27 C
Panjim
Saturday, August 15, 2020

केपे, कुंकळ्ळी मतदारसंघात नादुरुस्त ईव्हीएममुळे नाराजी

सासष्टी तालुक्यातील आठही विधानसभा मतदारसंघात मतदारांमध्ये यावेळी निरुत्साह दिसून आला. केपे मतदारसंघातील आंबावली, नुवें, वेर्णा, फात्राडे, बेतुल व अवेडे येथे इव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याने लोकांनी संताप व्यक्त केला. मात्र एकूण मतदान शांततेत झाले.

कुंकळ्ळी मतदारसंघातील पुलवाडा मतदान केंद्रात सकाळी ७ वाजता इंव्हीएम मशिनची चाचणी करण्यासाठी प्रत्येक पक्षाला प्रत्येकी ९ वेळा बटन दाबून मत मारण्याचे प्रात्यक्षिके घेतले असता भाजपाला १७, कॉंगे्रसला ९, आप ८ व अपक्षला एक मत दाखविल्याने. आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. ९ वेळा बटन दाबल्यानंतर भाजपाला १७ कशी मते पडली. तात्काळ निवडणूक अधिकार्‍याकडे तक्रार करताच जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली व तात्काळ इव्हीएम मशीन बदलले. तोपर्यंत ८.३० वाजले होते. त्यांनी मतदानाची वेळ वाढविली. कित्येक ठिकाणी मशिने ना दुरुस्त होती. त्याबद्दल सर्वांनी संशय व्यक्त केला.

मते वळवण्याचा भाजपचा
अयशस्वी प्रयत्न : क्लाफस
कुंकळ्ळीचे आमदार क्लावाफास डायस यांनी सरकारने मनी पॉवर दाखवून मते भाजपाकडे वळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे सांगितले. तसेच ना दुरुस्त मशिने ठेवून मते वळविण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी दाद दिली नाही असे सांगितले.

नादुरुस्त ईव्हीएमबद्दल
कवळेकरांची नाराजी
विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यानी सांगितले. सरकारने बेतुल, अवेडे, केपे येथे नादुरुस्त इव्हीएम मशिने देवून भाजपाला मतदान करण्याचा प्रयत्न केला.
लोक भाजपा सरकारला विटल्याने ते त्यांनी लोकसभेचे दोन पोट निवडणुकीतील तीन विधान सभा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार विजयी करण्याचे ठरविले आहे असे कवळेकर यांनी सांगितले

सरकारचा लबाडीचा
प्रयत्न : गोम्स
आपचे उमेदवार ऍल्वीश गोम्स यांनी सांगितले की लोक सरकारच्या कारभाराला विटलेले आहेत. नादुरुस्त इव्हीएम मशिने ठेवून ते लुबाडी करू पहात आहेत. त्यासाठी आपण सुरुवातीपासून मतदान पत्रिकेद्वारे मतदान करण्याची मागणी केली होती असे ते म्हणाले.

मडगावात कॉंग्रेसला
मताधिक्य : कामत
आमदार दिगंबर कामत यानी सांगितले लोक मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी बाहेर आले ते सरकार विरोधात आहे. मडगाव मतदारसंघात ते कॉंग्रेसला मताधिक्य मिळवून देतील.

जनतेत भाजपविरोधी
नाराजी : रेजिनाल्ड
कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लोरेंस यानी सांगितले जनतेला भाजपाबद्दल संताप असून ते मोठ्या संख्येने बाहेर आले आहेत. या खेपेला फ्रांन्सिस सार्दिन व आपण संघटीत झाल्याने कॉंग्रेसचे मताधिक्य वाढेल. गेल्या लोकसभानिवडणुकीत सार्दिन यानी आपल्या विरोधांत काम केले होते. मात्र आपण यावेळी सार्दिनना पाठिंबा दिला आहे असे ते म्हणाले.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यानी मडगाव येथे येवून मतदान केले.

चांगल्या उमेदवाराला
मतदान : सरदेसाई
गोवा फॉरवर्ड पक्षाने चांगल्या उमेदवाराला मतदान केल्याचे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले.

कॉंग्रेसच्याच विजयाचा
चोडणकरांचा दावा

मतदारांनी पोटनिवडणुकीने मतदान केलेले असून यावेळी कॉंग्रेसचाच विजय होईल, असा दावा काल उत्तर गोवा लोकसभेचे कॉंगे्रसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी केला.
कॉंग्रेसच्या विजयासाठीच यंदा लोकांनी मतदान केलेले असून गोव्यातील दोन्ही जागा कॉंग्रेसला मिळतील तसेच तिन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुकीतही आमचाच विजय होईल.

मगोच्या पाठिंब्याविना भाजपला
फटका बसणार : सुदिन
मगो पक्षाने पाठिंबा काढून घेतलेला असल्याने लोकसभेच्या उत्तर गोवा व दक्षिण गोवा मतदारसंघात तसेच शिरोडा म्हापसा व मांद्रे या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे मोठे नुकसान होणार असल्याची प्रतिक्रिया काल आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिली. गेल्या लोकसभा निवडणुकीत मगोने भाजप उमेदवार नरेंद्र सावईकर याना फोंडा तालुक्यातील मतदारसंघातून सुमारे २७ हजार एवढी मतांची आघाडी मिळवून दिली होती. या आघाडीमुळेच सावईकर यांचा विजय झाला होता.
यंदा भाजपला ह्या मतदारसंघात ३ ते ४ हजारांवर आघाडी मिळणार नसल्याचे ढवळीकर म्हणाले.

STAY CONNECTED

850FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अजून खूप जायचे आहे पुढे…

प्रिय वाचकहो, नमस्कार!आपल्या सर्वांचे लाडके दैनिक नवप्रभा आज ५० वर्षांची सुवर्णमहोत्सवी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून हीरक महोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे....

राज्यात ४७६ नवे कोरोना रुग्ण

>> दोघांचा मृत्यू, बळींची संख्या ९३, एकूण रुग्णसंख्या १०,९७० राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ४७६...

प्लाझ्मा उपचारामुळे दोघे कोरोनामुक्त

>> गंभीर कोरोनाबाधितांवर गोमेकॉत उपचार ः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

पहिल्या मानवी चाचणीत भारतीय लस सुरक्षित

कोरोनासंबंधी भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन ही लस देशातील १२ शहरांतील ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. या लसीच्या पहिल्या...

ALSO IN THIS SECTION

राज्यात ४७६ नवे कोरोना रुग्ण

>> दोघांचा मृत्यू, बळींची संख्या ९३, एकूण रुग्णसंख्या १०,९७० राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ४७६...

प्लाझ्मा उपचारामुळे दोघे कोरोनामुक्त

>> गंभीर कोरोनाबाधितांवर गोमेकॉत उपचार ः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

पहिल्या मानवी चाचणीत भारतीय लस सुरक्षित

कोरोनासंबंधी भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन ही लस देशातील १२ शहरांतील ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. या लसीच्या पहिल्या...

अशांतता पसरवल्यास योग्य प्रत्त्युत्तर ः राष्ट्रपती

जर कोणीही अशांतता परसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल असा कठोर संदेश चीनचे नाव न घेता स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला...