्फे करण्यात येत असल्याचे राणे म्हणाले.

गोव्यातील कोविड-१९ रुग्णांना रोगमुक्त करण्यासाठी ‘प्लाझ्मा थेरपी’चा अवलंब करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गोवा सरकारने भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाकडे (आय्‌सीएम्‌आर) केली आहे, अशी माहिती काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.

रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारे प्लाझ्मा म्हणजेच रक्तद्रव साठवून ठेवण्यासाठी सोय आमच्याकडे आहे, असे आम्ही आय्‌सीएम्‌आरला कळवले आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

‘प्लाझ्मा थेरपी’च्या परवानगीसाठी वैद्यकीय संशोधन मंडळाकडे प्रस्ताव
राज्यातील कोविड-१९ रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा उपचार पद्धतीचा अवलंब करण्यास आम्हाला परवानगी द्यावी, अशी लेखी स्वरूपातील मागणी आम्ही यापूर्वीच आय्‌सीएम्‌आरकडे केली आहे, असे राणे यांनी स्पष्ट केले.

प्लाझ्मा काढून घेण्यासाठी जे अत्यानुधिक यंत्र आवश्यक आहे ते लवकरच खरेदी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रक्त संक्रमण विभागात काम करण्यासाठी आणखी डॉक्टरांची भरती करण्यात येणार असल्याचेही राणे म्हणाले.

अतिरिक्त रुग्णवाहिका खरेदी करण्याचा विचार
कोरोना रुग्णांच्या लाळेचे नमुने गोळा करण्याच्या कामाला वेग यावा यासाठी आणखी ५० डॉक्टरांची भरती करण्यात येणार आहे. कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त रुग्णवाहिका खरेदी करण्याचाही विचार असल्याची माहिती त्यांनी दिली. कोविड-१९ संबंधीच्या परिस्थितीत दर आठवड्याला बदल होऊ लागला आहे. त्यामुळे कोविड-१९ संबंधीच्या स्थितीचा दर आठवड्यात फेरआढावा घ्यावा लागत असल्याचे ते म्हणाले. आवश्यक त्या सगळ्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करणे गरजेचे असून त्याकामी लोकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. ताळगाव येथील एका कोविड रुग्णाला रुग्णवाहिकेसाठी कित्येक तास वाट पाहत थांबावे लागले होते, हे आरोग्यमंत्र्यांनी मान्य केले.

उद्योजकांची समाजिक जबाबदारी (सीएस्‌आर) अंतर्गत रुग्णवाहिका दान केल्या जाव्यात यासाठी सरकारने काही उद्योजकांशी संपर्क साधला असल्याचे राणे म्हणाले.

गरज भासल्यास उत्तर गोव्यात कोविड इस्पितळ

देशामध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असताना गोव्यातही आता रुग्णांची संख्या वाढत आहे. हे सर्व रोखण्यासाठी सर्वांनी आपल्या आरोग्याची तसेच इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून या महामारीला रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि आरोग्य खाते सक्षम आहे. रुग्णसंख्या वाढल्यास आणि गरज भासल्यास उत्तर गोव्यात कोविड इस्पितळ उभारण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी पेडणे येथे काल दिली.

STAY CONNECTED

850FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अजून खूप जायचे आहे पुढे…

प्रिय वाचकहो, नमस्कार!आपल्या सर्वांचे लाडके दैनिक नवप्रभा आज ५० वर्षांची सुवर्णमहोत्सवी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून हीरक महोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे....

राज्यात ४७६ नवे कोरोना रुग्ण

>> दोघांचा मृत्यू, बळींची संख्या ९३, एकूण रुग्णसंख्या १०,९७० राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ४७६...

प्लाझ्मा उपचारामुळे दोघे कोरोनामुक्त

>> गंभीर कोरोनाबाधितांवर गोमेकॉत उपचार ः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

पहिल्या मानवी चाचणीत भारतीय लस सुरक्षित

कोरोनासंबंधी भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन ही लस देशातील १२ शहरांतील ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. या लसीच्या पहिल्या...

ALSO IN THIS SECTION

राज्यात ४७६ नवे कोरोना रुग्ण

>> दोघांचा मृत्यू, बळींची संख्या ९३, एकूण रुग्णसंख्या १०,९७० राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ४७६...

प्लाझ्मा उपचारामुळे दोघे कोरोनामुक्त

>> गंभीर कोरोनाबाधितांवर गोमेकॉत उपचार ः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

पहिल्या मानवी चाचणीत भारतीय लस सुरक्षित

कोरोनासंबंधी भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन ही लस देशातील १२ शहरांतील ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. या लसीच्या पहिल्या...

अशांतता पसरवल्यास योग्य प्रत्त्युत्तर ः राष्ट्रपती

जर कोणीही अशांतता परसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल असा कठोर संदेश चीनचे नाव न घेता स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला...