25 C
Panjim
Saturday, August 15, 2020

आजपासून हॉटेल्स खुली

>> पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांची माहिती

राज्यातील हॉटेल्स आज दि. २ जुलैपासून पर्यटक व अन्य नागरिकांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ज्या हॉटेलवाल्यांनी पर्यटन खात्याकडे नोंदणी केलेली आहे व हॉटेल्स खुली करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करणारे अर्ज केलेले आहेत त्यांनाच हॉटेल खुली करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले.

हॉटेल खुली करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करणारे अर्ज आतापर्यंत २५० हॉटेलवाल्यांनी केले असून त्यात पंच तारांकित हॉटेल्ससह अन्यांचा समावेश असल्याची माहितीही आजगावकर यानी दिली. पर्यटन खात्याशी नोंदणी असलेले अथवा नोंदणी करून जे यापुढे हॉटेल खुले करण्यास परवानगी मागतील त्यांनाही परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती आजगावकर यांनी दिली. अनलॉक प्रक्रियेचाच हा एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चाचणी करूनच या
अथवा गोव्यात करा
आता राज्यात हॉटेल्स खुली होणार असल्याने परराज्यांतून पर्यटनासाठी पर्यटक येणार असून त्यांना येतानाच आपल्या राज्यातून कोरोनाची चाचणी करून यावे लागणार आहे. अन्यथा गोव्यात आल्यानंतर चाचणी करावी लागणार आहे. तसेच त्यांना गोव्यात येण्यापूर्वीच ऑनलाइन हॉटेल बुकींग करावे लागणार आहे. बुकींग न करता येणार्‍यांना राज्यात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे आजगावकर यांनी स्पष्ट केले.

४८ तासांपूर्वी कोविडची चाचणी केल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच व चाचणी निगेटिव्ह असलेल्यांना कोणत्याही अडचणीशिवाय राज्यात प्रवेश मिळेल. जे गोव्यात येऊन चाचणी करतील त्यांना अहवाल मिळेपर्यंत विलगीकरणात रहावे लागेल आणि अहवाल निगेटिव्ह आला तरच राज्यात फिरता येईल, असे आजगावकर यांनी स्पष्ट केले.

कोरोना आपत्तीमुळे गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील सर्व हॉटेल्स बंद असून त्यामुळे पर्यटन राज्य असलेल्या गोव्याचे आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोेडले आहे.
आता हॉटेल्स सुरू होणार असल्याने राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना मिळणार असल्याचे आजगावकर म्हणाले.

STAY CONNECTED

850FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अजून खूप जायचे आहे पुढे…

प्रिय वाचकहो, नमस्कार!आपल्या सर्वांचे लाडके दैनिक नवप्रभा आज ५० वर्षांची सुवर्णमहोत्सवी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून हीरक महोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे....

राज्यात ४७६ नवे कोरोना रुग्ण

>> दोघांचा मृत्यू, बळींची संख्या ९३, एकूण रुग्णसंख्या १०,९७० राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ४७६...

प्लाझ्मा उपचारामुळे दोघे कोरोनामुक्त

>> गंभीर कोरोनाबाधितांवर गोमेकॉत उपचार ः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

पहिल्या मानवी चाचणीत भारतीय लस सुरक्षित

कोरोनासंबंधी भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन ही लस देशातील १२ शहरांतील ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. या लसीच्या पहिल्या...

ALSO IN THIS SECTION

राज्यात ४७६ नवे कोरोना रुग्ण

>> दोघांचा मृत्यू, बळींची संख्या ९३, एकूण रुग्णसंख्या १०,९७० राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ४७६...

प्लाझ्मा उपचारामुळे दोघे कोरोनामुक्त

>> गंभीर कोरोनाबाधितांवर गोमेकॉत उपचार ः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

पहिल्या मानवी चाचणीत भारतीय लस सुरक्षित

कोरोनासंबंधी भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन ही लस देशातील १२ शहरांतील ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. या लसीच्या पहिल्या...

अशांतता पसरवल्यास योग्य प्रत्त्युत्तर ः राष्ट्रपती

जर कोणीही अशांतता परसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल असा कठोर संदेश चीनचे नाव न घेता स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला...